भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यात पडतो ?

       सर्वाधिक पाऊस कोठे पडतो ?

नमस्कार मित्रांनो, 
          निसर्गातील पणे घटका विषयी माहिती घेत असताना आपण औषधी वनस्पती, निसर्गातील रहस्य, प्राणी पक्षी यांची तर माहिती घेत आहोत. पण या निसर्गात असलेल्या पडते घटकाविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. पावसाळा सुरू झाल्यावर सुरुवातीच्या पावसात भिजायला सर्वांनाच आवडते. पाऊस आल्यावर सर्वात जास्त आनंद होतो तो शेतकऱ्याला. त्याबरोबरच सर्वांनाच पाऊस आल्यावर मजा वाटते आणि आनंद होतो. पण हा पाऊस जेव्हा थांबायचा विषयच घेत नाही. आणि सतत दिवसात दिवस बघायला लागतो. जेवण मुसळधार पावसाला सुरुवात होते नदीला पूर येतो आणि महापुराचे संकट ओढावले तेव्हा मात्र हा पावसाळा नको नको वाटतो. पण तुम्हाला माहित आहे का सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ? तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का की भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो ? या संपूर्ण जगात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो ?
चला तर जाणून घेऊन भारतात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो ?

मोसिन राम सर्वाधिक पाऊस पडतो.
भारतात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो ?


भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यात पडतो ?


भारत देशात सर्वाधिक पाऊस कोणत्या राज्यात पडतो असा जर प्रश्न पडला तर आवर्जून उत्तर येतं ते मेघालय राज्य. भारताच्या पूर्वेकडील मेघालय हे राज्य म्हणजे उंच पर्वत रांगा, जंगले  व दऱ्या समृद्ध असलेले राज्य होय. मेघालय राज्य हे भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे राज्य म्हणून ओळखले जाते. मेघालय राज्य मधील " मोसिनराम " हे एक छोटेसे खेडे शिलॉंग पासून 65 किलोमीटर तर चेरापुंजी पासून 16 किलोमीटर अंतरावर आहे.
तुम्हाला चिरापुंजी नक्कीच माहित असेल. आपण शाळेत असताना भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून चेरापुंजी ची ओळख जाणून घेतली होती. आता ती जागा " मोसिनराम " या गावाने घेतली आहे.

भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण - राज्य - मेघालय, गाव - मोसिनराम 

मौसिनराम हे गाव मेघालय राज्यात आहे. शिलाँग पासून 65 किलोमीटरवर, तर चिरा पुंजी पासून 16 किलोमीटर अंतरावर मोसिन राम हे गाव आहे. चेरापुंजी हे सर्वाधिक पाऊस पडणारे भारतातील ठिकाण होते मात्र आता मौसिनराम या गावाने सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून जागा घेतली आहे.

भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण मॉसीनराम येथे किती पाऊस पडतो ?


मोसिनराम येथे वर्षभरात 11,272 मी.मी ( 467. 4 इंच ) इतका पाऊस पडतो. काही तज्ञांच्या मते हे पृथ्वीवरील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे, मात्र काही जण याला विरोध करतात त्यांच्या मते कोलंबियातील ल्लोरा ठिकाणी 12,717 मिमी इतका पाऊस पडतो. जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून मौसिनराम हेच ठिकाण आहे असे काही तज्ञांचे मत आहे. याबद्दल तुमचे मत काय. तर काही तज्ञांचे असे मत आहे की कोलंबियातील ल्लोरा याठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो. 1985 मध्ये तर येथील पावसाची नोंद थक्क करणारी आहे. त्या वर्षी 26 हजार मी इतकी पावसाची नोंद झाली होती याची दखल गिनीज बुकने देखील घेतली होती. अशा प्रतिकूल वातावरणात तेथील लोक कसे राहात असावेत, याचे एक आश्चर्यच. अरे त्या पेक्षा कमी पावसात सुद्धा आपण वैतागून जातो.

मेघालय राज्यातील मोसीन राम गाव
मोसीनराम गाव , मेघालय

भारतातील मेघालय राज्यात असणाऱ्या मौसिनराम याच गावात सर्वाधिक पाऊस का पडतो ?

मौसिनराम या ठिकाणी सर्वाधिक काळ मान्सून बरसात असतो. इतका पाऊस का बर पडतो ? कारण बंगालच्या उपसागरावरून वाहणारे उष्ण बाष्पयुक्त वारे या ठिकाणास पूर्णपणे व्यापतात. आणि महत्वाचे म्हणजे उंच पर्वत रांगा म्हणजेच खासी च्या उंच पर्वत रांगा या वाऱ्यांच्या मार्गात असल्यामुळे वाऱ्यांना तिथून जाऊ देत नाही. यामुळे खालून वर जाणारी हवा पुन्हा खालच्या देशाने घेतली जाते. या सर्व कारणांमुळे मौसिनराम येथे भारतातील सर्वाधिक पाऊस पडतो.

मेघालय राज्यातील मोसिनराम या गावी पावसाळ्यात फक्त हिंमतवान लोकच जाऊ शकतात. हा मात्र इतर वेळेस तुम्ही पण जाऊ शकता. या सर्वाधिक पावसाचे ठिकाण आणि तुम्हाला जायला आवडेल का कॉमेंट करून नक्की कळवा.ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

लोकप्रिय पोस्ट...

धन्यवाद.

FAQ'S

1) भारतामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो ?
Ans. मेघालय 

2) भारतामध्ये सर्वाधिक पाऊस कुठे पडतो ?
Ans. मेघालय राज्य, मोसिनराम गाव

3) महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो ?
Ans. आंबोली, आंबोली इथे वर्षाकाठी सरासरी ७५०० मिमी पाऊस पडतो.

4) जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाणे कोणती ?
Ans. 1) मोसिनराम , मेघालय भारत 2) ल्लोरा कोलंबिया 3) चेरापूंजी मेघालय भारत 4) क्रॉप नदी, न्यूझीलंड 5) सॅन अँटोनियो , आफ्रिका

5) सर्वाधिक पाऊस कुठे व का पडतो ?
Ans. मौसिनराम 
कारण बंगालच्या उपसागरावरून वाहणारे उष्ण बाष्पयुक्त वारे या ठिकाणास पूर्णपणे व्यापतात. आणि महत्वाचे म्हणजे उंच पर्वत रांगा म्हणजेच खासी च्या उंच पर्वत रांगा या वाऱ्यांच्या मार्गात असल्यामुळे वाऱ्यांना तिथून जाऊ देत नाही. यामुळे खालून वर जाणारी हवा पुन्हा खालच्या देशाने घेतली जाते. या सर्व 

Previous Post Next Post