गवती चहा संपूर्ण माहिती | औषधी उपयोग , फायदे व तोटे, शास्त्रीय नाव व उगम

 गवती चहा फायदे आणि तोटे व गवती चहा औषधी गुणधर्म

नमस्कार मित्रांनो ,
                        औषधी वनस्पतींची माहिती घेत असताना . आपण अनेक औषधी वनस्पतींची माहिती घेतली आहे आणि घेतली नसेल तर वेबसाईट ला विजीट करून घ्या. कोणती औषधी वनस्पतीची माहिती घेत असताना ते माहीत ती हि पूर्ण असायला हवी. आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेऊ औषधी वनस्पती गवती चहा फायदे व तोटे. गवती चहा आपल्याकडे प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात गवतीचहा भरपूर लोक आपल्या परसबागेत किंवा अंगणात त्याची लागवड करतात आणि रोजच्या चहा बनवण्यासाठी उपयोग करत असतात. पण गवती चहा पिण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे आपल्याला माहित आहे का ? गवती चहा माहिती घेत असताना आपण गवती चहा विषयी पूर्ण माहिती जाणून घेऊ. जसे की गवती चहा चा उगम, गवती चहा चे औषधी गुणधर्म, गवती चहाची लागवड, गवती चहाचे फायदे आणि तोटे , गवती चहा चे उपयोग . आपण बऱ्याच औषधी वनस्पतींची माहिती या वेबसाईट वर पोस्ट केली आहे चला तर आज जाणून घेऊन 

गवती चहाचे फायदे व तोटे, गवती चहा उपयोग , उगम आणि पूर्ण माहिती.
Gavati Chaha

गवती चहाचे फायदे व तोटे, गवती चहा उपयोग , उगम आणि पूर्ण माहिती.

गवती चहा वर्णन

गवती चहा नावातच त्याच्या गवत असल्याने जसे मोठाल गवत असते त्याप्रमाणे गवती चहा  असतो. एखाद्या जवळचा सारखा जुडगा मात्र अत्यंत हिरवा गार. एक ते दीड मीटर उंच वाढणारी गवती चहा औषधी वनस्पती ही गवती जोडवे यासारखी  उगवते. गवती चहाची पाने लांब व निमुळती असतात.

gavti chaha photo imege

गवती चहाचे वितरण व मूळ ठिकाण व गवतीचहा चा उगम

गवती चहा चा उगम आणि मुळ ठिकाण विषय बोलायचे झाले तर आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशिया या खंडांमध्ये गवती चहा प्रामुख्याने आढळतात असतो. औषधी वनस्पती गवती चहा हे तृणवर्गीय वनस्पती आहे. ही वनस्पती बारमाही असल्याने आणि सुगंधित असल्याने मोहक वाटते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ मध्ये मोठ्या प्रमाणावर चहासाठी वापरली जाते आणि आपल्या परसबागेत वाढवली जाते. थंडीच्या दिवसात जेव्हा चहा अत्यंत महत्त्वाचा वाटतो तेव्हा आपल्याला गवतीचहा पाहिजे. यामुळे गवती चहाचे फायदे आपल्याला दिसून येतात.

गवती चहा शास्त्रीय नाव व शास्त्रीय वर्गीकरण

1) गवती चहा चे शास्त्रीय नाव

    Cymbopogon citratus

2) गवती चहा शास्त्रीय वर्गीकरण

Cymbopogon citratus

Scientific classificatione
Kingdom: Plantae
Clade: Tracheophytes
Clade: Angiosperms
Clade: Monocots
Clade: Commelinids
Order: Poales
Family: Poaceae
Subfamily Panicoideae
Supertribe:  Andropogonodae
Tribe:        Andropogoneae
Subtribe:      Andropogoninae

Genus:    Cymbopogon Spreng.

गवती चहाला संस्कृतमध्ये सुगंध तृण, हिंदीत अग्याघास, गंधबेना, सिंधीत हरिचांय, आणि बंगालीत गंधतृण म्हणतात. गवती चहा meaning in English is Herbal tea 2) गवती चहा च्या जाती

गवती चहा जाती व अन्य नावे

1) गवती चहा ची नावे

गवती चहाला संस्कृतमध्ये सुगंध तृण, हिंदीत अग्याघास, गंधबेना, सिंधीत हरिचांय, आणि बंगालीत गंधतृण म्हणतात. गवती चहा meaning in English is Herbal tea

2) गवती चहा च्या जाती

ओडी- 440 , सीकेपी -25 , आर आर एल 16 ७. प्रगती कावेरी ,कृष्णा , निमाया या काही गवती चहा च्या जाती आहेत.

गवती चहा औषधी गुणधर्म | गवती चहा फायदे आणि तोटे | गवती चहा चे उपयोग

गवती चहा मध्ये पाणी, प्रथिने, ऊर्जा, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन पॅन्टोथेनिक acid , व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असते. खनिजांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त, तांबे, मॅंगनीज, सेलेनियम इ.

1) गवती चहा फायदे आणि औषधी गुणधर्म

  • - ताप, सर्दी, खोकला झाल्यास गवती चहाचा काढा करून प्यावा.
  • - संधिवातात गवती चहाच्या तेलाने मॉलिश करावी.
  • - पोटात गॅस झाल्यास गवती चहाचा काढा प्यावा.
  • - गवती चहाचे तेल सुगंधित अत्तर बनवण्यासाठी सुद्धा केला जातो.
  • -  कफ आणि वात यावर सुद्धा गवती चहा गुणकारी आहे.
  • - धान्य साठवण्यासाठी जेव्हा आपण ठेवत असतो त्यावेळी त्या धान्याला कीड लागू नये म्हणून गवती चहा चे पाने कीटकनाशक म्हणून त्या धान्यात आपण ठेवू शकतो.
  • - कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आपले शरीर जास्त असल्यास कमी करण्यासाठी गवतीचहा प्यावा.
  • - गवती चहा रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करतो म्हणून डोकेदुखी सर्दी झाल्यावर गवतीचहा पिल्याने आपल्याला मस्त वाटते.
  • - पोट दुखत असल्यास गवती चहा प्यावा असे आपल्याला सल्ला दिला जातो.
  • - गवती चहा मुळे अत्यंत सुगंधित असल्याने जेव्हा आपण पितो तेव्हा आपल्याला फ्रेश वाटते.
  • - जहा कुणाला लवकर झोप लागत नाही त्यांनी गवतीचहा किंवा गवती चहाचे तेल आपल्या जीवनात वापरावे तुझे गवती चहा पिल्याने आपल्याला चांगली झोप लागते.

गवती चहाचे तोटे

   गवती चहाचे फायदे अनेक असले तरी त्याचा जास्त वापरून आपल्याला तोटा पण होऊ शकतो जाणून घेऊ काही गवती चहाचे तोटे
  • - आपण गवती चहा चा वापर जास्त करत असलो किंवा प्रत्येक वेळेस गवतीचहा जास्त प्रमाणावर घेत असल्यास आपल्याला जुलाब होण्याची शक्यता असते म्हणून त्याचा वापर प्रमाणात करावा आणि तसे झाल्यास काही काळ गवतीचहा पासून दूर राहावे.
  • - चहा आपण का पितो तेव्हा आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून आणि गवतीचहा हा गरम पेय असल्याने गर्मी च्या दिवशी यात गवती चहा पिल्याने पोट दुखी होऊ शकते म्हणून गवतीचहा शक्यतो थंडी च्या वेळेस प्यावा.
  • - अतिप्रमाणात गवती चहा चा वापर केल्याने तोंड कोरडे पडून तुम्हाला चक्कर येऊ शकते.
  • -  काही वेळेस जास्त गवती चहाचे सेवन केल्याने आपल्यांना जास्त भूक लागू शकते आणि यामुळे थकवा जाणवायला सुरवात होऊ शकते.

काही लोकप्रिय पोस्ट नक्की वाचा
1) मनुष्य भक्षक झाडाचे बेट
2) रान भाजी शेवळा माहिती
3) औषधी वनस्पती अडुळसा पूर्ण माहिती.

गवती चहाची लागवड | गवती चहा शेती

गवती चहाचे अशाप्रकारे अनेक फायदे असल्याने गवती चहाची लागवड ही अनेक ठिकाणी केली जाते. गवती चहा शेती कशी केली जाते यासाठी हवामान काय लागते हे आपण थोडक्यात जाणून घेऊ.
  • - गवती चहा हे एक गवताचं जोड ग असल्यासारखे वनस्पती असल्याने आपण तिची लागवड आपल्या परसबागेत करू शकतो.
  • - गवती चहाच्या लागवडीसाठी तसे बघितले तर कोणतेही जमिनीत ते उगवतं. त्याच्या या गुणधर्मामुळे जमिनीचा निचरा होऊ नये म्हणून आपण तिची लागवड उतारावर करू शकतो.
  • - हलक्‍या जमिनीत व भारी जमिनीत अशा कोणत्याही जमिनीत गवती चहा उगवतो मात्र पाण्याचा निचरा होणारी काळी रेताड मृदा गवती चहा लागवड साठी फायद्याची ठरते.
  • - सम प्रमाणात पाऊस आणि उष्ण आणि उबदार हवामान गवती चहासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते.
  • - गवती चहासाठी जास्त सूर्यप्रकाश आवश्यक असतो.
  • अशाप्रकारे आपण गवती चहा विषयी व त्याच्या लागवडी विषयी योग्य माहिती घेऊन आपण लागवड करू शकतो कारण बाजारात गवती चहाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गवती चहाच्या तेलासाठी गवती चहाची मोठ्या प्रमाणावर मागणी ही बाजारपेठेत आपल्याला दिसून येते म्हणून या संधीचा फायदा घेऊन गवती चहाचे उत्पादन आणि लागवड नक्की करावी.

गवती चहाचे फायदे आणि तोटे तसेच गवती चहा माहिती तुम्हाला वाचून कसे वाटले ते कळवा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.

FAQ'S

1) गवती चहा मध्ये कोणते घटक द्रव्य आढळतात ?
Ans -
गवती चहा मध्ये पाणी, प्रथिने, ऊर्जा, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन पॅन्टोथेनिक acid , व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असते. खनिजांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त, तांबे, मॅंगनीज, सेलेनियम इ.

2) गवती चहाचे फायदे काय आहेत ?

  • Ans - गवती चहा फायदे आणि औषधी गुणधर्म
  • - ताप, सर्दी, खोकला झाल्यास गवती चहाचा काढा करून प्यावा.
  • - संधिवातात गवती चहाच्या तेलाने मॉलिश करावी.
  • - पोटात गॅस झाल्यास गवती चहाचा काढा प्यावा.
  • - गवती चहाचे तेल सुगंधित अत्तर बनवण्यासाठी सुद्धा केला जातो.
  • -  कफ आणि वात यावर सुद्धा गवती चहा गुणकारी आहे.

  • Gavati Chahache Phayde aani Tote

3) गवती चहाचे तोटे काय आहेत ?
Ans -

गवती चहाचे फायदे अनेक असले तरी त्याचा जास्त वापरून आपल्याला तोटा पण होऊ शकतो जाणून घेऊ काही गवती चहाचे तोटे

  • - आपण गवती चहा चा वापर जास्त करत असलो किंवा प्रत्येक वेळेस गवतीचहा जास्त प्रमाणावर घेत असल्यास आपल्याला जुलाब होण्याची शक्यता असते म्हणून त्याचा वापर प्रमाणात करावा आणि तसे झाल्यास काही काळ गवतीचहा पासून दूर राहावे.
  • - चहा आपण का पितो तेव्हा आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून आणि गवतीचहा हा गरम पेय असल्याने गर्मी च्या दिवशी यात गवती चहा पिल्याने पोट दुखी होऊ शकते म्हणून गवतीचहा शक्यतो थंडी

4) गवती चहा लागवड करण्यासाठी हवामान व जमीन कशी पाहिजे ?
Ans
- गवती चहा लागवडीसाठी उष्ण आणि उबदार हवामान आणि पाण्याची निचरा करणारी रेताड माती असल्यास गवती चहाची लागवड फायद्याची ठरते. तसेच मध्यम पाऊस असायला हवा.

5) गवती चहाचे उगम व मुळ ठिकाण
Ans
-गवती चहा चा उगम आणि मुळ ठिकाण विषय बोलायचे झाले तर आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशिया या खंडांमध्ये गवती चहा प्रामुख्याने आपल्याला आढळतो. आणि भारतामध्ये महाराष्ट्र आणि केरळ सारख्या राज्यात आपल्यांना गवतीचहा बघायला मिळतो.

6) गवती चहा च्या जाती आणि प्रकार कोणते ?
Ans
. गवती चहा च्या जाती व प्रकार
ओडी- 440 , सीकेपी -25 , आर आर एल 16 ७. प्रगती कावेरी ,कृष्णा , निमाया या काही गवती चहा च्या जाती आहेत.

7) गवती चहा ची नावे कोणती आहेत ?
Ans-
  गवती चहाला संस्कृतमध्ये सुगंध तृण, हिंदीत अग्याघास, गंधबेना, सिंधीत हरिचांय, आणि बंगालीत गंधतृण म्हणतात. गवती चहा meaning in English is Herbal tea

Previous Post Next Post