अडुळसा (Adhatoda vasaka Nees) Adulasa. | शास्त्रीय गुणधर्म व औषधी गुणधर्म

  अडुळसा औषधी वनस्पती माहिती

अडुळसा (Adhatoda vasaka Nees) Adulasa.

निसर्गात असणाऱ्या औषधी वनस्पती ची माहिती आपल्याला होणे काळाची गरज आहे.आता सद्याच्चा घडीला वनौषधी ला दिवासोंदिवस महत्व वाढत आहे.कारण केमिकल्स युक्त औषधे खाऊन माणसे कमजोर होत आहेत.चला तर आज आपण एका वनौषधींची माहित घेऊ.आज आपण अशा वनौषधी विषयी जाणून घेणार आहोत जी आपल्या आजूबाजूला सतत आढळते.या वनौषधींचे नाव अडुळसा.हिंदी मध्ये वासा असेही म्हटले जाते.अडुळसा ही अ‍ॅकॅंथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅधॅटोडा व्हॅसिका आहे.सध्यातरी ही औषधी वनस्पती आपल्याला सहज उपलब्ध होते मात्र ही भविष्यात मिळणार नाही .कारण ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.अडुळसा खेडेगावात सहज उपलब्ध होते.५-६ फूट उंच वाढणारी ही वनस्पती आपल्याला अनेक रोग बरे करण्यास मदत करते.अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधांत वापरली जातात. कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा औषध मोठ्या प्रमाणावर वापरतात. साधारणपणे २००० वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा, असे आयुर्वेदातील उल्लेखांवरून दिसते. अडुळशापासून आयुर्वेदीय पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली आहेत. पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो. त्याचा रस, मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यांवर देतात.पानांत वासिसाईन हे अल्कलोइद आणि अ‍ॅडॅथोडिक आम्ल असते. हृदयाच्या आजारांवरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो.
 चला तर मग जाणून घेऊ अडुळसा विषयी.

१) अडुळसा झाडाचे स्वरूप (Nature of Adulsa)

साधारणतः ६-७ फूट उंच वाढणारी ही वनस्पती झुडूप वर्गातील आहे.अडुळसा ही सदाहरित झाड, वनस्पती मध्ये मोडते.पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो. फुले पांढरट रंगाची असतात. फळ लांब व टोकदार असतात.फुले ही कक्षस्थ कणिशात, फांद्यांच्या टोकांवर, पुष्पकोश नलिकाकृती, पांढरा, गुलाबी रेषांसहीत,
फळ ही बोंड गदाकृती, अणकुचीदार, गोलाकार, आयताकृती, नलिकाकृती. 

१) अडुळसा झाडाचे स्वरूप (Nature of Adulsa)
अडुळसा झाड

२) अडुळसा वितरण व मुळ ठिकाण(origin and Distribution of Adulasa):

अडुळसा ही सदाहरित वनस्पती भारतीय आहे.मात्र ती भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ती आढळते. ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात.भारत, श्रीलंका, मलाया, दक्षिण-पूर्व आशिया अशा ठिकाणी तिचा प्रसार झाला आहे.गावाकडे कुंपणात, पडीत जागेत ती उगवते.

३) शास्त्रीय नाव व शास्त्रीय वर्गीकरण (Binomial Name and scientific classification of Adulasa):

A)शास्त्रीय नाव (Binomel name): 

Adhatoda vasaka Nees

B) शास्त्रीय वर्गीकरण (scientific classification):

Taxonomy
  1. Kingdom- Plantae
  2. Subkingdom- Viridiplantae
  3. Infrakingdom- Streptophyta
  4. Superdivision-Embryophyta
  5. Division- Tracheophyta
  6. Subdivision- Spermatophytina
  7. Order- Lamiales
  8. Family- Acanthaceae
  9. Subfamily- Acanthoideae
  10. Tribe- Justicieae
  11. Genus- Adhatoda
अडुळसा

४) अडुळसा नावे व त्यांच्या जाती(Name and Type of Adulasa):

A)अडुळसा नावे:

  • इंग्रजी -
  • मराठी-अडुळसा, अडुसा, वासा वसाका
  • गुजराती.-अडसोगे, अडुसो, अर्डुसी.
  • हिंदी.-अडाल्सो, अरूशो, वसाका, कानडी अडसला, अडुमुत्तडा, अडुसोगे, संस्कृत. सिंहिका, वसाका, अटरूष.
  • संस्कृत- नेपाली: असुरो
  • संस्कृतम्: वासकसस्यम्

B) अडुळसा जाती :

 फुले पांढरी किंवा जांभळी असतात. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.यात पांढरा व काळा अशा दोनजाती आहेत.यास पांढरी फुले येतात. 

५)शास्त्रीय गुणधर्म व औषधी गुणधर्म(Scientific and medicinal properties of Adulasa)

A)शास्त्रीय गुणधर्म scientific properties:

 अडुळसा वनस्पतीच्या पानांत वासिसाईन  अल्कलोइद आणि अ‍ॅडॅथोडिक आम्ल असते. 

B) औषधी गुणधर्म(Medicinal properties):

  • a)संधीवात,सांधे सुजून आल्यावर त्याच्यावर पाने गरम करून शेक दिला जातो.
  • b) दमा, खोकला झाल्यावर पानंचा काढा करून पिण्यास देतात.
  • c)लघवीला आग झाल्यास पंचांगाचा काढा करून पिण्यास देतात.
  • d)पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो. त्याचा रस, मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यांवर देतात.
  • e)मूळ गर्भ निष्क्रमणोपयोगी, उन्हाळे लागणे, श्वेतप्रदर यात मूळ उपयोगी आहे . g)झाड कडू जहाल, गारवा उत्पन्न करणारे.
  • g) वातकारक, श्वासनलिकेच्या दाहात उपयोगी आहे.
  • h) कुष्ठरोग, रक्ताचा अशुद्धपणा, हृदयविकार, तृषा, दमा, ताप, वांती, स्मृतीभ्रंश, कोड, क्षय, कावीळ, अर्बुद, मुखरोग यात उपयोगी (आयुर्वेद) आहे . I)मुळे मूत्रवर्धक, खोकला, दमा पितप्रकोपवांती, नेत्रविकार, ताप, परमा यात उपयोगी आहे ,आर्तवजनक फुले रक्ताभिसरण सुधारून उन्हाळ्याकावीळ कमी करण्यासाठी उपपयोगी (युनानी) आहे .
  • j)अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.
  • k)आयुर्वेदानुसार खोकला,काविळ,दमा,श्वास,कफ,क्षय,त्रिदोष,मुख,मुत्रघात,सुज इत्यादी रोगांवर उपयुक्त आहे.
  • l)मूळे, पाने व फुले स्वदेशी औषधात सर्दी, कफ, श्वासनलिकेचा दाह आणि दम्यात उपयोगी आहे.
  • m)पानांचा रस आले किंवा मधाबरोबर जुनाट श्वासनलिकेचा दाह व दमा यात गूणकारी आहे . वाळविलेली पाने सिगारेट बनवून दम्यात वापरतात. पानांचा रस अतिसार व आमांशात वापरतात. 
  • n)पानंची भुकटी दक्षिण भारतात हिवतापात वापरतात. पाने संधिवातात पोटीस म्हणून सांध्यावर तसेच सूज आणि तंत्रिकाशूलात वापरतात. 
  • o)क्षुद्र दर्जाच्या जीवांना पाने विषारी, पानांचा अल्कोहोलमध्ये बनविलेला अर्क माश्या , पिसू, गोम, डास व इतर किटकांना विषारी (वॅट). ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.आयुर्वेदात या वनस्पतीचा वापर खोकल्यावर होतो.याचे फुलांची भाजीही करतात.
  • p) खोकला,कफ झाल्यावर आपल्या तोंडातून तो लवकरात लवकर पडत नाही .खासकरून लहान मुले,म्हातारी माणसं.यांना रात्री कफामुळे झोप लागत नाही.यासाठी अडुळसा पानांचा रस,मध , पिंपली याचे मिश्रण थोडे थोडे खावे.यामुळे पित्त पडतो.
  • q)गजकर्ण ,खरूज , नायटा या रोगांवर रामबाण उपाय आहे.पानांची पेस्ट बनवून लावावी.
  • r)पोटातील कृमी ,जंत काढण्यासाठी अडुळसा पाने,फूले , मुळे ,सालं,उपयोगी ठरतात.

  🌳    औषधी वनस्पती...🍀

६) अडुळसा वनौषधी शेती(Farming of Adulasa):

अडुळसा वनौषधी भविष्यकालीन फायद्यासाठी टिकवणे गरजेचं आहे.
अडुळसा वनौषधी महत्व जाणून शेताच्या कडेला,कुंपणाला,अशा ठिकाणी बागेत अडुळसा वनौषधी लागवड करावी.ही सदाहरित वनस्पती असल्याने ती सतत हिरवीगार असते.म्हणून अडुळसा वनौषधी नक्की आपली कुंपणात,बागेत लावा.
अडुळसा वनौषधी
अडुळसा फुल

७)अडुळसा वनौषधी काढा बनविण्याची पद्धत:

काढा बनविण्याची पद्धत/प्रक्रिया: ज्या वनस्पती चा काढा बनवणार तीवनस्पती च्या भागाचा काढा बनविणार तो भाग उदा.पाने, फूले,फळे इत्यादी.घेऊन त्या कुटून ,बारीक करून तयार झालेला कुटा, पावडर, 1:1 असे पाणी घेऊन तो कुटा पाण्यात टाकावे. नंतर ते मिश्रण उकळून, उकळून सर्व कुटा पावडर मधील द्रव्य निघाल्यावर ते थंड करण्यास ठेवावे .नंतर ते गाळून घ्यायचे.हा आपला वनस्पती काढा तयार झाला. उदा अडुळसा चा पाला ,पाने घ्या कुटून बारीक करा .पाण्यात 1:1 असे टाका. उकळून घ्या ,थंड करून गाळून घ्या काढा तयार.

 टीप: अडुळसा च्या औषधी गुणधर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. अडुळसाचे मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण अडुळसाचे जास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.
         अशा प्रकारे अडुळसा ही अनेक आयुर्वेदिक औषेधी गुणधर्मामुळे महत्वाची ठरते. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवा.आपण अशाच प्रकारे अनेक वनौषधी, वनस्पती व पर्यावरणातील महत्व पूर्ण घटकविषयी लेख घेऊन येत असतो. तर यात सहभागी व्हा.
           धन्यवाद.....
Previous Post Next Post