ताप आल्यावर घरगुती उपाय | ताप आल्यावर आयुर्वेदिक औषध काय ? | तापाचे प्रकार कोणते ?

  तापा विषयी माहिती व ताप आल्यावर घरगुती आयुर्वेदिक औषधी उपाय

नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात अनेक वेळा अनेक कारणाने आपल्याला अचानक ताप येतो. अशा वेळी आपल्याकडे औषधे नसल्यावर आपण घाबरून जात असतो. ताप कमी असल्यावरच उपाय करणे गरजेचे असते. आपल्या घरातील लहान मुलांना , वृद्धांना अनेकांना ताप येतो तेव्हा काळजी आपल्यालाच असते. पण थोडा थोडा ताप असल्यावर लगेच उपचार करणे फायद्याचे ठरते. पण प्रत्येक वेळेस दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नसते, मेडिकल मधून औषधे घेण्याची आवश्यकता नसते, आपण त्या तापावर घरच्या घरी आयुर्वेदिक उपचार करू शकतो. आणि नंतर दवाखान्यात घेऊन जाऊ शकतो. ताप आल्यावर तो ताप कोणता आहे ? तापाचा प्रकार कोणता आहे? ताप का येत असतो ? ताप आल्यावर घरगुती उपचार कोणते ? ताप येऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे ? हे सर्व प्रश्न आपल्याला पडत असतात. तर चला तर आज आपण जाणून घेऊ तापाचे काही प्रकार आणि तापावर औषधी आयुर्वेदिक घरगुती उपचार व ताप येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी

ताप आल्यावर घरगुती उपाय | ताप आल्यावर आयुर्वेदिक औषध काय ? | तापाचे प्रकार कोणते ?


ताप होऊ नये म्हणून काय करावे व ताप झाल्यावर काय उपचार करावे तापाचे प्रकार कोणते.
रोग ताप


1] तापाचे प्रकार 

  तापाचे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर आज आपण जाणून घेऊ काही तापाचे प्रकार जे झाल्यावर आपण घरगुती उपाय काय करू शकतो ? जर आपण बघितले तर आपल्याला दिसून येईल तापाचे मुख्य तीन प्रकार आहेत.a) सतत राहणारा ताप b) कमी-जास्त राहणारा ताप c) मुरलेला ताप किंवा हाडीचा ताप.

A) सतत राहणारा ताप 

सतत राहणारा ताप म्हणजे जर का एकदा आपल्याला ताप यायला सुरुवात झाली की तो उतरायचं नावच घेत नाही. याचे उदाहरण द्यायचे म्हटले तर जर कुणाला कावीळ, विषमज्वर झाला की येणारा ताप हा लवकर निघत नसतो. याला आपण सतत राहणारा ताप बोलू शकतो. सतत राहणार आता माणसाला झाल्यावर योग्य वेळी उपचार करणे गरजेचे ठरते.

B) कमी जास्त होणारा ताप

  न्युमोनिया, मलेरिया झाल्यावर जो थंडी वाजून ताप येत असतो तो म्हणजे कमी-जास्त होणार आता असे म्हटले जाते. जखम झाली आणि जखमेतून पु-या लागलं, आपण पाण्यात भिजलो आणि सर्दी व्हायला लागली की येणारा थंडी ताप म्हणजे कमी जास्त होणारा ताप असे आपण म्हणू शकतो. या तापाच्या प्रकारात येणारा ताप अचानक जास्त होत असतो आणि अचानक कमी होऊन नाहीसा होतो आणि पुन्हा एकदा अचानक जास्त होत असतो. असा कमी जास्त ताप येत असतो. या तापामध्ये रुग्णाला कळतच नाही की आपण बरे झालो की नाही म्हणून डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.

C) मुरलेला ताप किंवा हाडीचा ताप

  हा प्रकार व नाव लोकांनी प्रचलित केले आहे. काही वेळेस जेव्हा ताप येतो. तो कमी न होता सतत शरीरात असतो. हा ताप अगदी कमी असला तरी बरेच दिवस रुग्णाच्या शरीरात राहतो अशावेळी ताप मुरला किंवा हाडे चा ताप आला आहे असे म्हणतात. हा ताप असल्यावर अंग सतत दुखते आणि ताप थोडा थोडा का होईना पण दीर्घकाळ राहतो. पण डॉक्टरांच्या योग्य उपचाराने त्याच्यावर नियंत्रण करून आपण बरे होऊ शकतो.

2) आपल्याला ताप का येत असतो किंवा होत असतो.

असे म्हणतात की ताप हा आजार नसून अनेक आजारांचे लक्षण आहे. ताप होण्याचे मुख्य कारण म्हणजे रोगजंतू, जिवाणू होय. ताप हे लक्षण आहे असे का म्हणता येईल, कारण ताप आला की सर्दी आहे असे आपल्याला समजते, जखम झाली की ताप येतो, काविळ झाली की ताप येतो , अशा अनेक उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल कि ताप हा अनेक रोगाची सुरुवात म्हणजे लक्षण आहे. लहान मुलांना काय वेळेस ताप येत असतो याचे मुख्य कारण म्हणजे विषाणू मग त्यात कांजण्यांचे किंवा गलगंड यामुळे येणारे ताप. आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती आपल्याला या तापापासून पासून बरे करत असते. टायफाईड विषमज्वर यामध्ये येणारा ताप हा आपल्या अस्वच्छतेमुळे म्हणजेच अस्वच्छ पाणी किंवा अस्वच्छ अन्न खाल्ल्यावर जिवाणू आपल्या आतड्यात चिटकुन बसतात तेव्हा हातात होत असतो. आपल्याला ताप आल्यावर तोता पसरवण्याचे काम डास करतच असतात . अशाप्रकारे रोगजंतू, जिवाणू, विषाणू यांच्यामुळे आपल्याला ताप येत असतो.

3) ताप येऊ नये म्हणून काय करावे ?

  आपल्याला ताप होऊ नये किंवा आपल्याला ताप किंवा आपल्या घरातील कोणालाही ताप येऊ नये यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
  • 1) तापाचा बंदोबस्त करताना आपण स्वच्छता बाळगली पाहिजे. आपण स्वतः स्वच्छ राहून आपला परिसर सुद्धा स्वच्छ ठेवायला हवा.
  • 2) आपल्या परिसरात डास होणार नाही याची काळजी. कारण तापाचे जीवजंतू जिवाणू विषाणू यांचा प्रसार करण्यासाठी डासच कारणीभूत असतात.
  • 3) संतुलित आहार व व्यायाम त्यांचा आपल्या दररोजच्या जीवनात महत्त्व देऊन उपयोग करावा
  • 4) टायफाईड सारखे ताप होऊ नये म्हणून आपले पिण्याचे पाणी, पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवाव्या व उघड्यावरचे जेवण करणे टाळावे.
  • 5) आपल्या परिवारात कुणालाही ताप आल्यावर त्याचा प्रसार होण्याअगोदर त्याच्यावर लवकरात लवकर उपचार करावा किंवा त्याला दवाखान्यात घेऊन जावे.
  • 6) डासांच्या पैदा सावर नियंत्रण व त्यांच्यापासून आपल्या स्वतःचे संरक्षण करावे.

  • 4) ताप आल्यावर घरगुती आयुर्वेदिक औषध उपचार.

  • जर आपल्याला किंवा आपल्या परिवारात कुणाला ताप येत असल्यास तात्पुरता घरगुती आयुर्वेदिक औषध उपचार करून आपण बरे होऊ शकतो किंवा तापावर नियंत्रण ठेवू शकतो.
  • 1) ताप आलेल्या व्यक्तीला पिण्यास भरपूर पाणी आणि खाण्यास पातळ पदार्थ द्यावे.
  • 2) ताप आलेल्या व्यक्तीचे शरीर ओल्या कापडाने पुसून काढावे याच्याने ताप कमी होतो.
  • 3) ताप आल्यावर त्या व्यक्तीस जास्त पांघरून न देता दारं खिडक्या उघडा ठेवून हवा खेळती राहून द्यावी.
  • 4) तापावर औषधी वनस्पती गुळवेल चा उपयोग करताना त्याचे छोटाले तुकडे घ्यावे व त्यात सुंठीची पावडर/ भरड टाकावी. आणि यात पाणी टाकून गरम करून उकळवून घ्यावे. ताप आल्यावर हे ताजे औषध करून रोगी ला पिण्यास द्यावे.
  • 5) औषधी वनस्पती पळस याची फुलांचे चूर्ण तापावर गुणकारी औषध आहे.
  • 6) जर ताप आला तर करंज या वनस्पतीची पाने घेऊन त्याचा रस करून रोग्यास पिण्यास द्यावा.
  • 7) अर्जुन या वनस्पतीची साल ताप आल्यावर काढा करून प्यायला दिले जाते.
  • 8) कडू लिंबाची साल घेऊन त्याचा काढा तयार करून रोग्याला ताप आल्यास पिण्यास द्यावा असे म्हणतात.
  • 9) सर्दी तापात निरगुडी च्या वनस्पतीचा काढा करून प्यायला दिला जातो.
  • 10) शापू आंब्याची सालीचा काढा तापात रुग्णास प्यायला दिला जातो.
औषधी वनस्पतींचा उपयोग करत असताना योग्य काळजी घ्यावी आणि ती वनस्पतीच आहे हे ओळखता यायला हवे. औषधी वनस्पती समजून कोणती वनस्पतीचा काढा करून रुग्णास प्यायला देऊ नये पूर्ण माहिती आणि वैद्याचा किंवा डॉक्टरचा सल्ला घ्यावा. औषधी वनस्पतीचा उपयोग प्रमाणात करावा. पूर्ण माहिती शिवाय उपयोग करण्याचा प्रयत्न करू नये.
ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि महत्त्वाची वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून माहितीसाठी कॉमेंट करा.
धन्यवाद.

लोकप्रिय पोस्ट 


FAQ'S

1) तापाचे मुख्य प्रकार कोणते ?
Ans. तापाचे मुख्य तीन प्रकार आहेत ?
      1) सतत राहणारा ताप 2) कमी जास्त होणारा ताप 3) मुरलेला किंवा हाडे चा ताप.

2) तापाचे काही उदाहरणे सांगा ?
Ans. सर्दी पासून होणारा ताप, टायफाईड चा ताप, कावीळ चा ताप, जखमी पासून आलेला ताप, विषमज्वर ताप असे अनेक प्रकारे आपल्याला ताप होतो.

3) ताप होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ?
Ans. ताप होऊ नये म्हणून आपली स्वच्छता व आपल्या परिसराची स्वच्छता राखावी. डासांचा प्रतिबंध करावा. योग्य आहार व व्यायाम याचा समावेश दैनंदिन जीवनात करावा.

4) मुरलेला किंवा हाडी चा ताप म्हणजे काय ?
Ans. जेव्हा खूप कमी असलेला ताप भरपूर दिवस रुग्णाच्या शरीरात राहतो तेव्हा तो ताप मुरला आहे किंवा हाडीचा ताप आहे असे म्हणतात.उदा.


5) सतत राहणारा ताप म्हणजे काय ? उदाहरण
Ans . ताप आल्यावर जो लवकर उतरतच नाही त्याला सतत राहणारा ताप म्हणतात. उदा. कावीळ चा ताप.

6) कमी जास्त होणारा ताप म्हणजे काय ? उदाहरण
Ans. आपल्याला ताप आल्यावर तो कमी झाले असा भासते आणि अचानक तू ताप जास्त वाढतो आणि विशिष्ट वेळेला पुन्हा कमी होतो आणि पुन्हा वाढतो याला कमी-जास्त होणारा ताप म्हणतात. उदाहरणार्थ मलेरिया, न्युमोनिया

7) ताप येण्याची कारणे ?
Ans. ताप येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपली आणि आपल्या परिसराची अस्वच्छता आणि योग्य आहार व व्यायाम न करणे.

8) ताप आल्यावर काय खावे आणि खाऊ नये ?
Ans. ताप आल्यावर आंबट, गोड, भात असे पचनास जड जाणारे पदार्थ खाऊ नये. व जास्तीत जास्त पाणी प्यावे व पातळ पदार्थ, पोळी खावी.

9) लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे ?
Ans. 6-7 वर्षावरील लहान मुलांना ताप आल्यास ओल्या कापडाने शरीर पुसून काढावे. ताप आल्यावर शरीराचे तापमान वाढत असते म्हणून तापमान करण्यासाठी कांद्याचा उपयोग करावा. म्हणजेच कांद्याचे छोटे-छोटे तुकडे करून त्यांच्या पायावर ठेवावे.

10) तापावर औषधी गोळ्या कोणत्या ?
Ans. ताप आल्यावर औषधी गोळ्या म्हणून प्रथम ऍस्पिरिन आणि पॅरासिटामॉल व पेमोल या गोळ्या देतात.


Previous Post Next Post