मनुष्य भक्षक झाडाचे बेट | प्राणी , माणसांना खाणारे झाड

    मनुष्य भक्षक झाडाचे बेट

प्राणी , माणूस , खाणारे झाडं व बेट 


आपलं जग, विश्व, किंवा पृथ्वी ही फार मोठी आहे. माणसाने समुद्र पासून अफाट माउंट एवरेस्ट पर्यंत मजल मारली आहे. या पृथ्वीच्या पोटात दडून बसलेल्या अनेक रहस्य उघडून काढलेले आहेत. या पृथ्वीतलावर अनेक रहस्य आहेत जी मानवाला माहिती नाहीत, अज्ञात आहेत. फार फार वर्षापूर्वी अनेक प्राणी, अनेक प्रकारची झाडे होती, जी आपण कधी बघितली नाही आणि आता बघता येणार नाही कारण ती लोप पावलेली आहेत. इतिहासात सापडलेल्या अवशेषांवरून पूर्वी डायनासोरचे अस्तित्व होते हे तर सिद्ध होतेच. पण फार वर्षापूर्वी रहस्यमाई झाडे पण या पृथ्वीवर होती हे आपल्याला माहीत हवे. आज आपण जाणून घेऊ इतिहासात काही बघण्यात आलेली नरभक्षक , प्राणी भक्षक झाडे. प्राण्यांना, वनस्पतींना, किटकांना एवढच काय माणसालासुद्धा खाणारी झाडे होती असे म्हणतात. चला तर जाणून घेऊ नरभक्षक , माणसाला खाणारे झाड व त्याच्या बेटा विषयी माहिती.


मनुष्य भक्षक झाडाचे बेट
मनुष्य भक्षक झाडाचे बेट



      आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ मादागास्कर नावाचे एक बेट आहे. या बेटाचा काही भाग निबिड अरण्याने व्यापलेला आहे. त्या जंगलात गेल्या शतकापासून एक मनुष्य पक्षात झाड होते. या झाडाच्या लांब निमुळत्या फांद्या समुद्रात आढळणाऱ्या " ऑक्टोपस " या प्राण्याच्या नांग्या सारख्या होत्या. कोणताही प्राणीच काय, पण माणूसही त्या झाडाजवळ केला की, झाडाच्या फांद्या आपोआप आवळल्या जातात आणि त्याच्या आवाक्यात आलेल्या प्राण्याला विळखा घालून पकडतात. या वेळच्या सापडलेल्या प्राण्याची मग धडगत नसे. त्या काटेरी फांद्या विळख्यात अडकलेल्या प्राण्यांच्या अंगात आपले काटे रुत्वत व त्याचे रक्त शोषून घेत. अर्थात या मारेकरी फांद्या शेवटी त्या प्राण्याचा बळी घेत. म्हणून "मनुष्य भक्षक झाडाचे बेट" या नावाने पूर्वी हे बेट ओळखलं जाई. मादागास्कर बेटाचा गव्हर्नर असलेल्या चेस सालमन ओसबॉर्न याने 1924 साली "मादागास्कर- द लँड ऑफ मेन ईटिंग ट्री " या नावाचे पुस्तक प्रसिद्ध करून या झाडाची माहिती जगापुढे आणली.


मनुष्य भक्षक झाडाचे बेट
मनुष्य भक्षक झाडे


 मध्य अमेरिकेतील निकराग्वूआ येथे एक " प्राणी भक्षक " झाड . तिकडे संशोधनासाठी गेलेल्या डस्टर नावाच्या वनस्पती शास्त्राला आढळते. या शास्त्रज्ञाचा कुत्रा हा प्राणी भक्षक झाडाच्या विळख्यात सापडला होता, पण डस्टन याने मोठ्या हिमतीने आपल्या सुरीने झाडाच्या फांद्या कापून कुत्र्याची अर्धमेल्या अवस्थेत सूटका केली. या घटनेचे वृत्त " इलस्ट्रेटेड लंडन " न्यूज या वृत्तपत्रात 1992 साली " मॅन इटिंग ट्री ऑफ निकराग्वूआ " या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते.

हे माहिती आहे का


ही माहिती वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल . पण यावरून लक्षात येते की आपली पृथ्वी किती मोठी आहे . आणि त्यात किती रहस्य दडलेले आहेत.
या नरभक्षक , प्राणी भक्षक झाडा विषयी तुम्हाला काय वाटते हे कॉमेंट करून नक्की कळवा. अशाच नवीन नवीन पोस्ट वाचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि पुन्हा पुन्हा आपल्या ब्लॉगला भेट करा.
धन्यवाद.
माणसांना खाणारे झाड, mansana khanare zad , 

Previous Post Next Post