गावाकडचा डॉक्टर (वैद्य) कडुलिंब | कडुलिंब (Azadirachta indica) l कडू लिंबाची माहिती

    गावाकडचा डॉक्टर (वैद्य) कडुलिंब


कडूलिंब(Azadirachta indica) l कडू लिंबाची माहिती


                 इतिहासाची पाने उघडून बघितल्यास अनेक औषधी वनस्पतीची माहिती आपल्याला मिळते अश्याच एका वनस्पती ची माहिती आज आपण घेणार आहोत. खेड्यातला वैद्य, डॉक्टर म्हणून ज्या वृक्षाचीओळखा देशभर आहे असा वृक्ष म्हणजे सर्वांचा परिचय असलेला कडुलिंब.कडुनिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याचे नाव कडूलिंब. कडुलिंब हा antibacterial, antifungal, आहे.

( कडुलिंब )Azadirachta indica

या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्चव कडू असतात. याच्या अनेक उपयोगांमुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे. कडू असल्यामुळे 'जंतुघ्न'हा याचा गुणधर्म पशु-पक्षी, पीक, मानव या सर्वांसाठी वापरला जातो कडुनिंबाचा महान महिमा आयुर्वेदात गायला गेला आहे. या झाडाला अनेक औषधी गुणधर्म आहेत. प्राचीन काळापासून कडूलिंबाचा उपयोग बर्‍याच रोगांच्या उपचारासाठी केला जात आहे. आजही बरीच औषधे अशी आहेत ज्यात कडुनिंबाच्या पानांचा रस, कडुलिंबाच्या झाडाचे इतर भाग वापरतात. कडुनिंबाच्या झाडाची सावली वेगळी आहे कारण वातावरणात सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या झाडांपैकी हे एक झाड आहे."चारकसहिता" या प्राचीन ग्रंथामध्ये मध्ये कडुलिंबच्या वर्णन "आरिष्ट" असे केले आहे. आरिष्ट म्हणजे सर्व रोगांवर गुणकारी.कधीही नष्ट न होणारे.अनेक प्रकारचे रोग बरे करणारे हे झाड आहे.फार प्राचीन काळापासून कडुलिंब रोगांवर उपचार करण्यास वापरण्यात येतो.कडुलिंबाचा प्रत्येक भाग औषधी गुणानी परिपूर्ण आहे.कडुलिंब मध्ये १०० आधीक प्रकारची जैवसायुंगे असतात.जी आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.आपल्या आरोग्याच्या प्रत्येक बाजू मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या इ जीवनसत्व व फॅटी असिड ची रेलचेल आढळते .जास्त ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पतीमध्ये कडूलिंबाची गणना होते .त्यामुळे कडुलिंब व त्याचे औषधी गुणधर्म विषयी जाणून घेऊ.

कडूलिंब पाने व काड्या


        १)कडुलिंब झाडाचे स्वरूप ( Nature of Azadirachta indica)

कडुलिंब हा मोठा, ३०-६० फूट उंच वाढणारा छायादार वृक्ष आहे. याला साधारणत: ९ ते १५ इंच लांब देठ व त्यास सम अंतरावर, हिरव्या रंगाची २-३ सेंटिमीटर लांबीची, टोकदार, करवतीसारखे दाते असणारी ९ ते १५ पाने येतात . पाने ही वर्षभर हिरवी असतात. पानांच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या (oblique leaf ) सुरू होतात. कडुलिंबाची फुले पांढरी, लहान व सुगंधित असतात. तर फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी होतात. जवळपास ३-४ मिलिमीटर लांब असलेल्या या फळांत प्रत्येकी एक बी असते.त्या बियांना निंबोळी किंवा लिंबोणी असे म्हणतात. कडूलिंब चे झाडं वर्षभर हिरवी असतात म्हणून रस्त्याच्या कडेला याच्ची लागवड करतात.कडुलिंबाचे झाड मोठे म्हणजे सर्वसाधारणपणे आठ ते दहा मीटर उंच वाढते. याचे खोड सरळ वाढते; नंतर याला फांद्या फुटतात.या झाडाची साल काळी व खडबडीत असते. याची पाने हिरवी,मध्यम आकाराची व लांबट असतात. पानाच्या कडेने नक्षी असते. एका काडीला दहा ते बारा पाने येतात. पानाचा देठ बारीक असतो. चव कडू असते.

कडुलिंब पाने व फुले


    २)कडुलिंबाची वितरण व मुळ ठिकाण ( origin and Distribution ofAzadirachta indica)


कडुनिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे.कडुनिंबाचे झाड दुष्काळापासून प्रतिकार करण्यासाठी प्रख्यात आहे. हे साधारणपणे उप-कोरडे आणि कमी आर्द्रता असलेल्या क्षेत्रात फुलते जेथे वार्षिक पाऊस 400 ते 1200 मिमी दरम्यान असतो. येथे वार्षिक पाऊस 400 मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडणार्‍या क्षेत्रातही वाढू शकतो परंतु अशा परिस्थितीत त्याचे अस्तित्व भूजल पातळीवर अवलंबून असते. कडुनिंब वेगवेगळ्या प्रकारच्या मातीमध्ये वाढू शकते, परंतु या खोल व वालुकामय मातीसाठी जिथे पाण्याचा निचरा चांगला आहे, ते चांगले आहे. दलदलीत, गाळ असलेल्या ठिकाणी,बर्फ पडत असलेल्या ठिकाणी मात्र कडुलिंब आढळत नाही .हे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामानातील एक फलदार झाड आहे आणि 22-22 डिग्री सेल्सियस दरम्यानचे सरासरी वार्षिक तापमान सहन करू शकते. हे अत्यंत उच्च तापमान सहन करू शकते, परंतु 4 डिग्री सेल्सियस तापमानापेक्षा कमी होते. कडुनिंब हे विशेषतः किनारपट्टी, दक्षिणेकडील जिल्ह्यांसाठी जीवन देणारे झाड आहे. दुष्काळग्रस्त (कोरडे प्रवण) भागात सावली देणार्‍या काही झाडांपैकी हे एक आहे. हे एक नाजूक झाड नाही आणि कोणत्याही प्रकारचे पाणी गोड किंवा खारटपणामध्ये देखील टिकते. हा वृक्ष तामिळनाडूमध्ये खूप सामान्य आहे आणि तो रस्त्यांच्या कडेला छायादार वृक्ष म्हणून उगवतो, या व्यतिरिक्त लोक त्यांच्या अंगणात देखील हे झाड उगवतात. कडुनिंब हे भारतीय वंशाचे एक झाडाचे झाड आहे. शतकानुशतके हे शेजारच्या देशांमध्ये - पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार (बर्मा), थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका इत्यादींमध्ये आढळते. पण गेल्या दीड वर्षात हे झाड भारतीय उपखंडातील भौगोलिक सीमा ओलांडून आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिणपूर्व आशिया, दक्षिण आणि मध्य अमेरिका आणि दक्षिण प्रशांत बेटांच्या अनेक उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णदेशीय देशांमध्ये पोहोचला आहे. त्याचे वनस्पति नाव आझरिका इंडिका आहे. कडुनिंबाचे वनस्पति नाव त्याच्या संस्कृत भाषा निंबा पासून घेतले गेले आहे.शिवकाशी (शिवकाशी) सारख्या अति कोरड्या भागात, ही झाडे मोठ्या प्रमाणावर जमिनीवर लावल्या जातात आणि त्यांच्या सावलीत फटाके बनविण्याचा कारखाना म्हणून काम करतात.

कडुलिंब फळे


   ३) शास्त्रीय नाव व शास्त्रीय वर्गीकरण (Binomial Name and scientific classification of Azadirachta indica)):

 a)शास्त्रीय नाव (Binomel name):


Azadirachta indica

b) शास्त्रीय वर्गीकरण (scientific classification):


Scientific classification
Kingdom:Plantae
Clade:Tracheophytes
Clade:Angiosperms
Clade:Eudicots
Clade:Rosids
Order:Sapindales
Family:Meliaceae
Genus:Azadirachta
Species:A. indica
Binomial name: Azadirachta indica

 (४) कडुलिंबाची नावे व जाती( Name and Type of Azadirachta indica) :


-इंग्रजी - Indian Lilak, Neam, Margosa Tree
-कानडी - बेवु
-गुजराती - लींबडो
-तामिळ - कड्डपगै/ अरुलुंदी
-तेलुगु - निम्बमु
-बंगाली - नीमगाछ
-मलयालम - वेप्पु/ अतितिक्त
-लॅटिन - Azadirachta indica
-संस्कृत - निम्ब/ तिक्तक/ अरिष्ट/ पारिभद्र/ पारिभद्रक/ पिचुमंद/ पिचुमर्द
-हिंदी - नीम/ नीमला

५) शास्त्रीय गुणधर्म आणि औषधी गुणधर्म(Scientific and medicinal properties of Azadirachta indica)


a)शास्त्रीय गुणधर्म(scientific properties):


 कडुलिंब मध्ये १०० हून आधीक प्रकारची जैवसायुंगे असतात.जी आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.आपल्या आरोग्याच्या प्रत्येक बाजू मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या इ जीवनसत्व व फॅटी असिड ची रेलचेल आढळते 

b) कडुलिंबाचे औषधी गुणधर्म( medicinal properties)

  •          फार प्राचीन काळापासून कडुलिंबाची महती लोकांनी सांगितली आहे.कडुलिंबाचा प्रत्येक भाग हा औषधी गुणांनी संपन्न आहे.चला तर जाणून घेऊ कडुलिंबाचे औषधी उपयोग.
  • 1)ताप आल्यास कडुलिंबाचा पाला (पाने) यांचं काढा करून पिण्यास दिला जातो.किंवा कडुलिंबाचा पानाची पावडर करून ती पाण्याबरोबर खाण्यास दिली जाते.ताप आल्यास सकाळ-संध्याकाळ कडुलिंबाच्या सालीच्या काढा घेतात.
  • 2)त्वचारोग(दादरी, नायटा,गजकर्ण इत्यादी),डोक्यात जुवा,कोंडा,झाल्यास कडुलिंबाची पाने (डहाळी) पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ केली जाते.त्यामुळे त्वचारोग,जुवा,कोंडा कमी होतात.
  • 3) कडुलिंबाच्या झाडाखाली बसून राहिल्यास भरपूर ऑक्सिजन मिळून आपल्याला चांगले वाटते. कडुलिंबाच्या पानांवर झोपल्यास काजण्या,त्वचारोग बरे होण्यास मदत होते.
  • 4)कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. काही लोक हा पेलाभर रस रोज पितात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.
  • 5) कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. 
  • 6)कडुलिंब मुळव्याध व पोटातील कृमींवर उपयोगी आहे. 
  • 7)कडुलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. 
  • 8)साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन, पेस्ट यामध्ये पण कडुलिंबाचा वापर करतात.
  • 9)कडुलिंबाचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात. मधुमेह या रोगा मध्ये नीम अतिशय ऊपयुक्त आहे.यक्रुत विकारांमधे नीम त्याच्या कडू रसाने काम करते. 
  • 10)रोज अर्धा कप नीम रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.
  • 11)आयुर्वेदानुसार कडुलिंबाचा उपयोग जंतुनाशक ,सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वरावर, कृमिनाशक, दाहावर, महारोगावर, बाळंतरोगावर, अफूच्या उतारासाठी, जखमेवर, मुळव्याध, मधुमेह, इ. अनेक रोगांवर उपयुक्त आहे.
  • 12) कडुलिंबापासून बनणाऱ्या औषधी मध्ये पंचनिंबचूर्ण, अनेक औषधांमधील एक प्रमुख घटक.
  • 13)कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे लावल्याने केसांची वाढ जोमाने होते. केसांच्या अनेक समस्या दूर होतात.
  • 14)पोटात जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडा (अगदी चिंचोक्याएवढाच) गूळ घालून तीन दिवस प्याल्यास जंत बाहेर पडतात.

  • 15)अंगाला खाज सुटत असेल तर पानाचा रस सर्व अंगाला किंवा आंघोळीच्या गरम पाण्यात दहा -बारा कडुलिंबाची पान ठेचून घालावी.
  • 16)कडुलिंबाची पान जखमेवर कुटून लावल्यास जखम लवकर बरी होते. निबोण्यांचे तेलही औंषधी आहे.
  • 17)रक्त दूषित झाल्यावर त्वचेवर डाग पडतात, तेव्हा कडूलिंबाचे तेल लावतात. औषधी गुणधर्म आहेत. या झाडाचे साल, मूळ, पान, बिया सर्वच औषधीं आहेत.
  • 18) कडुलिंबाचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे कडुनिंब हे अत्युत्तम जंतुनाशक आहे. ह्याच्या पानांची पूड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयोगी तर पडतेच पण त्यापेक्षाही रोपांना किडीपासून दूर ठेवते.
  • 20) कर्करोग झाल्यास त्याला नियंत्रित करण्यास कडुलिंब मदत करतो.त्यासाठी डॉक्टर सल्याने उपयोग करावा. शरीरातील कर्कपेशी नियंत्रित करण्यास मदत .
  • 21) कडुलिंबा यांच्या पानांमध्ये मध्ये calcium आणि खनिजे असतात यामुळे आपली हाडे मजबूत होतात.हातपाय डोकेदुखी,कंबरदुखी यासाठी कडुलिंबाच्या तेलाने मालिश करावी.
  • 22) कडुलिंबामध्ये निंबिडोल (Nimbidol), गेडूनिन (gedunin) ही सयुगे बुरशी नष्ट करण्यास मदत करतात.
  • 23)कडूलिंबाची पाने जंत,पोटदुखी, चायपचन क्रिया सुधारण्यास मदत करतात.
  • 24) कडुलिंबाची ताजी फुले व मध सकाळी उपाशी पोटी घेतल्यास आपले वजन नियंत्रित होण्यास मदत होते.

६) कडुलिंबाचे धार्मिक स्थान / महत्व (Religious importance of Azadirachta indica):


आपल्या भारत देशामध्ये मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडवा या दिवशी होते. त्या दिवशी गुढी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड, मीठ, गूळ घालून केलेली चटणी खावी, अशी प्रथा आहे. हिंदूंचे नवीन शालिवाहन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते. चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून नाना प्रकारचे आजार होतात. अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे सेवन सांगितले आहे.

७) कडूलिंबाची शेती.( Azadirachta indica forming)

आपण आपल्या शेताच्या कडेला कडूलिंबाची झाडे लावून शेती करू शकतो.यासाठी कडुलिंबाची रोपटी लाऊन झाल्यावर त्याची निगा फक्त काही काळाकरीता करावी लागते .नंतर ते आपल्याला बरोबर मोठे होते.याने आपली इतर कसलीही शेती असेल त्यालाच फायदा होतो .आपली शेतीत कीटक ,रोग नियंत्रित राहतात.

अशी माहिती महत्वाची असते 👈

8)कडुलिंबाचा काढा कसा बनवावा:


काढा बनविण्याची पद्धत/प्रक्रिया: ज्या वनस्पवनस्पतीती चा काढा बनवणार ती वनस्पती/वनस्पती च्या भागाचा काढा बनविणार तो भाग उदा.पाने, फूले,फळे इत्यादी.घेऊन त्या कुटून ,बारीक करून तयार झालेला कुटा, पावडर, 1:1 असे पाणी घेऊन तो कुटा पाण्यात टाकावे. नंतर ते मिश्रण उकळून, उकळून सर्व कुटा पावडर मधील द्रव्य निघाल्यावर ते थंड करण्यास ठेवावे .नंतर ते गाळून घ्यायचे.हा आपला वनस्पती काढा तयार झाला. उदा. कडुलिंब चा पाला ,पाने घ्या कुटून बारीक करा .पाण्यात 1:1 असे टाका. उकळून घ्या ,थंड करून गाळून घ्या काढा तयार.
 टिपः कडुलिंबाच्या औषधी गुणधर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. कडुलिंबा चे मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण कडूलिंबाचे जास्त सेवन केल्याचे तोटे पण आहेत.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.

         अशा प्रकारे कडुलिंब ही अनेक आयुर्वेदिक औषेधी गुणधर्मामुळे महत्वाची ठरते. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवा.आपण अशाच प्रकारे अनेक वनौषधी, वनस्पती व पर्यावरणातील महत्व पूर्ण घटकविषयी लेख घेऊन येत असतो. तर यात सहभागी व्हा.
           धन्यवाद.....








Previous Post Next Post