पोटदुखी आणि पचन क्रिया बिघडल्यास घरगुती उपाय आणि जेवणामध्ये कोणत्या आहारात सामावेश करावा

पचनक्रिया बिघडलीय?, आहारात या गोष्टींचा करा समावेश

नमस्कार मित्रांनो ,
       आपण दररोजच्या जेवणात काय वेगळं खाल्लं किंवा जड जेवण खाल्लं पाहिजे पचण्यास आपल्याला जड जातं अशा वेळी आपल्याला खूप त्रास होत असतो. आपली पचन क्रिया व्यवस्थित होत नाही म्हणून पोट दुखायला सुरुवात होते. अशा वेळी आपण उपचार तर करतच असतो. मात्र पचनक्रिया बिघडल्यास अशावेळी आपल्या आहारात काय घ्यावे आणि काय घेऊ नये हे आपल्याला माहिती पाहिजे. नाही तर पचन क्रिया पोट दुखी बंद व्हायची सोडून जास्त होऊन जाईल. म्हणून आज आपण जाणून घेऊ की पचन क्रिया बिघडल्यास किंवा पोट दुखी असल्यास आपण जेवणात आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावे कोणते पदार्थ खावे. आणि पचन क्रिया बिघडल्यास कोणते पदार्थ खाऊ नये ज्यांनी आपली पचनक्रिया बिघडू शकते किंवा पोट दुखेल आमंत्रण भेटू शकते. चला तर जाणून घ्या पचन क्रिया किंवा पोट दुखी झाल्यास कोणते पदार्थ खावे आणि कोणते खाऊ नये. पचनक्रिया सुधारण्यास घरगुती उपाय.

पोटदुखी आणि पचन क्रिया बिघडल्यास घरगुती उपाय आणि जेवणामध्ये कोणत्या आहारात सामावेश करावा

पचनक्रिया सुधारण्यास कोणते पदार्थ खावे
पचन क्रिया बिघडल्यास घरगुती उपाय 

पचनक्रिया सुधारण्यास कोणते पदार्थ खावे

1.पचनक्रिया सुधारण्यासाठी पपई हे फळ महत्त्वपूर्ण कामगिरी निभावते. पचनक्रियेमध्ये झालेला बिघाड पपईचे सेवन केल्यास 24 तासांच्या आत सुधारते.

2.दहीमध्ये असलेले रासायनिक गुणधर्म अन्नपदार्थ पचवण्यास मदत करतात. अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेसच्या समस्यास असल्यास एक वाटी दही खावे. या समस्या दूर होण्यास मदत होईल.

3.केळ्यांमध्ये फायबरचे प्रचंड प्रमाणात असते. केळ्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. शिवाय, आतड्यांमध्ये होणार जळजळदेखील कमी होते. जेवणानंतर एक केळे खाण्याची सवय लावल्यास ते आरोग्यास फायदेशीर ठरते.

4.हळदीमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कोमट पाण्यामध्ये कच्ची हळद मिसून प्यावे. गॅसेसचा त्रास कमी होतो

5.अननसमध्ये ब्रोमेलिन एन्जाइम असतात, हे पचनक्रिया उत्तम करण्यास फायदेशीर ठरतात. जेवणानंतर अननस किंवा अननसाच्या रसाचे सेवन करावे.

6.नारळाच्या तेलामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबत अपचन, बद्धकोष्ठता, अॅसिडिटीसारखा त्रासही कमी होतो.

7.पुदिनाच्या सेवनामुळे पोटाला थंडावा मिळतो. बिघडलेली पचनक्रिया सुधारते. पुदिन्याचा रस किंवा पाने चावून खाल्ल्यास पोटातील गॅस, पोटदुखी, पोटाला आतील बाजूनं आलेली सूज इत्यादी समस्या कमी होतात.
पोटदुखी आणि पचन क्रिया बिघडल्यास घरगुती उपाय आणि जेवणामध्ये कोणत्या आहारात सामावेश करावा
पोटदुखी

पचन क्रिया बिघडू नये म्हणून कोणते पदार्थ जास्त खाणे टाळावे.

1) तेलकट मसालेदार पदार्थ आपले जेवणामध्ये आपल्या आहारामध्ये कमीत कमी घ्यावे शक्यतो घेणे हेही टाळावे.
2) जे पदार्थ पचनास जड जातात ते शकतो आहारामध्ये घेणे टाळा आणि पचनास हलके पदार्थ खावे.
3) पचन क्रिया बिघडलेली असल्यास उघड्यावरील तसेच फास्ट फूड खाणे टाळावे.
4) शेले अन्नपदार्थ खाणे शक्‍यतो टाळावे आणि त्याची गरज पडल्यास गरम करून खावे.
6) आपल्या आहारामध्ये हलके पदार्थ , फळे , पालेभाज्या , फळभाज्या यांचा समावेश आवर्जून करावा.

FAQ'S 

1) पचन क्रिया सुधारण्यासाठी काय करावे ?
Ans . पचन क्रिया सुधारण्यासाठी दररोज सकाळी व्यायाम , योगासने प्राणायाम तसेच जेवणामध्ये पालेभाज्या फळभाज्या आणि हलके पदार्थ खावे आणि पाच फूट , तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
2) पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारामध्ये काय समाविष्ट करावे ?
Ans . पचन क्रिया सुधारण्यासाठी आहारामध्ये फळभाज्या , पालेभाज्या तसेच हलके पदार्थ खावे.
3) कोणते आसन नियमित केल्याने पचनक्रिया सुधारते ?
Ans . धनुरासन
धनुरासानाने पोटाचे स्नायू ताणले जातात आणि बळकटी येते. हे आसन केल्याने बद्धकोष्ठ, आणि पाळीचा त्रास दूर होतो
4) अपचनामुळे झालेला पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय 
Ans . पोटात गॅस झाल्यास लिंबूआले यांचा 11 चमच्या रस जेवणानंतर घ्यावा गॅस कमी करण्यास मदत होते. तसेच सदैव मीठओवा यांची मदतीने गॅस कमी होतो म्हणून ते येवला अंतर थोडे खाल्ले तरी फरक पडतो.
5) संडास साफ होण्यासाठी घरगुती उपाय ?
Ans. लिंबाचा रस आणि आल्याचा रसएक चमचा मध कोमट पाण्यामध्ये मिक्स करून ते प्यावे यामुळे संडास साफ होण्यासाठी उपाय महत्त्वाचा ठरतो
Previous Post Next Post