औषधी वनस्पती आणि उपयोग
प्राचीन काळापासून जंगलात सापडणाऱ्या औषधी वनस्पती आता दिवंसोदिवस कमी होत चाललेल्या आहेत. वनौषधींची महती आयुर्वेदात सांगितले आहे बेसुमार जंगल तोडीमुळे अनेक वनौषधी आता नष्ट झाल्या आहेत . आणि आहेत त्यांच्याविषयी कोणी जाणून घेत नाही .फार पूर्वीपसूनच वनौषधींचे ज्ञान मौखिक परंपरेने पिढ्यन्पिढ्या चालत आलेलं आहे . रामायणात पण हनुमानानी लक्ष्मणाला वाचवायला संजीवनी आणली होती.अनेक पुरणांन मध्ये वनौषधी किती महत्वाची आहे सांगितले आहे .जे औषध विज्ञान तंत्रज्ञान आपल्याला देऊ शकत नाही ते आपल्याला निसर्ग देतो.हा निसर्गच सर्वात मोठे औषधालय आहे .येथे प्रत्येक रोगावर आजारावर औषध आहे पण आपल्याला ते माहिती पाहिजे.या नैसर्गिक औषधालय मात्र आता ते बऱ्याच प्रमाणात कमी होत आहे, त्याच्याविषयी माहिती ज्ञान लोप पावत आहे .मात्र अजून फक्त टिकून आहे ते ग्रामीण भागात , आदिवासी भागात पण ते मौखिक स्वरूपात आहे .हे ज्ञान संपण्याच्या मार्गावर आहे,कारण कोणी ही माहिती जाणून घ्यायला तयार नाही तो फक्त रासायनिक गोळया घेणार आहे.आणि अजून ज्याला माहित आहे तो कोणाला देत नाही का तर वंशपरंपरागत द्यावे . बऱ्याच प्रमाणात लोकांना या माहिती नाही वनौषधंची उपचार पद्धती. आणि ती सर्वांना माहिती व्हावी व पुढे भविष्यात टिकून राहावी अशी काळजी आपण घेतली पाहिजे.यासाठी मे काही वनौषधी माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.तुळस, कडूलिंब, निर्गूडी,आंबा,शेवगा इत्यादी अशा अनेक वनौषधी आपण बघतो . त्यांचे संगोपन करावे. चला तर जाणून घेऊ अशा काही पाच वनौषधी विषयी थोडक्यात माहिती.
5 वनौषधी व त्यांच्या उपचार पद्धती
वनौषधी व त्याच्या उपचार पद्धती
1) औषधी वनस्पती अडुळसा:
ग्रामीण भागात सहजा सहज उपलब्ध होणारी अडुळसा ही वनस्पती.ग्रामीण भागात कुंपना जवळ ही वनौषधी आपल्याला दिसून येते. अडुळसा वापरून अनेक उत्पादने बाजारात विकायला येत असतात.जाणून घेऊ थोडे औषधी गुण.b) दमा, खोकला झाल्यावर पानंचा काढा करून पिण्यास द्यावा
c)लघवीला आग झाल्यास पंचांगाचा काढा करून पिण्यास द्यावा.
2) औषधी वनस्पती तुळस (Holy Basil)
या वनस्पती विषयी कोणाला माहिती नाही. प्रत्येक घराची शोभा व वातावरण याचं वनौषधी मुळे सुधारत आहे.हिंदू धर्मा मध्ये तुळशीला अनन्यसाधाण महत्व आहे. म्हणुन प्रत्येक घरी तुळशवृंदावन असतेच. तुळशीला धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही बाजूने महत्व आहे.
b) संधीवात बिया थंड पाण्यात भिजवून ते पाणी पाजण्यासाठी देता.
C) तोंडाचा वास,हिरड्या , डोकेदुखी यासाठी पाने खाली जातात.
d) टी.बी (T.B.)झाल्यावर तो बरा करण्यास तुळशी मदत करते.
e)HIV,मुतखडा,कर्करोग अशा मोठ्या आजारांना
3) आंबा(शेपू,गावठी खासकरून)(Mango)
आता आंबा माहिती नाही असा कोणी या शकत नाही. आपण फक्त आंबे लागल्यावर त्याचाच फक्त आस्वाद घेत असतो.पण आपण कधी असा विचार करत नाही की आंबा किती औषधी गुणांनी संपन्न आहे.ग्रामीण भागात, आदिवासी भागात शेपू आंबा बघायल मिळतो. जाणून घेऊ थोडे औषधी गुण:आंबा(शेपू,गावठी खासकरून) रोग व उपचार
a) उलटी होत असल्यास कोवळ्या पानांचा काढा, रस घेतला जातो .b) जखम झाल्यास आंब्याच्या सालं काढून ती जाळून तिचे मस जखमेवर लावतात.
c) ताप आल्यास साली चा काढा पाजला जातो.
d) जुलाब सुरू झाल्यास कोयीचां गर खडीसाखर सोबत खायला देतात.
e) संधीवात झाल्यास आंब्याची पाने व निर्गुडीची पाने यांची वाफ देतात.
d) पोटदुखी झाल्यास सालीचा चूर्ण घेतात.
4) औषधी वनस्पती निर्गुडी
औषधी वनस्पती निर्गुडी रोग व उपचार
आंघोळीच्या पाण्यात निर्गुडीचा पाला व कडुलिंबाचा पाला उकळून ते पाणी अंगोळ करण्यास दिले जाते.
b) पक्षवात झाल्यावर सालीचा कवाथ करून पाजला जातो.
c) पायान भेगा, हातपाय दुखणे,संधीवात, पक्षवात यासाठी निरगुडी चे तेल मसाज करण्यास वापरतात. निरगुडी चे तेल बाजारात विकायला येत किंवा खेडो पाड्यात,ग्रामीण भागात भेटते.
d) मासिक पाळी त पोट दुखल्यास निरगुडीचे चूर्ण प्यायला देतात
5) औषधी वनस्पती कडूलिंब
b) दाद्री, गजकर्ण,पुरळ यासारखे त्वचा रोग झाल्यास कडुलिंबाची दहली, फंदी अंगोलिच्या पाण्यात उकळून अंगोळ करावी.
C) केसांमध्ये उवा,कोंडा झाल्यास कडुलिंबाची पाने व काढा याने डोके धुवावे.
d) पोटात जंत झाल्यास कडुलिंबाचे चूर्ण खातात.
e) ताप आल्यास सालीचा काढा करून पिण्यास दिला जातो.जखम झाल्यास कडुलिंबाची पाने, फळे यांचं लेप जखमेवर लावतात.
# वनस्पतीकाढा बनविण्याची पद्धत/प्रक्रिया:
टिपः कोणत्याही औषधी वनस्पती च्या औषधी गुणधर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. वनस्पतीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण काही वनस्पतीच्याbजास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.
पुढच्या भागांमध्ये, लेखांमध्ये आपण प्रत्येक वनौषधी विषयी सविस्तर माहिती घेऊ.
धन्यवाद