मशरूम लागवड |अळंबी लागवड All In Detail

Mushroom Cultivation 
मशरूम लागवड | अळंबी लागवड कशी करावी ?

      नमस्कार मित्रांनो,
महंत जमनादास महाराज कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय करंजाळी तालुका पेठ जिल्हा नाशिक महाराष्ट्र. येथे मी   विज्ञान पदवी च्या दुसऱ्या वर्षात (2019-20) शिकत असताना ,
वनस्पीशास्त्र विभागा मार्फत  डॉ. स्मिता चव्हाण मॅडम आणि डॉ.अविनाश जोंधळे सर यांच्या मार्गदरशनाखाली  मशरूम /अळंबी लागवड कशी करावी याबाबत एक उपक्रम / प्रात्यक्षिका राबवण्यात आली.
तो उपक्रम कसा केला गेला व आम्ही काही शिकलो हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न.. शेती करत असताना आपल्याला गरज असते जोड व्यवसाय करण्याची . मशरूम /अळंबी  शेती करण्यासाठी त्याची माहिती , अनुभव असणे आवश्यक असते.शाकाहारी माणसांसाठी मशरूम , आळंबि अत्यंत फायद्याचे असते . कारण शरीराला आवश्यक प्रोटीन्स ची कमी मशरूम , आलंबि पूर्ण करते. कारण मशरूम , अळंबी मध्ये चांगल्या प्रकारे प्रोटीन्स असतात. आम्ही केलेलं उपक्रमा अंतर्गत आम्ही मशरूम लागवड केली.  यामुळं आम्ही जे काही शिकलो , हे तुमच्या पर्यंत पोहाचांचा प्रयत्न.
mashroom cultivation..मशरूम लागवड |अळंबी लागवड  All In Detail
मशरूम /अळंबी लागवड उपक्रम

विषय-मशरूम ची लागवड करणे.

उद्देश(Aim)-

मशरूम ची लागवड कशी करावी हे जाणून घेऊन ते कृतीमध्ये आणून विद्यार्थ्यांना त्याचे फायदे व महत्व पटवून देणे.

साहित्य(Apparatus)-

भाताचा किंवा गव्हाचा भुसा,4-5बादल्या,40 लीटर पाणी,5kg पॉलिथिन बॅग्स,पांढरा कापड,टेबल ,फळ्या, दोरा, मशरूम सिड्स, स्प्रे बॉटल,कैची,टाचणी, बेसनपीठ इत्यादी.

रसायने(chemicals)-

फॉर्मलीन(Formaline), Formaldehyde etc.

कृती(procedure)-

  • 1)सर्व साहित्याचे निर्जंतुकीकरण केले(sterilize).
  • 2)40 लीटर पाण्यात 4-5 डाले फॉर्मलीन टाकून ते निर्जंतुक करून घेतले.त्या पाण्यात 1 पोते भिजवुन त्यात भुसा भरावा.ते भरलेले पोते त्या पाण्यात रमत टाकले.
  • 3)12 तासानंतर तो पूर्ण रमल्या नंतर तो भुसा टेबलावर्ती, पोत्यावर्ती पसरवला.
  • 4)3-4 तासानंतर भुसा थोडा सुकल्यावर तो योग्य तयार झाला.
  • 5)पॉलिथिन बॅग चे निर्जंतुकीकरण फॉरमिलीने च्या द्वारे केले. (पॉलिथिन बॅग्स निर्जंतुकीकरण करतांना)
मशरूम लागवड |अळंबी लागवड  All In Detail
मशरूम साठी पॉलिथिन बॅग्स निर्जंतुकीकरण करतांना)

  • 6)निर्जंतुकीकरण पूर्ण झाल्यावर पॉलिथिन बॅग्स चे खालची बाजू दोरीने बांधली.नंतर बॅग मध्ये भुस्याचा पहिला 3      इंच चा थर दिला व त्यावर मशरूम सिड्स कडेला सोडल्या आणि त्याच्यावरून थोडे बेसनपीठ सोडले.
  • 7)त्यानंतर परत एक 2 इंचाचा थर दिला व परत कडेला सिड्स,बेसनपीठ. असे 4-5 थर केले.
  •  ‌  (भुसा ,मशरूमसिड्स पॉलिथिन बॅग्स मध्ये भरतांना आम्ही,🙂

भुसा ,मशरूमसिड्स पॉलिथिन बॅग्स मध्ये भरतांना आम्ही,🙂
भुसा ,मशरूमसिड्स पॉलिथिन बॅग्स मध्ये भरतांना आम्ही

  • 8)सर्व थर भरून झाल्यावर पॉलिथिन बॅगचे वरचे टोक दोरीने बांधून घेतले.
  • 9) 7-8 बॅग्स तयार झाल्यावर त्या सर्व बॅग्स एक निर्जंतुकीकरण केलेल्या व हवा ,ऊन यांचा कमी संपर्क येईल अशा ठिकाणी योग्य अंतर ठेवून ठेवल्या.{प्रत्यक्ष बॅग्स ठेवतांना}

प्रत्यक्ष मशरूम बॅग्स ठेवतांना
प्रत्यक्ष मशरूम बॅग्स ठेवतांना

  • 10)7-8 तासांनंतर त्या पॉलिथिन बॅग्स ना सुई च्या मदतीने लहान छिद्रे पाडली.
  • छिद्रे पाडताना मशरूम सिड्स ना पिन लागणार नाही याची काळजी घेतली.
  • 11)नंतर त्या पॉलिथिन बॅग्स ना बाहेरुन फॉरमिलीन स्प्रेच्या साहाय्याने निर्जंतुक केले.(प्रत्यक्ष कृती करताना आम्ही)
मशरूम बॅग्स मशरूम बॅग्स पिना मारत असताना
मशरूम बॅग्स पिना मारत असताना

  • 12) काही दिवसांनी मशरूम कोंब बाहेर आले .आणि मशरूम वाढू लागले. आणि रोज योग्य काळजी घेतल्याने मशरूम तयार झाले.
तयार झालेले मशरूम /अळंबी
तयार झालेले मशरूम /अळंबी

  • 13) आपण तयार केलेलं मशरूम आपण बाजारात विकू शकतो. आणि चांगला नफा मिळवु शकतो.....अशा प्रकारे शाकाहारी खणाऱ्यासाठी 
  • एक प्रोटीन संपूर्ण मशरूम आपल्याला मिळते.

ही माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट मध्ये कळवा . आणि मशरूम लागवड विषयी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.

धन्यवाद.....

मशरूम/ आळम्बी

आमचा उपक्रम आवडला असेल तर शेअर करा . Comment करा . आणि जासतीतजास्त लोकान पर्यंत पोहचावा.

आभार व श्रेय
या उपक्रमाव्दारे आम्हाला मशरूम /अळंबी लागवड विषयी
माहिती आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल वनस्पती शास्त्र विभाग सर मॅडम ,
एम. जे. एम कॉलेज करांजळी यांचे आभार.



मशरूम लागवड कशी करावी? , आळंबी लागवड कशी करावी ? , आळांबी workshop.
धन्यवाद... मशरूम शेती , अळंबी शेती.

Previous Post Next Post