मुक्का मार लागल्यास उपाय
अनेक वेळा आपल्या कामामुळे किंवा काही कारणास्तव आपल्याला मुक्का मार लागतो. आपण पडलो आणि जर रक्त नाही निघालं तरीही मुक्का मार मात्र चांगला लागत असतो. अशावेळी आपल्याला खूप वेदना होतात. या वेदना कमी करण्यासाठी व मुक्का मार लागल्यास उपाय करण्यासाठी आपल्याला गरज आहे घरगुती आयुर्वेदिक उपचार पद्धती ची.दवाखान्यात जाण्यापूर्वी आपल्याला मुक्का मार लागल्यास तातडीने घरगुती आयुर्वेदिक उपचार करायला हवा.चला आज आपण जाणून घेऊ मुक्का मार लागल्यास घरगुती उपाय काय आहेत.
मुक्का मार लागल्यास घरगुती आयुर्वेदिक उपचार
1) मुक्का मार लागल्यास उपाय क्रमांक एक
मुक्का मार लागल्यास सर्व प्रथम लागलेल्या ठिकाणी जास्त हालचाल करण्याचा प्रयत्न करू नये.
मुक्का मार लागल्यावर सूज येते आणि भयानक वेदना होतात. यासाठी सोपा घरगुती आयुर्वेदिक उपाय म्हणजे आंबा हळद आणि रगत रोहडा हे घेऊन ओल करून दगडीवर त्यांची पेस्ट करून त्यांचे मिश्रण करून मुक्कांमार लागलंय त्या ठिकाणी 3-4 दिवस लावावे. यामुळे आलेली सूज व वेदना कमी होतात.
2) हाडाला मुक्का मार लागल्यास उपाय
हाडाला मुक्का मार लागल्यास निर्गुडीच्या पानांचा उपयोग करून आपण सूज व वेदना लवकरात लवकर बऱ्या करू शकतो.
A) मुक्का मार लागल्यास निर्गुडीचा उपयोग कसा करता येईल ?
यासाठी निर्गुडिचा पाला घेऊन यावा. एका पातेल्यात
पाणी घेऊन पाच मिनिट हा पाला शिजवावा. वाफ यायला लागल्यावर वरुन चाळणी / जाळी ठेवून सुती कापड/ रुमाल घडी करून चाळणी , जाळी वर ठेऊन निर्गुडीची सर्व वाफ यात घ्यावी आणि त्या सुती कापड/ रुमालाने मुक्का मार लागलेल्या ठिकाणी शेक द्यावा.
3 ) मुक्का मार लागल्यास व पाय मुरगळला तर उपाय.
पाय मुरगळला तर उपाय म्हणून आपण निर्गुडीचा पाला आणि कडुलिंबाचा पाला घेऊन त्याची वाफेन वरील निगुडीच्या कृतीनुसार शेक द्यावा.
आणि नंतर आंबा हळद आणि रगत रोहडा लेप लावला जातो.
आणि जर तुमच्याकडे रगत रोहडा नसेल तर आंबा हळद किंवा साधी खाण्याची हळद आणि मोहरी चे तेल एकत्र करून गरम करून पाय मुरगळला ठिकाणी व सूज व मुक्का मार लागलेल्या ठिकाणी लावावे.
4) मुक्का मार लागल्यास उपाय क्रमांक चार
जर आपण गाडीवरून , बाईक वरून किंवा असे पडले आहात की आपले अंग आणि हात पाय , पाठ यांना पण मुक्का मार लागलेल्या आहे . आणि सर्व अंग दुखत असल्यास आपण दररोज हा उपाय नक्की करा.
कडुलिंब , अडुळसा आणि निर्गुडी या तीन आयुर्वेदीक औषधी वनस्पती आपल्याला भेटल्या तर खूप चांगलं .नाही तर यामधील ज्या भेटल्या त्यांचा पाला / पांद्या पानासहित घेऊन अंगुळीच्या पाण्यात उकळून घ्यावे आणि या गरम पाण्याने मार लागलेल्या ठिकाणी शेक देत अंगोळ करावी.असे सलग तीन चार दिवस करावे.यामुळे तुमची सूज , अंगदुखी आणि मुक्का मार लागल्याच्या वेदना नक्की थांबतील.
5 )मुक्का मार लागल्यास उपाय क्रमांक पाच
मुक्का मार लागल्यास उपाय करण्यासाठी व मुक्का मार लागलेल्या ठिकाणी मसाज करण्यासाठी औषधी वनस्पती निर्गुडी चे तेल नक्की वापरावे.
निर्गुडी तेल - मुक्का मार लागल्यास निर्गुडी तेल रामबाण आयुर्वेदीक उपाय.
ज्या ठिकाणी मुक्का मार लागलेला असेल किंवा पाय मुरगळला असेल तिथे निर्गुडी तेलाने मॉलिश/मसाज करावी. हे निर्गुडी तेल औषधी वनस्पती निर्गुडी आणि बऱ्याच महत्व पूर्ण औषधी वनस्पती चा उपयोग करून बनवले जात असते. हे तुम्हाला मेडिकल मधून किंवा ग्रामीण भागात, महिला बचत गटांच्या माध्यमातून मिळवता येईल. या निर्गुडी तेलाने आपली अंग दुखी , गुडघे दुखी , असे अनेक प्रश्न सोडवले जातात.म्हणून निर्गुडी तेल नक्की वापरा.
👉काही लोकप्रिय पोस्ट👈
ही माहिती कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद.
FAQ'S
1)औषधी वनस्पती निर्गुडी तेलाचे फायदे ?
Ans. निर्गुडी तेलाने आपली अंग दुखी , गुडघे दुखी , असे अनेक प्रश्न सोडवले जातात.म्हणून निर्गुडी तेल नक्की वापरा.
2) मुक्का मार लागल्यास उपाय सांगा .
Ans. आंबा हळद आणि रगत रोहडा हे घेऊन ओल करून दगडीवर त्यांची पेस्ट करून त्यांचे मिश्रण करून मुक्कांमार लागलंय त्या ठिकाणी 3-4 दिवस लावावे. यामुळे आलेली सूज व वेदना कमी होतात.
3) सूज कमी कशी करावी ?
Ans. आंबा हळद आणि रगत रोहडा पेस्ट करून लवावी.
4) हाडाला मुक्का मार लागल्यास उपाय सांगा ?
Ans. हाडाला मुक्का मार लागल्यास निर्गुडीच्या पानांचा उपयोग करून आपण सूज व वेदना लवकरात लवकर बऱ्या करू शकतो.
5) मुक्का मार लागल्यास कोणते घरगुती उपाय करावे ?
Ans. आंबा हळद, रगत रोडा किंवा निर्गुडीच्या पाने आणि अडुळसा वनस्पतीची पाने घेऊन त्यांच्यामध्ये त्यांनी मुक्का मार लागलेल्या ठिकाणी शेक द्यावा.