तुळशी विवाह का केला जातो ? | तुळस,निसर्गातील औषधी वनस्पती ची राणी,आई

तुळस,निसर्गातील औषधी वनस्पती ची राणी,आई


तुळस (Holy Basil) आयुर्वेदिक औषधी वनस्पती

निसर्गातील औषधी वनस्पती ची राणी,आई (Mother and Quin medicine of nature) म्हणून तुळशीला मानाचे स्थान आहे.
धार्मिक कामांबरोबर तुळसीमध्ये औषधी गुण असल्याने तुळशीचा मान अधिक आहे. एक औषधी वनस्पती म्हणून तुळशीची एक वेगळीच जागा आहे. इतकेच काय प्राणवायू देण्यासाठी ही तुळशी महत्त्वाची भूमिका निभावते. सर्वाधिक ऑक्सिजन सोडणाऱ्या वनस्पतींपैकी तुळशी एक आहे. वनस्पती आपल्याला प्राणवायू देतात आणि स्वतः कार्बन डायऑक्साइड घेतात व प्रदूषण कमी करत असतात. आपल्या भारत देशामध्ये तुळशी अन्यांसाधरण महत्व आहे म्हणून प्रत्येक घरी श्रीमंत असो की गरीब प्रत्येक घरी तुळशवृंदावन असते.शहरात चाळीत, गॅलरीत, ब्लॉकमध्ये किंवा बंगल्यात एक तरी तुळशीचे झाड लावलं जातं
तुळशी ला हिंदू धर्मा मध्ये अन्यंसाधरण महत्व आहे कोणतीही पूजा असो तुळशी आवश्यक असते. आपल्या आयुष्यात, जीवनात तुळशी अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे. तर आपण आज या लेखामध्ये तुळशी विषयी जाणून घेऊ.

तुळशी विवाह पौराणिक कथा
तुळशी विवाह का केला जातो ?
तुळशी विवाह का केला जातो वाचा  (६) धार्मिक महत्त्व या  खाली👇

१) तुळस झाडाचे स्वरूप(nature of Holy Basil)


तुळस ही वनस्पती झुडूप या प्रकारात मोडते. तुलसी ची रोप साधारण पणे ३० ते १३० से.मी पर्यंत वाढतात. तुळशी ची पाने लंबगोलाकार ,जांभळ्या हिरव्या रंगाची,टोकदार,कतरलेली असतात. तुळशी च्या फुलांना मंजिरी म्हणतात. त्यापासून तुळशी तेल काढतात.ते सुवाहिक असते.फुलांमध्ये तुळशी बिया असतात.दिवसाला.१५ते२० तास तुळस ऑक्सिजन देत असते.


२) तुळशी चे वितरण मुळ ठिकाण
(Origin and Distribution of Holy Basil)


भारतात सर्व प्रकारच्या तुळशी आढळतात. भारतीय उपखंडात अनेक ठिकाणी तुळशी चे प्रकार सापडतात. आशिया,युरोप,आणि आफ्रिका भूप्रदेशात तुळशीची झुडपे आढळतात.उत्तर - मध्य भारतात जास्त प्रमाणात आढळते.
भारत व नेपाळ मध्ये अनेक प्रकारच्या तुळशी ची शेती केली जाते .

३)शास्त्रीय नाव व शास्त्रीय वर्गीकरण (scientific classification)

a) शास्त्रीय नाव (Binomial Name):


Ocimum tenulflorum

b) शास्त्रीय वर्गीकरण (scientific classification):


Kingdom:. Plantes

Glade:. Tracheophytes

Glade:. Angloysperms

Glade:. Eudicots

Glade:. Asterides

Order:. Lamlales

Family:. Lamiaceae

Genus:. Ocimum

Species:. O.tenulflorum



४)तुळशी ची नावे व जाती(Name and Type of basil)

तुळशी अनेक प्रदेशात आहेत .मात्र अनेक भागात अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.प्रत्येक भागात ,प्रदेशात तुळशीचे नाव वेगळं असलं तरी हून मात्र जवळ जवळ सारखेच . चला तर बघ त्यांची नावे व जाती,प्रकार.

a) कृष्ण तुळस -Scared basil(Ocumum sanctum/tenuiflorum)


या तूळशी चा रंग जांभळा असतो.पाने ,खोड, असे उन्हामुळे सर्व भाग जरा जास्तीत जांभळ्या व उठावदार दिसतात .याच तुळशीला "काळी तुळस "असे म्हटले जाते.ही तुळस तापावर सर्व तुळशीमध्ये जास्त गुणकारी समजली जाते.

b) कापूर तुळस- comphor basil( Ocimum kilimandscaricum)

                  या तुळशीच्या पानांमध्ये का प्राण 70% जवळ असते.यामुळे या तुळशी चा वास ,सुगंध कापूर सारखा येतो .यामुळेच या तुळशीला कापूर तुळस म्हणतात.

c) सब्जा तुळस- Hoary basil(Ocimum Americanum)

                   सब्जा तुळशीचे भरपूर महत्व आहे. याच तुळशी पासून पानांचा उपयोग करून थंड सरबत बनविले जाते.विंचू चावल्यावर याची पाने कुटून लावतात.

d) वन तुळस /रान तुळस-Sweet basil


           रानात सापडणारी , आढळणारी ही रान तुळस अत्यंत महत्वाची आहे.ही एक सुगंधित तुळस असून सर्वात जास्त महत्वाची आहे. त्वचारोग आणि जखमेवर ही अत्यंत जास्त प्रमाणात गुणकारी आहे.

e) राम तुळस- Shrubby Basil(Ocimum gratissimum )

            पोटासाठी गुणकारी असलेल्या या तुळशी ला "लवंगी तुळस " असेही म्हटले जाते.ही रान तुळशी सारखी मोठी वाढते .

         ५)तुळशीचे शास्त्रीय गुणधर्म व औषधी गुणधर्म: 


a) तुळशी चे शास्त्रीय गुणधर्म(scientific properties of basil)

  आपला मनुष्याला आवश्यक आणि अत्यंत महत्वाचा प्राणवायू (ऑक्सिजन) सर्वात जास्त देणाऱ्या वनस्पती मध्ये तुळशी ची गणना केली जाते. हेच कारण असल्यामुळे प्रत्येक घरी तुळस असते. तुळशी मध्ये अनेक केमिकल घटक आहेत जसे की,रासायनिक रचना
 तुळशीचे काही फायटोकेमिकल घटक हे ओलेनॉलिक असिड, युरसोलिक असिड, रोस्मारिनिक असिड, यूजेनॉल, कार्वाक्रोल, लिनालूल आणि c-कॅरिओफिलिन (सुमारे 8%) आहेत. 
 तुळशी आवश्यक तेलामध्ये बहुतेक युजेनॉल (~ 70%) β-एलेमेन (~ 11.0%), β-कॅरिओफिलिन (~ 8%), आणि जर्माक्रिन (~ 2%) असतात, बहुतेक शिल्लक विविध ट्रेस कंपाऊंड्ससह बनविलेले असतात.

b) तुळशी चे औषधी गुणधर्म(medicinal properties of Holy Basil)

औषधी गुणधर्म:
 तुळशी च्या औषधी गुणधर्मामुळे प्रत्येक ठिकाणी तिला महत्व आहे.
  • १)सर्दी ,ताप आल्यावर तुळशी पानांचा काढा प्यायला दिला जातो.
  • २)संधिवात झाल्यास तुळशीच्या बिया पाण्यात टाकून प्यायला देतात.
  • ३)दात दुःखी,तोंडाचा वास ,डोकेदुखी यासाठी पाने खाली जातात.
  • ४)रान तुळस जखमेवर , नायटा, त्याच्यारोगावर अत्यंत गुणकारी मानली जाते.त्यासाठी तुळशी ची पाने कुटून लावतात.
  • )विंचू चावल्यावर सब्जा तुळस ची पाने चावलेल्या ठिकाणी कुटून लावतात.
  • ६)सर्वात जास्त गुणकारी काळी तुळस ताप,सर्दी ,डोकेदुखी, कर्करोग अशा रोगांवर गुणकारी आहे.
  • ७) कीटक व डास पळविण्यास उपयोगी.
  • ८) पोटदुखीवर पानांचा रस घेतला जातो.
  • ९) टी.बी (T.B.)झाल्यावर तो बरा करण्यास तुळशी मदत करते.
  • १०)HIV,मुतखडा,कर्करोग अशा मोठ्या आजारांना पण बरे होण्यास मदत करते.
  • ११)डोळे सुजणे,मोतिया बिंद ,डोळ्याचे आजार यांच्यावर पण तुळशी गुणकारी आहे.
  • १२) मनावरचा ताण,सिगारेटचे वेसण सोडण्याठी तुळशी ची ४-५ पाने खावी.
  • १३) चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुळशी ची पाने खावी.यामुळे रक्त शुद्ध होते,शरीरातील टॉक्झिक पदार्थ कमी होतात.यामुळे सौंदर्य प्रसाधनात तुळशीचा वापर केला जातो.
  • १४)तुळशीचे तेल अत्यंत गुणकारी असते.अंगुदुखी,हातपाय दुखी वर ते मसाज करण्यास वापरतात.डोक्यातील जुवा,केस गळती बंद करण्यास हे अत्यंत महत्त्वाचं असतं.

तुलसी


              ६)हिंदू धर्मात तुळशीला मानाचे स्थान (Religious importance of basil):


     हिंदू धर्मात तुळशीला मानाचे स्थान प्राप्त आहे. हिंदू धर्मीय लोक आपल्या घरी तुळशवृंदावन बांधतात च आणि तुळशी ची रोज मनोभावे पूजा करत असतात,प्रदिक्षणा घालतात.हिंदू धर्मातील प्रत्येक पूजा कार्यासाठी तुळशी पत्र आवश्यक असते.तुळशी ला देवी मानले जाते. विष्णू देवाचं पहिलं प्रेम म्हणतात.म्हणून हिंदू धर्मात तुळशी विवाह मोठ्या आनंदात साजरा करतात. धर्मा मध्ये वारकरी संप्रदाय तुळशीला आपली माता मानत आसतो .संध्याकाळी तुळशी वृंदावन जवळ पुजाकरून करून ,प्रदक्षिणा घालून दिवा,अगरबत्ती लावतात.तुळशी ची कुंडी ,रोप/झाड डोक्यावर घेऊन पंढरपूर ची /विठुरायाचे वारी करतात. हिंदू धर्मात माणूस/व्यक्ती मरण पावल्यावर त्याच्या मुखात /तोंडात तुळशी पान ठेवत असतात. वारकरी आपल्या गळ्यात तुळशची माळ घालतात.

तुळशी विवाह का केला जातो ?



सोमवार 15 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह होणार आहे. या दिवशी तुळशी विवाहाच्या आख्यायिकेच्या पूजेमध्ये तुळशी मंगलाष्टकांचे पठण केले जाते. असे केल्याने भगवान शालिग्राम आणि तुळशी मां सर्व मनोकामना पूर्ण करतात.

   कार्तिक महिन्यातील देवोत्थान एकादशीच्या दिवशी तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. या दिवशी तुळशीजी आणि भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाचा विवाह केल्यास कन्यादान बरोबरीचे फळ मिळते असे मानले जाते. या दिवशी विवाहित महिला तुळशी विवाहाचे आयोजन करून पूजा करतात, त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. यंदा तुळशीविवाह सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दिवशी पूजेमध्ये तुळशीविवाहाची आख्यायिका, काक्रे, तुळशी मंगलाष्टक पठण केले जाते. असे केल्याने भगवान शालिग्राम आणि तुळशी मां सर्व मनोकामना पूर्ण करतात. जाणून घेऊया तुळशीजींच्या आख्यायिकेबद्दल.....

 तुलसी विवाह आख्यायिका |तुळशी विवाह पोरानिक कथा 


 शिवपुराणातील आख्यायिकेनुसार, एकदा भगवान शंकराच्या क्रोधामुळे तेज निर्माण झाले होते. या तेजाच्या समुद्रात गेल्याने एका प्रतापी राक्षसी बालकाचा जन्म झाला. ज्याला नंतर दैत्यराज जालंधर असे नाव पडले आणि त्याची राजधानी जालंधर असे म्हटले गेले. जालंचा विवाह कालनेमीची मुलगी वृंदा हिच्याशी झाला होता. वृंदा ही एक सद्गुणी स्त्री होती. जालंधरने आपल्या पराक्रमाने स्वर्ग जिंकला. पण एके दिवशी तो आपल्या शक्तीच्या मस्तकात ठेचून गेला आणि माता पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर पोहोचला. त्यामुळे संतप्त झालेल्या भगवान शंकरांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. पण भगवान शिवाचा पुत्र असल्याने तो शिवासारखाच शक्तिशाली होता आणि त्याच्यासोबत वृंदाच्या पतीची शक्ती होती. त्यामुळे भगवान शिवही त्याचा वध करू शकले नाहीत. मग पार्वतीजींनी विष्णूजींना सार सांगितले. वृंदाचे व्रत मोडेपर्यंत जालंधरला मारता येत नाही.
 भगवान विष्णू ऋषींच्या वेशात जंगलात पोहोचले, जिथे वृंदा एकटीच प्रवास करत होती. ऋषींना पाहून वृंदाने महादेवाशी युद्ध करणाऱ्या पती जालंधरबद्दल विचारले. तेव्हा ऋषी विष्णूजींनी आपल्या भ्रमाने दोन वानरांना प्रकट केले. जालंधरचे डोके एका माकडाच्या हातात आणि धड दुसऱ्याच्या हातात होते. पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्याची विनवणी केली. भगवान विष्णूंनी जालंधरचे मस्तक पुन्हा आपल्या भ्रांतीने आपल्या शरीराशी जोडले आणि त्याच वेळी स्वतः त्याच्या शरीरात प्रवेश केला. ही फसवणूक वृंदाच्या लक्षातही आली नाही. जालंधर बनलेल्या भगवान विष्णूंसोबत वृंदा सद्गुरुने वागू लागली. त्यामुळे तिची पावित्र्य विरघळली आणि हे घडताच वृंदाचा नवरा जालंधर युद्धात पराभूत होऊन मारला गेला.
  भगवान विष्णूच्या लीला शिकल्यावर, वृंदाने भगवान विष्णूला हृदयहीन खडक असल्याचा शाप दिला. वृंदाच्या शापामुळे विष्णू शालिग्रामच्या रूपाने दगड झाला. विश्वाचा निर्माता दगड बनल्याने विश्वात असंतुलन निर्माण झाले. हे पाहून सर्व देवतांनी भगवान विष्णूला शापातून मुक्त करण्यासाठी वृंदाकडे प्रार्थना केली. वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वत:ला झोकून दिले. जिथे वृंदाचे सेवन केले होते, तिथे तुळशीचे रोप उगवले होते. भगवान विष्णू म्हणाले की वृंदा, तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षा जास्त प्रिय झाली आहेस. तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव-उठवणी एकादशीचा दिवस तुलसी विवाह म्हणून साजरा केला जातो.

🌳अजून काही औषधी वनस्पती🍀

       ७)तुळशीची शेती(Forming of basil)


तुळशी चे महत्व भरपूर असल्याने तुळशीची शेती केल्यास ती मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळवून देते.
         a) तुळशी शेती कशी करतात?

      भारतीय हिंदू धर्मात तुळशीला अन्यांसाधरन महत्व आहे.म्हणून तिला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.जसे की पुजे करिता अनेक मोठल्या मंदिरात ,पूजे साठी.
तुळशीच्या औषधी गुणधर्मामुळे अनेक औषधे बनविण्यासाठी औषधी निर्मिती कंपनीमध्ये तुळशीला भरपूर मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.यासाठी तुळशी ची शेती करणे आवश्यक आहे.चला तर तुळशी शेती कशी व कधी करावी बघू.
 सौंदर्य कंपन्या मध्ये तुळशीला मोठी मागणी आहे .थोड्याशा जागेत भरपूर नफा मिळवून देण्याचे काम ही शेती करते.

१)शेती उत्पादन अंदाज


सर्वसाधाणपणे जुलै महिना शेतीसाठी चांगला मनाला जातो.
1-2 किलो तुळशी बियानासाठी १५ ते ३० हजार खर्च येतो.७/८ हजारचे खत लागते .येवढं २ बिघ्या मध्ये लागते .सिंचन साठी अजून थोडा खर्च होतो. यात ४/५क्किंटल पिकाचे उत्पादन होते.१क्किंटल चा भाव बाजारात ३५/४० हजार इतका भेटत असतो. 

२) लागवड

जुलै महिना हा तुळशीच्या लागवडीसाठी योग्य काळ असतो. तुळशीची रोपे साधरण ४५ बाय ४५ सेंटीमीटरच्या अंतराने लावली पाहिजेत.१४ वाणाच्या रोपांना ५० बाय ५० सेंटीमीटरच्या अंतरावर लावले पाहिजे. रोपं लावल्यानंतर त्यांना थोडं पाणी द्यावे. एका आठवड्यात कमीत कमी एकदा तरी पाणी द्यावे. जेव्हा या पिकाची कापणी करायची असेल तर साधरण १० दिवसांपुर्वीच पाणी देणे बंद करावे.कारण का गरजेचं असतं. पाने योग्य प्रमाणावर वाढ झाल्यावर कापणी करायची असते. फुलं यायच्या आत कापणी करावी लागते.नाही तर त्यामधील तेलाचं प्रमाण कमी होत असते.म्हणून लवकर पाने तोडून विक्री करिता काढून पाठवावी.
विक्री करिता कंपनी अथवा व्यापाऱ्यांशी संपर्क करावा.नाही तर contract farming करावी व त्यासाठी औषध कंपनीला पहलेच भेटून नंतर शेती करावी. अशा प्रकारे आपण तुळशी शेती करून नफा मिळवू शकतो. 

  टिपः तुळशीच्या औषधी गुणधर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. तुळशी चे मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण तुळशीच्या जास्त सेवन केल्याचे तोटे पण आहेत.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.

         अशा प्रकारे तुळशी ही अनेक आयुर्वेदिक औषेधी गुणधर्मामुळे महत्वाची ठरते. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवा.आपण अशाच प्रकारे अनेक वनौषधी, वनस्पती व पर्यावरणातील महत्व पूर्ण घटकविषयी लेख घेऊन येत असतो. तर यात सहभागी व्हा.
           धन्यवाद......

तुळशीचे लग्न, तिचे लग्न का केले जाते, तुळशी लग्न परंपरा, औषधी वनस्पती तुळस विषय माहिती मराठी मध्ये, तुलसी के फायदे मराठी


Previous Post Next Post