जनावरांचे आजार आणि त्यांच्यावर घरगुती आयुर्वेदिक उपचार | गुरांवर घरगुती औषधोपचार

     जनावरांचे आजार आणि उपचार [PDF]

 या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण व्यस्त आहे.प्रत्येक जण कशाणा कशा आजाराने ग्रस्त आहे.पण आपला उपाचार आणि आपण निरोगी कसे राहू याची काळजी तर आपण घेतो .मात्र आपल्याकडे असणारी जनावरे यांची काळजी कोण घेणार....? ये स्वतः तर नाही घेऊ शकत. जनावरांचे आरोग्य सदृढ राहावे म्हणून अनेक मालक आपल्या जनावरची खूप काळजी घेत असतात .मात्र जनावरांवर अनेक रोग , आजार येत असतात. मग यांच्यावर लवकर उपचार करायला हवे असते. त्यासाठी जनावरांचे आजार आणि उपचार पद्धती आपल्याला माहीत असायला हवी. जनावरांना अनेक आजार , रोग होतात. जसे की ताप, गोचीड , जंत आणि बरेच रोग.चला आपण आज जाणून घेऊ जनावरांचे आजार आणि त्यांच्यावर घरगुती आयुर्वेदिक उपचार.

जनावरांचे आजार आणि त्यांच्यावर घरगुती आयुर्वेदिक उपचार | गुरांवर घरगुती औषधोपचार


आजार आणि त्यांच्यावर घरगुती उपाय
जनावरांचे आजार आणि उपचार

जनावरांना / गुरांना सर्वाधिक त्रास असतो तो गोचीड, गोमाशा, कीटक , पोटातील जंत, यांचं रोगांचा.या आजारामुळे गुरे, जनावरे आधिक त्रस्त होतात. गुरांची, जनावरांची कार्यक्षमता कमी करण्यासाठी सर्वाधिक जबाबदार असतात गोचीड, गोमाशा, कीटक , पोटातील जंत . यांच्यावर वेळीच उपाय योजना न केल्यास जनावराची कार्यक्षमता घटून विविध रोगांची , आजरांची लागण होण्याची शक्यता असते. यासाठी जनावरांच्या मालकाला योग्य वेळीच घराच्या घरी आयुर्वेदिक औषद उपचार करून डास, गोचीड , कीटक यांच्या पासून जनावरंची काळजी घेता येईल.चला तर मग जाणून घेऊ
जनावरांचे आजार आणि त्यांच्यावर घरगुती आयुर्वेदिक उपचार , गुरांवर घरगुती औषधोपचार

1) जनावरांच्या पोटातील जंतावर घरगुती आयुर्वेदिक औषधी उपचार | गुरांना / जनावरांना जंत झाल्यास उपाय

  सर्वात प्रथम लाल- वरडी सुपारी कुटून बारीक पूड वस्त्रगाळ करून पाण्यात मिसळून पाजावी.एक महिन्याच्या वासरास एक, दोन महिन्याच्या वासारास दोन या प्रमाणे सहा महिन्याच्या वासरस सहा. त्यापुढे कोणत्याही वयाच्या गायी म्हशी ला सहा या प्रमाणे पूड पहावी.
टिपः गुरांना, जनावरांना कोरडी पूड देऊ नये.

2) गायी , म्हशी च्या दुधातून रक्त येत असल्यास घरगुती उपाय

बऱ्याचदा दुधात/दुधाला लालपणा येतो .अशा वेळी दोन सालीसकट केळी घेऊन त्यामध्ये कापराच्या 8-10 वड्या टाकून गुरांना, जनावरांना दोन वेळा खाण्यास द्याव्यात. त्यामुळे दुधामधील रक्त बंध होते.

3) जनावरांच्या गोठ्यामध्ये होणाऱ्या माशा, गोमाशा, उडणारे कीटक यांचा प्रतिबंध कसा करता येईल ?

सीताफळाची ( किंवा ते नसल्यास पेरू किंवा कडूलिंबा ची) पंधरा-वीस पाने घ्यावीत. थोडीफार कुठुन दोन लिटर पाण्यात उकळवून त्यांचा एक लिटर काढा करावा. एक लिटर काढा काढून त्यात दोन लिटर पाणी टाकावे हे दहा लिटर द्रावण पंपाने कोठावळे आजुबाजूस फवारावे. या यामुळे माशा डास उडणारे कीटक पळून जातात.

4) गुरांवर / जनावरांवर पडणाऱ्या गोचिडावर उपाय

   गोचिडांच्या प्रतिबंधासाठी एक लिटर पाणी उकळण्यास ठेवावे. पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात जाडे मीठ म्हणजेच खडेमीठ टाकण्यास सुरुवात करावी. उकळत्या पाण्यात मीठ विरघळत आहे तोपर्यंत मीठ टाकत राहावे. मिठू ऊकळण्यास बंद झाले आणि मिठाचे कन दिसू लागले की मीठ टाकने बंद करावे. हे थंडगार झालेले द्रावण शरीरावर तेथे गोचीड आहे तिथे कापडाने थेंब थेंब लावावे. अर्ध्या तासाने गाय, म्हशी धुऊन टाकावी. त्यामुळे सर्व गोचीड मरून जातात. उरलेले पाणी गव्हणा मध्ये किंवा आजूबाजूला शिंपडावे.

5) गुरांना / जनावरांना ताप आल्यास घरगुती उपाय

        गुरांना / जनावरांना ताप आल्यास आपण त्यांच्यावर घरगुती उपाय करू शकतो. जनावरांना 
  ताप आल्यास जो पर्यंत डॉक्टर , वैद्य यांना येई पर्यंत आपण जनावराचा ताप कमी करून बरा करू शकतो.आपल्या सर्वांना देव बाभूळ तर माहीतच आहे. या देव बाबलीच्या शेंगा जनावराचा ताप थांबविण्यास बरा करण्यास मदत करतात. देव बाबुल चार-चार शेंगा घेऊन ताप आलेल्या जनावराला चाऱ्यातून किंवा भाकरी तून या शेंगा खायला द्याव्यात यांनी ताप कमी होण्यास मदत होते. नंतर तुम्ही डॉक्टरांच्या मदतीने उपचार करायची गरज पण पडू शकणार नाही. जास्त ताप असल्यास ऊस शेंगा देऊन डॉक्टरांना घेऊन या.



आजारी गाय बैल चारा खात नाही
जनावरे चारा खात नाही


6) गाय , बैल, जनावरे चारा खात नाही उपाय 


    गाय, बैल जनावरे चारा खात नसेल तर ती का खात नाही त्याच्यामध्ये कारण पाहिजे बघितले पाहिजे. काही वेळेस त्यांच्या तोंडाला काटे आलेला असतात किंवा त्या वेळेस त्यांचे पोट फुगलेले असते.

A) जनावरांच्या तोंडात काठी आली असती तर उपाय

त्यांच्या त्याला काटे आलेले असतील तर ते काटे कमी करण्यासाठी पहिले ते व्यवस्थित बघून घ्यावे. जर तू तोंडात जिभेला काटे आले असते तर आंब्याच्या लोणच्याची ते काटे कमी होत असतात. म्हणून आंब्याच्या लोणच्याची फोड घेऊन जिभेवर काटे घासावे काटे कमी होतात. आणि काटे कमी झाल्यावर जनावर चारा खायला लागतात.

B) जनावरांचे पोट फुगलेले असल्यास उपाय

    जनावरांचे पोट फुगलेले असल्यास गोडे तेल आणि त्यात ओवा टाकून ते जनावरांना पिण्यासाठी दिले जाते. यामुळे जनावरांचे फुगलेले पोट कडून जनावरांना आराम भेटतो.

रोगमुक्त जनावरे
आरोग्यदायी जनावरे


7) जनावरे आजारी पडू नये म्हणून उपाय

    जनावरे आजारी पडू नये, आपली गाय , बैल म्हशी आजारी पडू नये म्हणून एक आयुर्वेदिक गुणकारी उपाय म्हणजे कडुलिंबाचा पाला. पणा कडुनिंबाचा कडू पाला जनावरे खात नाही हे आपल्याला माहीत आहे. यासाठी सकाळी भुकेपोटी जनावरे कडुलिंबाचा पाला नक्की खात असतात म्हणून सकाळी आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा पाला जनावरांना खायला द्यावा. रात्रभर रात्रभर उपाशी असल्यामुळे सकाळी जनावरे कडुलिंबाचा पाला खात असतात. हा पाला जास्त नाही एक छोटीशी डाहाळी दिली तरी योग्य आहे. जर सकाळी सुद्धा काढला नाही तर आपण चाऱ्यात कडुलिंबाची पाने टाकून तरीही त्यांना खायला देऊ शकतो. यामुळे कोणत्याही जनावरं लवकर आजारी पडणार नाही म्हणून हा उपाय नक्की करत जा.

 🌿महत्वाची माहिती

PDF download  from Telegram


माहिती आवड्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कॉमेंट करा.
 धन्यवाद.

टिपः
    जनावरांना जर आजार मोठ्या प्रमाणावर झालेला असेल तर वरील उपाय न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा. कोणताही उपचार करण्याआधी जनावरांच्या रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांना भेटलो उपचार केलेलं चांगला आणि योग्य असतं. म्हणून उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.




FAQ'S


1) शेळी, गाय आणि म्हशी गाभण असल्यास कसे ओळखावे ?
Ans शेळी, गाय आणि मशीन गाभण आहे की नाही ओळखण्यासाठी त्यांचे गोमुत्र घेऊन त्यामध्ये मोहरीचे तेल टाकावे. तिच्यातील आणि गोमूत्र एकजीव मिक्स झाले तर गाभन आहे असेच समजावे.

2) जनावरे चारा खात असेल तर असल्यास काय करावे ?
Ans. जनावरे चारा खात नसल्यास त्यांच्या तोंडात काटे आले असतील किंवा पोट फुगलेले असेल हे बघून योग्य उपचार करावा.

3) जनावरांच्या अंगावरील गोचीड कमी कसे करावे ?
Ans. गरम पाण्यात गारा म्हणजे जाड मीठ घालून ते पाण्याने गोचीड असलेल्या ठिकाणी धुवून काढावे.

4) गाय बैल आजारी पडू नये म्हणून काय करावे ?
Ans. गाय बैल आजारी पडू नये म्हणून त्यांची काळजी घेत असताना त्यांना कडुलिंबाचा पाला उपाशीपोटी खायला द्यावा.

5)जनावरांना कोणते रोग होत असतात ?
Ans. जनावरांना म्हणजे गाय , बैल आणि शेळी , म्हशी यांना पोटात जंत होतात, तोंडाला काटे येतात, पित्तामुळे भूक लागत नाही, पोट फुगते, अंगावर कुंभ येतात आणि ताप पण येत असतो. जनावरांना असे बरेच रोग होतात त्यांच्यावर योग्य उपचार करावा.

Previous Post Next Post