मेथीच्या भाजीची माहिती मराठी | मेथीचे औषधी गुणधर्म
नमस्कार मित्रानो ,
औषधी वनस्पतींची आणि रानभाज्या व विविध नैसर्गिक घटकाची माहिती घेत असताना आज आपण जाणून घेऊ महत्व पूर्ण मेथी भाजी माहिती वं मेथी भाजी खाण्याचे फायदे . आज प्रत्येकाच्या घरी मेथी भाजी बनवली जाते, कुणाला आवडते कुणाला नाही .ही मेथी भाजी आवडली नाही तरी खावी कारण मेथी भाजी आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक असते.चला तर जाणून घेऊ मेथी भाजी माहिती मराठी आणि मेथी भाजी खाण्याचे फायदे काय आहेत.
मेथी भाजी माहिती मराठी | मेथी भाजी खाण्याचे फायदे | मेथीच्या भाजीचे आरोग्यवर्धक फायदे
➡️हिरव्या पाले भाज्यांमधे सर्व महत्वाचे पोषक घटक असल्यानं शरिराची वाढ व विकास होतो तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात. मेथीची भाजी आणि भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे. मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.
- ➡️मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात.मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे.
- ➡️मेथीच्या दाण्यापासून रक्तातील साखर कंट्रोल होण्यास देखील मदत होते. रक्तातील साखर नियंत्रित राहते मधूमेहींनी मेथीची पाने आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
- ➡️मधूमेहींनी मेथाचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते.
- ➡️केसांच्या समस्या कमी होतात. मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात. मेथीची पाने बारीक करा आणि आंघोळीच्या अर्धा तास आधी केसाना लावा, कोंडा लवकर संपेल.
- ➡️मेथीची पाने भिजवून पेस्ट बनवून त्वचेवर लावल्यास त्वचा स्वच्छ व मऊ दिसते. मेथीच्या पानात चिकट पोषक घटक असतात, ज्यामुळे त्वचेला कोरडेपणापासून संरक्षण होते. मेथी बारीक करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग दूर होतात. मेथीची पाने चेहऱ्यावरील सूज कमी करते.
- ➡️मेथीच्या पानांचा रस घेत लहान मुलाना दररोज एक चमचे देऊन पोटातील किडे दूर होतात. छातीत जळजळ होत असल्यास रोजच्या आहारात एक चमचा मेथी दाण्याचा समावेश करा.यासाठी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवा व नंतर स्वयंपाकामध्ये वापरा.
- ➡️तोंड आले असल्यास, घसा बसला असल्याच मेथीची पाने भिजवलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने पोट साफ होते.
काही महत्त्वपूर्ण पोस्ट
टीप.
औषधी वनस्पतींची योग्य माहिती घेऊन उपचार करण्यास उपयोग करावा.अर्धवट माहिती ही घातक असते.म्हणून योग्य वक्ती डॉक्टर किंवा जाणकार व्यक्ती यांच्याकडून औषधी वनस्पती माहिती जाणून , त्याचे फायदे तोटे जाणून वा वनस्पती ओळखून उपयोग , वापर करावा.
धन्यवाद .
FAQ'S
1) मेथी भाजी मध्ये कोणते जीवनसत्व असतात ?
Ans. मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात.
2)मेथी भाजी चे औषधी उपयोग कोणते आहेत ?
Ans. मेथीच्या दाण्यापासून रक्तातील साखर कंट्रोल होण्यास देखील मदत होते. रक्तातील साखर नियंत्रित राहते मधूमेहींनी मेथीची पाने आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
मधूमेहींनी मेथाचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते.
3) महाराष्ट्रामधील ग्रामीण भागात आवडीचा आहार कोणता ?
Ans. ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे. मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.
4) पोट साफ करण्यासाठी घरगुती उपचार ?
Ans.सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने पोट साफ होते.
5) मधुमेहावर गुणकारी भाजी ?
Ans.मधूमेहींनी मेथाचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते.