टक्कल वर केस येण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपचार | टक्कल पडणे उपाय व कारणे

टक्कल वर केस येण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय

नमस्कार मित्रांनो,
        आजकालच्या या धावपळीच्या , धक्काबुक्कीच्या जीवनात अनेक जण काळजी , आणि जास्त विचार करत असतात. अनेक लोक आपल्या दैनंदिन जीवनात आपला आहार , सवयी चांगल्या ठेवत नाही यामुळे त्यांचे केस गळणे, टक्कल पडणे अशा समस्यांना तोंड देत आहेत.टक्कल पडणे, केस गळणे थांबविण्यासाठी अनेक उपाय , औषधे , केस गळणे थांबविण्यासाठी तेल , असे उपाय करत असतात. पण काही फायदा होत नाही. फायदा झाला तर काही तोटे पण होतात.पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की केस का गळतात, टक्कल का पडते,टक्कल पडल्यावर काय करावे ?, केस गळण्याची कारणे काय ? केस गळणे थांबविण्यासाठी उपाय काय आहेत ?, टक्कल पडणे कसे थांबवावे, 
टक्कल पडल्यावर नवीन केस कसे उगवावे, केस दाट होण्यासाठी , उगवण्यासाठी घरगुती उपाय, केस दाट होण्यासाठी काय खावे, केसांविषयी माहिती . नक्की पडले असतील . चला तर मग जाणून या टक्कल पडणे , केस गळणे , केसानविषयी माहिती.

टक्कल वर केस येण्यासाठी, केस गळणे थांबविण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय


केस गळती वर घरगुती आयुर्वेदिक उपचार
टक्कल पडणे उपाय


टक्कल का पडते ? / केस का गळतात ?

1) आपल्या आहरामधून योग्य प्रमाणात प्रथिने/ प्रोटीन्स जर आपल्याला भेटत नसतील तर आपले केस पांढरे होतात, गळायला लागतात.
2)आपल्या दैनंदिन जीवनात आपला आहार सवयी चांगल्या ठेवत नसल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होऊन केस गळती, टक्कल पडणे अश्या समस्या निर्माण होतात. 
3) आपण ज्या परिसरात राहतो त्या वातावरणाचा परिणाम होऊन केस गळती, टक्कल पडणे सुरू होते. जसे आपण industrial area मध्ये असल्यास तेथील रसायनाचा परीणाम.
4) केस गळण्याचे किंवा टक्कल पडण्याचे हे एक महत्त्वाचे कारण म्हणजे अनुवंशिकता. जर आपल्या परिवारात आपले पूर्वज आत टक्कल पडण्याचे किंवा केस गळण्याचे बरेच प्रमाण असेल तर आपली पण टक्कल पडते किंवा केस गळत असतात.
5) ज्या व्यक्तींना आपले केस सारखे विचरायचे किंवा घट्ट बांधण्याची सवय असते आणि स्त्रियांना आपले केस घट्ट वेणी किंवा घट्ट बांधलेले आवडतात त्यांचे केस जास्त ताण पडल्याने गळू लागतात.
टक्कल पडल्यावर उपाय
टक्कल पडणे

टक्कल वर केस येण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय


1. 2-3 लसण्याच्या पाकळ्या डोक्याला लावायच्या सुरम्या बरोबर खरळीत वाटाव्या. या चटणीला टक्कल पडलेल्या भागावर लावावे. जळजळ झाली तर अगोदर तूप किंवा लोणी लावून मग त्यावर हा लेप लावावा. 20-30 दिवस हा लेप दररोज करावा.

2. दिवसातून 2-3 वेळा कोथिंबिरीच्या रसाचा मसाज केल्याने काही दिवसातच फायदा होतो.

3. डोक्यावर जेथे केस नसतील अशा ठिकाणची त्वचा ताणून धरा आणि तेथे केसांच्या मुळाना मुळयाचा रस लावा. हे झोपण्यापूर्वी करा. त्यामुळे तो रस सर्वत्र डोक्यावर पसरून जेथे केसाच्या मुलांना अवरोध निर्माण झाला आहे तेथून तो आतमध्ये पाझरून केसांची मुले जी अवरोधित झालेली आहेत, त्यांना मोकळे करण्यास मदत करेल. सकाळी उठून आयुर्वेदीक शाम्पूने स्नान करा. यामुळे देखील पून:च्च केस येण्यास मदतच होईल.

4. २ थेंब शिसम तेल नाकपूडयांमध्ये सोडा आणि स्वास घ्या. यामुळे बंद झालेली केसांची मुळे उघडण्यास मदत होवून केस पूनःच्च येण्यास मदत होते.

5. १) जठामांसी : १०० ग्राम २) चेन्गल्वा कोस्तु : १०० ग्राम ३) काले शिसम : १०० ग्राम ४) सुगंध फळ मुळ : १०० ग्राम ५) तमारा गीन्जलू : १०० ग्राम हे सगळे एकत्र करून थोड्या पाण्याने वाटा आणि त्याची पेस्ट तयार करा. त्यामध्ये ५०० ग्राम गाईचे तूप घाला आणि मंद आचेवर उकळा. नंतर तूप शिल्लक राहीपर्यंत उकळून झाल्यावर ते गाळून घ्या आणि बाटलीत भरून ठेवा आणि वापरा. हे तयार झालेले तूप रोज किंवा आठवड्यातून दोन दिवस वापरा. लाभ: टक्कल पडण्याचे प्रमाण कमी होईल. 

आमदार काळेभोर केस करण्यासाठी उपाय
सुंदर केस


टक्कल पडू नये म्हणून घ्यावयाची काळजी 


1) आपल्या दैनंदिन जीवनातील आहारामध्ये योग्य आहार पौष्टिक, आहार पालेभाज्या आणि प्रोटीन युक्त आहाराचा समावेश जास्त करावा.
2) उघड्यावरचे तसेच तळलेले चटकदार पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
3) दररोज आपल्या शरीराच्या सर्व आरोग्यासाठी व्यायाम योगासने करत जावी.
4) कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस न घेता तसेच कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार मनाला त्रास करेल असा करू नये.
5) आपले केस घट्ट बांधून ने किंवा सारखे विंचरू नये.

अशाप्रकारे आपण आपले डोक्याचे केस गळत असल्यास किंवा टक्कल पडलेले असल्यास उपाय करू शकतो. व टक्कल पडू नये केस गळू नये म्हणून काळजी घेऊ शकतो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद.

केस गळणे टक्कल पडणे याच्यावर घरगुती आयुर्वेदिक उपचार कसा करावा
केस गळणे , टक्कल पडणे


FAQ'S

1) केस का गळतात ?
Ans. जास्त विचार करून किंवा आपल्या परिसरातील काही घटकांचा आपल्या केसांवरती परिणाम होऊन तसेच आपल्या आहारामध्ये तेलकट तसेच अन्न हेल्थी अन्नाचे समावेश करण्यामुळे केस गळायला सुरुवात होते.

2) टक्कल का पडते ?
Ans . आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपण योग्य आहाराचा समावेश करत नाही कोणत्या गोष्टीचा आपण जास्त विचार करून चिंताग्रस्त होतो किंवा बाहेरील उघड्यावरील अन्न हेल्थी तेलकट पदार्थांचे सेवन करतो तेव्हा केस गळू लागतात व टक्कल पडते.

3) केस वाढीसाठी काय महत्त्वाचे असते ?
Ans. केस वाढीसाठी महत्त्वाचे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला आपल्या आहारात प्रथिने / प्रोटिन्स गरजेचे असते.

4) केस दाट वाढण्यासाठी काय करावे ?
Ans. आपल्या आहारामध्ये प्रोटीन युक्त अन्नाचे सामावेश करून दैनंदिन जीवनात जास्त चिंताग्रस्त न होता आयुर्वेदिक तेल यांचा उपयोग करावा.

5) केस कशा च्या कमतरतेमुळे गळू लागतात ?
Ans. प्रोटिन्स/ प्रथिने , जीवनसत्व अ, ड यांच्या कमतरतेमुळे केस गळती होऊन टक्कल पडत असते.


Web Story

Previous Post Next Post