औषधी वनस्पती
परसबागेत वाढणाऱ्या औषधी वनस्पती त्यांचे औषधी गुणधर्म
१) पानफुटी ( BRYOPHYLLUM PINNATUM)
औषधी वनस्पती पानफुटी माझ्यासारख्या अनेकांची आवडती लहानपणात असते. त्याचे पान आणि त्याला होणारे दुसरे पान अशी त्याची रचना असते. ही छोटीशी औषधी वनस्पती आपण कुंडीत कुठेपण परसबागेत लावू शकतो.
औषधी वनस्पती पानफुटी चे औषधी उपयोग -
मुक्का मार लागल्यास पाणी गरम करून शेक घ्यावा.
जखम झाल्यास त्यावर पाने बारीक वाटून लावावीत.
मुतखडा झाल्यास रोज एक पान अनोशी पोटी घ्यावी.
२) कोरफड ( ALOE VERA )
प्रत्येक घरी आवर्जून कुंडीत लावली जाणारी वनस्पती औषधी वनस्पती म्हणजे कोरफड. चेहरा साफ करण्यासाठी व चेहऱ्यासाठी गुणकारी कोरफड वनस्पती औषधी वनस्पती आपण घराशेजारी कुंडीत लावत असतो.
औषधी वनस्पती कोरफड चे औषधी उपयोग -
भाजल्यास कोरफडीचा गर लावावा.
मासिक पाळीच्या त्रासात घराचा रस प्यायला देतात.
भूक लागत नसल्यास पानाच्या आतील गर खाण्यास द्यावा.
केसात कोंडा असल्यास आतील गर केसांना लावणे.
चेहऱ्याला गर लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात.
३) आले ( ZINGIBER OFFICINAFE )
औषधी वनस्पती आले प्रत्येक घरी असतेच मग तेच शहर टाकण्यासाठी या भाजीत टाकण्यासाठी.
आपण याची परस बागेत लागवड करू शकतो.
औषधी वनस्पती आले व त्याचे औषधी उपयोग
दमा , खोकला, आल्याचा रस मधातून घेतात.
जर भूक लागत नसल्यास जेवणाआधी आले व मीठ खावे यामुळे भूक वाढते.
सर्दी ताप आत सुंठ मिरे व पिंपळीचे एकत्र चूर्ण मधातून घेणे.
आमवातात सुंठीचा काढा प्यायला देवा.
४) ओवा ( CARUM ROXBURGHIANUM )
औषधी वनस्पती ओवा एक महत्त्वपूर्ण वनस्पती आहे. याची लागवड आपण परसबागेत योग्य प्रकारे करू शकतो.
औषधी वनस्पती ओव्याचे औषधी उपयोग
अजीर्ण व पोट दुखी तो वाचवून खावा.
सर्दी, डोकेदुखीत ओवा गरम करून त्याचा शेक द्यावा.
जुलाब होत असतील तर ओवा पाण्यात मिसळून ते पाणी पिण्यास देणे.
▶️ Next page◀️
अशाच औषधी वनस्पती, रान भाज्या, आणि पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटका विषयी माहिती जाणून घेण्यासाठी विजिट करा इको महाईनोकरी ला.
👉 रहस्यमय पोस्ट नक्की वाचा
...
टिपः कोणत्याही औषधी वनस्पती च्या औषधी गुणधधन्यवादर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. वनस्पतीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण काही वनस्पतीच्याbजास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.