औषधी वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग [PDF] | औषधी वनस्पती ज्या तुम्ही परसबागेत वाढवू शकता.

     औषधी वनस्पती [pdf]

परसबागेत वाढणाऱ्या औषधी वनस्पती त्यांचे औषधी गुणधर्म


   आपल्याला औषधी वनस्पती माहिती असते. पण नाव व त्यांचे औषधी उपयोग माहिती असणं जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच औषधी वनस्पती उपचारासाठी आपल्याकडे असणे आवश्यक असतं. पण प्रत्येक औषधी वनस्पती आपल्याला वेळेवर उपलब्ध सहजासहजी होत नाही. त्यासाठी आज आपण अशा औषधी वनस्पती व त्यांचे औषधी उपयोग थोडक्यात जाणून घेणार आहोत की त्यांची लागवड आपण परस बागेत करू शकतो.

आयुर्वेदिक वनस्पती
औषधी वनस्पती उपयोग

१)अडुळसा ( ADHATODA VASICA )


           परसबागेतील कुंपणा लगत अडुळसा औषधी वनस्पतीची लागवड पण करू शकतो.

 अडुळसा औषधी वनस्पती उपयोग :

   दमा, खोकला - पानांचा काढा करून प्यावा.
         संधिवात - चांदे सुजल्यास त्यावर पाणी गरम करून बांधावी.
लघवीला आग होणे- पंचांगाचा काढा करून पाजावा.

२) निरगुडी ( VITEXT NEGUNDO ) 


         परसबागेच्या कुंपणासाठी निरगुडीचा उपयोग आपण करू शकतो. कुंपणा बरोबर औषधी वनस्पती म्हणून आपण निरगुडी चा उपयोग करू शकतो.

औषधी वनस्पती निरगुडी चे औषधी उपयोग


 मुळव्याध झाल्यास मुळाचे चूर्ण खायला दिल्याने मुळव्याधी आलेले कोंब मउ पडतात.
जखमेत किडे झाल्यास ते मारण्यासाठी निरगुडी च्या पानांचा रसाने धुवावी.
संधिवातात निरगुडीच्या सिद्ध तेलाने सांध्यांना मॉलिश करावी.
अंगदुखी, कमर दुखित पानांचा शेक द्यावा.

३) तुळस ( OCIMUM SANCTUM)


     औषधी वनस्पतींची आई, राणी अशी ओळख औषधी वनस्पती तुळशीची आहे. याची लागवड आपण परसबागेत नाही पण अंगणात मोठ्या धार्मिक भावाने करतो हेच मोठे भाग्य.

औषधी वनस्पती तुळशीचे औषधी गुणधर्म -


  सर्दी , तापामध्ये पानांचा काढा करून प्यावा.
संधिवातात बिया थंड पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे.
हिरड्यातून पू येत असल्यास मोडणे कराव्या

४) गवती चहा ( CYMBOPOGUM CITRATRUS )


गवती चहा कोणाला माहित नाही. चहा पितो का गवती चहा माहीतच पाहिजे. प्रत्येक परसबागेत ओल्या पाण्याच्या जागी गवती चहा आपण लावू शकतो.

औषधी वनस्पती गवती चहा चे औषधी उपयोग


ताप, सर्दी, खोकला झाल्यास गवती चहाचा काढा करून प्यावा.
संधिवातात गवती चहाच्या तेलाने मॉलिश करावी.
पोटात गॅस झाल्यास गवती चहाचा काढा प्यावा.

                    Next page

Pdf download करण्यासाठी telegram ला join व्हा.
             Join Telegram

अशाच औषधी वनस्पती, रान भाज्या, आणि पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटका विषयी माहिती जाणून घेण्यासाठी विजिट करा इको महाईनोकरी ला.
   👉 रहस्यमय पोस्ट नक्की वाचा
धन्यवाद...
टिपः कोणत्याही औषधी वनस्पती च्या औषधी गुणधर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. वनस्पतीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण काही वनस्पतीच्याbजास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.


Aaushdhi vanspati pdf download , Tulsi aushadhi vanaspati , ayurved Marathi , adulsa upyog , aushadhi vanaspati upyog pdf , niragudi tel ,

Previous Post Next Post