रानभाज्या
रानभाज्या वं त्यांच्या बनविण्याच्या पदधती
रानभाज्या चे महत्व आपण जाणून आहे. आपण पावसाळा झाला की रानभाज्या घेऊन येतो. पण आपल्याला माहिती नसतं की या शिजवावी कशी , बनवाव्यात कशा....???
यासाठी मे काही रानभाज्या व त्यांची बनविण्याची पद्धत आणली आहे . वाचा आणि शेअर करा.
1) खडक तेरा भाजी कशी बनवावी /शिजवावी?
-याची अळू च्या पानासारखी दिसणारी मोठी पाने घेऊन त्याची भाजी केली जाते.
ही भाजी अळू भाजी सारखीच असून ती राना मध्ये सापडते.
खडक तेरा भाजी बनवण्याची पद्धत:-
या भाजीची पाने बारीक किंवा लहान चिरून घ्यावी.
नंतर उडीद डाळी मध्ये शिजून घ्यावी
नंतर शिजल्यावर त्यांचे व्यवस्थित मिश्रण करून घ्यावे. मिश्रण झाल्यावर तेल , मीठ योग्य प्रमाणात टाकून फोडणी द्यावी
किंवा पानांना बेसन लावून त्याच्या वड्या बनवून शिजवल्या जातात./तेलावर खरपूस भाजून खाल्ल्या जातात.
त्यासाठी पाने लाटून घ्यावी. ( शिरा मोडण्यासाठी )
नंतर बेसन पीठ लावून त्यांच्या व्यवस्थित घडी करून शिजवून घ्यावे. घडी व्यवस्थित बांधावी.
शिजवून झाल्यावर लहान लहान वड्या करून घ्यावे.
नंतर योग्य तेल मीठ टाकून तळून घ्यावे.
२) माटा भाजी कशी शिजवावी / बनवावी ?
- पावसाळ्यात खेडोपाडी परसबागेमध्ये माठाची भाजी करतात.
माटा भाजी बनवण्याची पद्धत-
पहिल्यांदा कडाई मध्ये कमी पाण्यात शिजाऊन घ्यावे.
नंतर शिजल्यावर त्यातील पाणी काडून घेतले की
कडई मध्ये योग्य तेल मीठ घालून फोडणी द्यावी.
अगदी साध्या पद्धतीने तव्यावर किंवा कढईत मध्ये तेल मीठ टाकून खरपूस भाजून ही भाजी चवदार लागते.
▶️ रानभाज्या.....◀️
1️⃣ रानभाजी करटोली
3) कुरडू रानभाजी कशी शिजवावी / बनवावी ?
- खेड्यापाड्यात व रानावनात सहज सापडणारी भाजी म्हणजे कुरडू.
कुरडू भाजी बनवण्याची पद्धत-
पहिल्यांदा भाजी कढई मध्ये शिजवून घेणे.
भाजी शिजवून झाल्यावर ती त्यातील पाणी काढून घ्यावे. भाजी सुकी करून नंतर योग्य तेल टाकून कडवी मध्ये शिजवून घेणे. माटा आणि कुरडू या भाज्या जेवढ्या साध्या पद्धतीने बनवलेल्या तेवढ्या चांगल्या चवदार लागतात.
काही प्रश्न शंका असल्यास कॉमेंट करा.
धन्यवाद....
रानभाज्या , जंगल भाज्या , रानभाज्या रेसिपी.
.