रान भाजी करटोली | रान कारली, काटोली , काटवल रानभाजी माहिती

रानभाजी करटोली


 करटोली ,रान कारली, काटोली , काटवल रानभाजी माहिती 


         निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिले आहे. मानवाचा पडलेली प्रत्येक गरज पुरवण्याचे काम निसर्ग करीत असतो. अन्न , वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा निसर्ग पुरवत असतो. निसर्गात आढळणारी प्रत्येक वनस्पती मानवाच्या काही ना काही कामा पडत असते. मग ती खाण्यासाठी असो या रोगावर उपचार करण्यासाठी असो. निसर्गात आपल्याला अनेक रानभाज्या मिळतात पण त्याची माहिती आपल्याला हवी आहे.
अनेक लोकांना रान भाज्या विषयी माहिती नाही.
रानभाज्या मानवासाठी परिपूर्ण आहार आणि हेल्थी असतात. पावसाळा आला कि रानभाज्यांचा सीझन सुरू होतो. पावसाळ्यात आपल्याला भरपूर रानभाज्या मिळतात पण त्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. चला आज आपण जाणून घेऊ रानभाजी करटोली विषयी माहिती.Spiny gourd
असे रानभाजी करटोली ला इंग्रजी मध्ये म्हणतात.



रानभाजी करटोली व त्याचे फळ


 १) रानभाजी करटोली चे स्वरूप


        रानभाजी करटोली ही कारल्या सारखी दिसते. म्हणून तिला रान कारले म्हणून अशी पण एक ओळख आहे. रानभाजी करटोली हे एक फळ असून ते वेलीवर येते. पावसाळ्याच्या सुरुवातीस रानात, बांधावर रानभाजी करटोली ची वेल आपल्याला बघायला मिळते. पिवळी फुलं येऊन नंतर हिरवेगार कारल्या सारखं फळ म्हणजे करटोली रान भाजी.

२) रानभाजी करटोली वितरण व मूळ ठिकाण


        रानभाजी करटोली ही रानात जंगलात आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रात चंद्रपूर , नाशिक, चिमूर, राजुरा, गडची लोरी, वरोरा, भद्रावती इत्यादी परिसरात आढळते. भारत आणि अशिया मधील देशांमध्ये रानभाजी करटोली आढळते.
भारतातील अनेक राज्यांमध्ये रानभाजी करटोली ची शेती करून उत्पादन काढले जाते.

३) रानभाजी करटोली शास्त्रीय नाव आणि वर्गीकरण


A) रानभाजी करटोली शास्त्रीय नाव


          Momordica dioica

B) रानभाजी करटोली शास्त्रीय वर्गीकरण


   Scientific classification
Kingdom:Plantae
Clade:Tracheophytes
Clade:Angiosperms
Clade:Eudicots
Clade:Rosids
Order:Cucurbitales
Family:Cucurbitaceae
Genus:Momordica
Species:M. dioica


४) रान भाजी करटोली चे फायदे


रानभाजी करटोली ही पावसाळी भाजी आहे.
ही भाजी आपल्याला शरीरासाठी खूप हेल्थी आहे.
  1.   करटोली रान भाजी अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्सचा समृद्ध स्रोत आहे. त्यात अँटीलिपिड पेरोक्सिडेटिव्ह गुणधर्म आहेत, जे चरबीचे ऑक्सिडेशन रोखतात, त्यामुळे फॅटी यकृत रोग बरे होतात. करटोली ला हिंदीत कांटोला किंवा काकोरा असेही म्हणतात. ही एक भाजी आहे ज्यामध्ये अनेक फायदे आहेत ज्यामध्ये भरपूर प्रथिने, लोह त्याच वेळी कॅलरी कमी असतात.
  2. • करटोली रक्तातील साखरेची पातळी कमी करतो. करटोली वृध्दत्व विरोधी म्हणून काम करते.
  3. • पाठीचा कणा व दृष्टी सुधारतो. करटोली मुळे कॅन्सरची शक्यता कमी होते 
  4. • करटोली मुतखडा काढून टाकण्यास मदत करतात.
  5. मूळव्याध बरा करण्यासाठी रानभाजी करटोली हा घरगुती उपाय आहे. करटोली जास्त घाम कमी करतो.  
  6. • करटोली खोकल्यावर उपचार करतो. करटोली पचन सुधारू शकतात.

रानभाजी करटोली फळ


5) रानभाजी करटोली शेती व उत्पादन


भारतातील रानभाजी करटोली ची लागवड करणारी राज्ये:-
       कर्नाटक आणि पश्चिम बंगाल ही दोन मुख्य राज्ये आहेत जी व्यावसायिकरित्या करटोली ची/कंटोलाची लागवड करतात. इंदिरा कानकोडा I (RMF 37) या सुधारित/संकरित जातीची छत्तीसगड, ओरिसा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमध्ये व्यावसायिकरित्या लागवड केली जाते. मेघालयातील अनेक भाग या भाज्यांचे उत्पादन करतात. 
रानभाजी करटोली ची शेती कशी करतात व उत्पन्न कसे घेतात हे जाणून घेण्यासाठी कॉमेंट करा आपण त्या विषयी माहिती जमुन पुढच्या लेखात सादर करू.

    अजून काही रानभाज्या....नक्की वाचा 👈

६) रानभाजी करटोली शिजवण्याची पद्धत /बनवण्याची रेसिपी

पाककला 
करटोली / काटवल ची भाजी साहित्य - हिरवी कोवळी करटुली , आले खोबरे अर्धी वाटी , बारीक चिरलेला कांदा एक वाटी , हिंग , मोहरी , मीठ , जिरे , हळद , दोन चिरलेल्या मिरच्या , लाल तिखट , साखर तेल इत्यादी.
बनवण्याची पद्धत -

  • 1) करटुल्यांचे अर्धे भाग करुन त्यातील बिया व गर काढून टाकावा . नंतर बटाट्याचे काप केल्याप्रमाणे करटुली चिरुन घ्यावीत .
  •  2)पॅनमध्ये तेल गरम करुन हिंग , मोहरी व थोडेसे जिरे टाकून फोडणी घालावी . > त्यात चिरुन घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्यात .
  •  3) नंतर त्यात कांदा , मीठ , थोडेसे लाल तिखट व हळद घालुन चांगले परतावे . • चिरलेली करटुली त्यात घालुन पुन्हा परतावीत . 
  • 4) झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी . नंतर झाकण काढून मंद गॅसवर पाणी न घालता ३ ते ४ मिनिटे भाजी परतावी व नंतर वरुन ओले खोबरे व थोडी साखर घालावी . 
  • आपली भाजी तयार झाली. रानभाजी कटोरी चा आस्वाद घेऊ शकता.
रानभाजी करटोली विषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा.
आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
शेअर करा, कॉमेंट करा 
धन्यवाद.

Ranbhajyarecipe ,ranbhajya mahiti , Karoli , katola 

Previous Post Next Post