स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय | स्मरणशक्ती कमी होण्याची कारणे


स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय व लक्षात न राहण्याची कारणे.


नमस्कार मित्रांनो,
         आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला बऱ्याच वेळा आपण बऱ्याच गोष्टी विसरतो . आपण कोणी काही विसरला का की त्याला विसर भोळा म्हणत असतो . काही वेळेस अत्यंत महत्वाच्या गोष्टी , कामे आपण विसरतो आणि अशा वेळी आपण खूप हतबल आणि निराश होतं असतो. हा काही रोग नाही.पण आजकाल बहुतेक घरात लहान / मोठे सर्वांना कोणतीही गोष्टीचा विसर लवकर पडतो, अगदी सकाळ चे संध्याकाळीही आठवत नाही, हा काही आजार नाही पण भरपुर दिवस जर यावर दुर्लक्ष झाले केले तर याचे आजारात रूपांतर नक्कीच होऊ शकते, याची काही कारणे व काही जुन्या पण उपयुक्त पध्दतीने उपचार घेतले तर त्याचे अतिशय उपयुक्त परिणाम मिळतात. पण आपण कोणत्याही गोष्टीचा विसर का पडतो ? स्मरण शक्ती कमी होण्याची कारणे काय आहेत ? अशा प्रश्नांची उत्तरे आपण शोधत असतो. लक्षात राहण्यासाठी उपाय शोधत असतो. चला तर मग आज जाणून घेऊ की 

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय | स्मरणशक्ती कमी होण्याची कारणे काय आहेत.



कमजोर स्मरणशक्ती आणि लक्षात न राहणे याच्यावर घरगुती आयुर्वेदिक उपाय.
स्मरणशक्ति ..

स्मरणशक्ती कमी होण्याची कारणे काय आहेत ?

1) आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत असतो अशा वेळी आपली झोप होत नाही.
कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करणे व पाहिजे एवढी झोप होतं नाही यामुळे स्मरण शक्तीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.
2)आपल्या दैनंदिन जीवनातील आहारामध्ये आपण योग्य पौष्टिक आहार घेत नाही . सतत मसालेदार, उघड्यावरचे , बाहेरचे पदार्थ आहार घेतो आणि यामुळे आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊन आपल्याला लक्षात राहत नाही
3) आपल्या शरीराला आवश्यक तेवढे पाणी पिले नाही तरी त्याचा परिणाम आपल्या स्मरणशक्ती वर होत असतो.
4) मानसिक तनाव असल्यास त्याचा परिणाम आपल्या स्मरणशक्ती होऊन आपल्याला काही लक्षात राहत नाही.
5) , अतिशय हळवा स्वभाव ( जास्त करून स्रीयांचा ), मनातील अस्थिरता. यामुळे सुद्धा आपली स्मरणशक्ती कमी होते आणि आपल्याला लक्षात राहत नाही.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती आयुर्वेदीक उपाय


  1. • आपल्या शरीला किमान ८ तास झोप आवश्यक असल्यामुळे हवी एवढी झोप स्मरणशक्ती कमजोर असल्यास घ्यावीच.
  2. •लहान मेंदु ( डोक्याचा मागील भाग ) यांस बादाम तेलाचे हळवे मालीश करणे. ५/१० मिनीट रोज केल्याने आपल्याला चांगला फायदा होतो.
  3. •रोज रात्री पाण्यात ३ बदाम, १ अक्रोड भिजवुन सकाळी खाणे . यामुळे आपल्या स्मरणशक्ती वाढण्यास खूप मदत होते.
  4. • आपली स्मरणशक्ती सुधारण्यासाठी तळपायाची खोबरेल तेलाने १०/१५ मालीश करणे. आपल्याला फायद्याचे ठरते 
  5. •मानेपासून कमरे पर्यंत रोज तेल मुरेपर्यंत खालून वर अश्याप्रकारे मालीश करणे. खोबरेल तेलात एक लवंग + हिंग टाकुन गरम करून घेणे व नंतर त्याचा वापर करणे. यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते आणि आपल्या कोणतीही गोष्टी लक्षात राहन्यास मदत होते.
  6. •आपल्या दैनंदिन जीवनातील आहराचा आपल्या स्मरणशक्ती , शरीरावर परिणाम होत असतो म्हणून पचनास जे हळवे पदार्थ असतील ते घ्यावे. 
  7. • चांगल्या स्मरण शक्ती साठी रोज एक खारीक भिजवलेले खावे.
  8. • उघड्यावरील,बाहेरील पदार्थ पुर्ण कमी झाल्यास उत्तम. उदा.. मॅगी, पिज्जा.... व इतर. असे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
  9. •सकाळचे सुर्योदयानंतर चे कोवळे उन्हात ३० मिनीट बसावे. कोवळे सूर्य किरण आपल्या शरीरासाठी आवश्यक आणि गरजेचे असतात . याचा आपल्याला चांगला फायदा होत असतो.
  10. • हिरव्या पालेभाज्या, फळे आपल्या शरीराशी चांगले असते म्हणून हिरवे पालेभाज्या व साजुक तुप जेवणात असावेच. आणि फळे खावी.
  11. • चांगल्या स्मरणशक्ती साठी रोज दुपारी एकवाटी दही + जिरे घ्यावे. खूप फायद्याचे असते. 
  12. ब्राम्हीवटी रोज रात्री २ गोळ्या.
  13. • स्मरणशक्ती वाढण्यासाठी हा उपाय सर्व बोलत असतात म्हणजे कपभर दुधात प्रत्येकि १ याप्रमाणे बदाम, काजु, अक्रोड, इलायची याची बारिक पावडर करून घेतल्यास अतिशय लवकर चांगला परिणाम येतो. यामुळे आपलीं स्मरणशक्ती वाढून आपल्या दैनंदिन जीवनात चांगले लक्षात राहते.
  14. • चांगल्या स्मरणशक्ती साठी दिवसभरात पाणि भरपुर पिणे व लघुशंकेस थांबु नये त्वरीत जावे. 
  15. • गुळ व खोबरे खावे आपल्या स्मरणशक्ती साठी आणि मस्त आरोग्यासाठी चांगले असते.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम / योगासने , प्राणायाम

1)कोणत्याही हाताचा अंगठा दुसर्या हाताने १०/१५ धरून ठेवावा. ( लहान मुलांनी वाचन करताना ) हाताच्या व पायाच्या अंगठ्यामध्ये मेंदुचे पोईंट असतात
2)स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सगळ्यात पहिलं आसन आपण पाहणार आहोत ते सर्वांगासन. सर्वांगासनामध्ये तुमचे दोन्ही पाय हवेत वर करायचे असतात. असे करताना तुम्हाला कमरेकडून आधार द्यायचा असतो. या आसनामुळे तुमच्या मेंदूला योग्य तो रक्तपुरवठा होतो.यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते.
3) सकाळी व्यायाम योगासने, प्राणायाम करत असताना सूर्यनमस्कार घातल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
4)अनुलोम, विलोम, प्राणायाम, भ्रामरी, ॐ कार जप हे एकाग्रता वाढवण्याचे साधन आहे. 
5) शीर्षासन दररोज केल्याने आपली स्मरणशक्ती वाढते आणि आपले मन जास्त विचार न करता शांत राहण्यास मदत होऊन आपल्याला चांगले लक्षात राहते.

स्मरणक्ती कमी होऊ नये म्हणून काय करावे व काय करू नये.
1)स्मरणशक्ती कमी होऊ नये, आपण कोणती ही गोष्टी विसरू नये म्हणून आपल्याला काही सवयी लावाव्या लागतात आणि काही वाईट सवई बंद कराव्या लागतात. 
2) आपल्या दैनंदिन आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या , फळे यांचा समावेश आवर्जून करावा.
3) स्मरणशक्ती चांगली होण्यासाठी व वाढण्यासाठी दररोज व्यायाम , सूर्यनमस्कार आणि योगासने प्राणायाम करावे . जसे.की शीर्षासन, अनुलोम, विलोम, प्राणायाम, भ्रामरी, ॐ कार जप हे एकाग्रता वाढवण्याचे साधन आहे. 
4) उघड्यावरील,बाहेरील पदार्थ पुर्ण कमी झाल्यास उत्तम. उदा.. मॅगी, पिज्जा.... व इतर. असे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
5) कोणत्याही गोष्टीचा विचार जास्त करणे , चिंताग्रस्त होऊन मेंदूला जास्त ताण देऊ नये. 

  वरील सर्व उपाय करण्यासाठी आपल्याला काही खर्च येत नाही. आपण घरच्या घरी आयुर्वेदिक पद्धतीने उपाय करू शकतो.हे सर्व उपाय आरोग्यास लाभदायक आहेत. जास्ती माहिती साठी जाणकार आणि डॉक्टर यांचा सल्ला नक्की घ्यावा.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेयर करा. आणि सगळ्या पर्यंत पोहचवा.
धन्यवाद...

FAQ'S

1) स्मरण शक्ती वाढविण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय कोणते ?
Ans. स्मरणशक्ती वाढण्यासाठी हा उपाय सर्व बोलत असतात म्हणजे कपभर दुधात प्रत्येकि १ याप्रमाणे बदाम, काजु, अक्रोड, इलायची याची बारिक पावडर करून घेतल्यास अतिशय लवकर चांगला परिणाम येतो. यामुळे आपलीं स्मरणशक्ती वाढून आपल्या दैनंदिन जीवनात चांगले लक्षात राहते.

2) स्मरणशक्ती कमी होण्याची कारणे काय आहेत ?
Ans. जास्त विचार करून तान ग्रस्त राहणे, बाहेरील मसालेदार पदार्थ खाणे, कमी झोप घेणे ,कमी पाणी पिणे आणि मानसिक तणाव घेणे ही स्मरणक्ती कमी होण्याची कारणे आहेत.

3) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम कोणते करावे ?
Ans.स्मरणशक्ती चांगली होण्यासाठी व वाढण्यासाठी दररोज व्यायाम , सूर्यनमस्कार आणि योगासने प्राणायाम करावे . जसे.की शीर्षासन, अनुलोम, विलोम, प्राणायाम, भ्रामरी, ॐ कार जप हे एकाग्रता वाढवण्याचे साधन आहे.

4) लक्षात राहण्यासाठी काय उपाय करावेत ?
Ans. स्मरणशक्ती वाढण्यासाठी हा उपाय सर्व बोलत असतात म्हणजे कपभर दुधात प्रत्येकि १ याप्रमाणे बदाम, काजु, अक्रोड, इलायची याची बारिक पावडर करून घेतल्यास अतिशय लवकर चांगला परिणाम येतो. यामुळे आपलीं स्मरणशक्ती वाढून आपल्या दैनंदिन जीवनात चांगले लक्षात राहते.

5) एकाग्रता वाढवण्यासाठी घरगुती उपाय ?
Ans.एकाग्रता,स्मरणशक्ती चांगली होण्यासाठी व वाढण्यासाठी दररोज व्यायाम , सूर्यनमस्कार आणि योगासने प्राणायाम करावे . जसे.की शीर्षासन, अनुलोम, विलोम, प्राणायाम, भ्रामरी, ॐ कार जप हे एकाग्रता वाढवण्याचे साधन आहे.
Previous Post Next Post