तोंडाची दुर्गंधी जाण्यासाठी उपाय
नमस्कार मंडळी,
आपण दिवसभरात काय काय खातो, आणि या ये खाल्ल्यानंतर आपण योग्य चूळ भरत नाही किंवा तोंड साफ करत नाही दात साफ करत नाही.यामुळं आपल्या तोंडाची दुर्गंधी येत असते, श्वासाची दुर्गंधी येत असते. चार चवगा लोकात बोलण्यासाठी आपण जेव्हा तोंड उघडत असतो तेव्हा ही दुर्गंधी आपले काम ,सवय दाखवून देत असते. आपण आपले दात दररोज घासायला हवे, साफ करायला हवे.आपण आपल्या तोंडाची दुर्गंधी जावी म्हणून इलाची, माऊथ फ्रेशर खात असतो. तोंडातून दुर्गंधी येणे, तोंडाची दुर्गंधी येणे ही समस्या घालवण्यासाठी आपण घरच्या घरी आयुर्वेदिक उपाय केल्यास तोंडातून दुर्गंधी येणे बंद होईल.पण ही तोंडातून दुर्गंधी येत का असते...यामागची कारणे आपल्याला माहिती हवे. चला तर मग आज जाणून घेऊ तोंडातून दुर्गंधी का येते व तोंडातून दुर्गंधी जाण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय काय आहेत.
तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय
तोंडाची, श्वासाची दुर्गंधी का येत असते ?
जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात जास्त मसालेदार, लसुन, कांदा, मतदार पदार्थांचा समावेश करत असतो. अशावेळी आपल्या दातांमध्ये हे पदार्थ अडकुण राहत असतात. आपण आपल्या दातांची निगा ठेवली नसता तसेच दात साफ केल्या नसल्याने ते अडकलेले अन्न सडून तोंडाचा वास यायला सुरुवात होते. आपल्या दातांचे हिरड्यांचे आजार यामुळे आपल्या तोंडाची दुर्गंधी येत असते. जास्त दिवस किंवा जास्त वेळ जेवण न केल्यास तोंडाचा वास येतो. अशी अनेक कारणे तोंडाची ला वास दुर्गंधी येण्याची कारणे आहेत. यामुळे तोंडाची दुर्गंधी येत असते.
तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी घरगुती उपाय
1. दिवसातून दोनवेळा ब्रश करण्यासोबतच जीभही स्वच्छ करा, तेथेही जीवाणू लपलेले असतात.
2. लिंबू-पाण्याने नियमितरीत्या गुळण्या करा. तोंडाची दुर्गंधी घालवण्याचा हा चांगला उपाय आहे.
3. सकाळी कॉफी पिण्याऐवजी ग्रीन टी किंवा काळा चहा प्यावा. त्यातील पॉलिफिनॉल्स नावाच्या अँटिऑक्सिडंट्समुळे तोंडातील जीवाणूंचा नाश होतो. हे जीवाणू दुर्गंधी निर्माण करतात.
4. भरपूर पाणी प्या, जेणेकरून जीवाणूंची संख्या वाढणार नाही.
5. संत्रा, मोसंबी आणि लिंबू यांसारखी आंबट फळे खावीत. त्यातील सायट्रिक अॅसिड जेव्हा लाळेत मिसळते तेव्हा तोंडातील दुर्गंधीस जबाबदार असलेले जीवाणू मरतात.
6. अल्कोहोलयुक्त माऊथवॉशचा वापर करू नका कारण त्यामुळे तोंडात कोरडेपणा निर्माण होतो व दुर्गंधी निर्माण होते.
7. सफरचंदाचा रस माऊथवॉशसारखा उपयोगात आणता येतो. हा तोंडातील दुर्गंधी पळविण्याचा नामी उपाय आहे. अर्धा चमचा रस एक ग्लास पाण्यात टाका आणि १० सेकंद गुळण्या करा.
8. सूर्यफुलाच्या बिया खा आणि एक ग्लास पाणी प्या. त्यामुळे श्वासात ताजेपणा येईल.
तोंडाची दुर्गंधी येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी
तोंडाची दुर्गंधी येऊ नये म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात फळं पालेभाज्या यांचा आहारामध्ये समावेश करावा. उघड्यावरील बाहेरील मसालेदार तेलकट पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. दररोज सकाळ-संध्याकाळ दात घासावे. जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या फळे खावी. जेवणानंतर योग्य चूळ भरावी. अशी योग्य काळजी आपण घरच्या घरीही घेऊ शकतो ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी येणे थांबू शकते.
🔵काही लोकप्रिय पोस्ट 🔵
ही पोस्ट, माहिती आवडल्यास नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.
FAQ'S
1) तोंडाची वास/ दुर्गंधी का येते ?
Ans. तोंडातील हिरड्यांचे आजार, दात योग्य वेळी साफ न केल्याने अडकलेले अन्न सडल्याने, जास्त मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने, कांदा लसुन जास्त प्रमाणात खाल्याने तोंडाचा वास येत असतो.
2) तोंडाची दुर्गंधी येऊ नये म्हणून काय करावे ?
Ans. नेहमी आपले दात घासावे व आपल्या जीवनात पालेभाज्यांचा फळांचा समावेश करावा.
3) दात मजबूत करण्यासाठी उपाय काय करावे ?
Ans. आपले दात नेहमीत घासून आपल्या दैनंदिन जीवनात पालेभाज्या आणि फळांचा समावेश व अंडी यांचा समावेश जेवणात करावा.
4) तोंडातील हिरड्या दुखत असतात ?
Ans. आपल्या तोंडातील दातांची अस्वच्छता आहे त्यांची स्वच्छता राहिल्यामुळे हिरड्यांना सूज येऊन त्या दुखत असतात.
5) कोणत्या रोगामुळे तोंडाचा वास दुर्गंधी येत असते ?
Ans. तोंडातील हिरड्यांचे आजार, शरीरातील झिंकच्या कमतरतेमुळे आणि मधुमेहामुळे तोंडाची दुर्गंधी येत असते.