औषधी वनस्पती व त्यांचे औषधी उपयोग

   औषधी वनस्पती व त्यांचे औषधी उपयोग


परसबागेत वाढणाऱ्या औषधी वनस्पती त्यांचे औषधी गुणधर्म


   आपल्याला औषधी वनस्पती माहिती इतस नाव व त्यांचे औषधी उपयोग माहिती असणं एवढं महत्त्वाचं असतं तेवढंच औषधी वनस्पती उपचारासाठी आपल्याकडे असणे आवश्यक असतं. पण प्रत्येक औषधी वनस्पती आपल्याला वेळेवर उपलब्ध होईल असते सहजासहजी होत नाही. त्यासाठी आज आपण अशा औषधी वनस्पती व त्यांचे औषधी उपयोग थोडक्यात जाणून घेणार आहोत की त्यांची लागवड आपण परत बागेत करू शकतो.



परसबागेत वाढणाऱ्या औषधी वनस्पती त्यांचे औषधी गुणधर्म
औषधी वनस्पती
 


१) गुळवेल ( TINOSPOR CORDIFOLIA )


औषधी वनस्पती गुळवेल हे आपण परसबागेत एक सभेची वेल म्हणून वनौषधी वेल म्हणून वाढवू शकतो.

औषधी वनस्पती गुळवेल औषधी उपयोग -

संधिवातात वेलीच्या काड्यांचा काढा करून पाजणे.
अशक्तपणा असेल वा शरीरात रक्त कमी असल्यास या चे सत्व दुधातून देतात.
त्वचाविकारात गुळवेलीचा काढा पोटातून देतात व अंघोळीच्या पाण्यात घालतात.

२) मधूनाशिनी / गुड मार (GYMNEMA SYLVESTEREL ASCLEPIAS GEMINATA)

मधूनाशिनी औषधी वनस्पती आपण परसबागेमध्ये लागवड करू शकतो. ग्रामीण खेडेगावात आपण साख्रिज नावाने या वनस्पतीला ओळखतो.


औषधी वनस्पती मधूनाशिनी / गुड मार औषधी उपयोग-


वनस्पतीचे एक पान खाल्ले व त्यानंतर कोणताही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर गोड लागत नाही. साखर ही गोड लागत नाही.
ज्यांची लघवीतून साखर जाते त्यांनी या वेलीच्या पानांचे चूर्ण घ्यावे.
किंवा रोज उपाशी पोटी एक पान खावे. मधुमेहावर गुणकारी औषध.

३) मायाळू ( BASELLA RUBRA )


औषधी वनस्पती मायाळू कोण ओळखत नाही. गावाकड, ग्रामीण भागात भजा वेल म्हणून लोक ओळखत असतात. औषधी वनस्पती मायाळू परसबागेत लावल्याने आपल्याला उपयुक्त होतोच पण आपण घरासमोर कुंडीत लावून घराची शोभा वाढवू शकतो.

औषधी वनस्पती मायाळू औषधी उपयोग-


अंगात रक्त कमी झाल्यास या वनस्पतीच्या पानांचा रस प्यायला देतात.
डोकेदुखी पानांचा लेप करून डोक्याला लावतात.
एखाद्या ठिकाणी भासल्यास पाने वाटून लावतात.

४)हळद ( BESELLA RUBRA )


औषधी वनस्पती हळद सर्वांचे घरगुती वापरात असलेली वनस्पती आहे. स्वयंपाकासाठी हळद आपल्या स्वयंपाक घरात असतेच पण आपण तिची लागवड परसबागेत पण करू शकतो.

औषधी वनस्पती हळदीचे औषधी उपयोग -


सूज आल्यास हळदीचा लेप लावतात.
जखमेतून रक्त निघाल्यास हळद लावल्यास रक्त थांबते.
खोकला सर्दी झाल्यास दुधात हळद टाकून प्यायला देतात.
स्तनशोधात हळदीचा लेप लावतात.
मुक्का मार लागल्यास हळदीचा लेप लावल्याने वेदना कमी होतात.

     Next Page

अशाच औषधी वनस्पती, रान भाज्या, आणि पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटका विषयी माहिती जाणून घेण्यासाठी विजिट करा इको महाईनोकरी ला.


    🔵लोकप्रिय पोस्ट.....🔵



टिपः कोणत्याही औषधी वनस्पती च्या औषधी गुणधधन्यवादर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. वनस्पतीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण काही वनस्पतीच्याbजास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.



Previous Post Next Post