टोमॅटो खाण्याचे फायदे आणि औषधी गुणधर्म
नमस्कार मित्रांनो ,
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आहारामध्ये कोणती भाजी असो डाळ त्यात टोमॅटो तर असायलाच हवं अशी आपली धारणा असते. आणि हो टोमॅटो इतका चविष्ट जेवण बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. पण तुम्हाला टोमॅटो खाण्याचे फायदे काय आहेत ? म्हणून आज आपण टोमॅटो खाण्याचे फायदे जाणून घेऊ .
टोमॅटो हा आपल्या रोजच्या आहाराचा भाग आहे. टोमॅटो शिवाय भाजीला चव येत नाही असं म्हटलं जातं. मात्र ते खरं आहे. टोमॅटो फक्त भाजी चविष्ठ करत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. टोमॅटोमुळे अनेक आजारांना आळा बसू शकतो. त्यामुळे टोमॅटो खाणं अजिबात टाळू नका. टोमॅटोचे फायदे कोणते आहेत हे जाणून घ्या…
जाणून घ्या - टोमॅटो खाण्याचे फायदे आणि औषधी गुणधर्म
रक्त वाढवण्यावर उपयुक्त घरगुती उपाय -
जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपल्या शरीरात वाहणारे रक्त योग्य प्रकारे कार्य करतो. जर आपण टोमॅटो खात नसाल तर त्याचे सूप बनवून पिऊ शकता तसेच भाजी मध्ये त्याचा उपयोग करू शकता. आपल्या शरीरातील रक्त संचारण योग्य प्रकारे चालेल. आपले रक्त अजून लाल गडद होईल.
डोळ्यांसाठी उपयुक्त घरगुती उपाय - टोमॅटो
जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधी काही समस्या असतील तर आपण टोमॅटो चे रोज सेवन करा आपल्याला फायदा होईल. आणि आपल्या डोळ्यांची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतात. टोमॅटो मध्ये विटामिन A व विटामिन C दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असतात.
सांधेदुखी वर गुणकारी घरगुती आयुर्वेदिक उपाय
टोमॅटो मध्ये केरोटीन नावाचे एक तत्व असते. जे आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी मदत करते. जर आपल्याला सांधेदुखी चा त्रास असेल किंवा संधिवात असेल आणि हे आजार जर आपल्याला दूर करायचे असतील तर रोज टोमॅटो चे सेवन करायला सुरवात करा. कारण यात असलेले औषधी गुण आपला साधेदुखी सारखा आजार दूर करण्यास मदत करेल.
वजन कमी करण्यासाठी घरगुती औषधी उपाय - टोमॅटो
टोमॅटो मध्ये पाण्याची मात्रा भरपूर असते आणि टोमॅटो मध्ये फायबर हि उचित मात्रेत असतो. तर आपण रोज टोमॅटो चे सेवन करत असाल तर आपले वजन कमी होण्यास मदत होईल आणि आपण निरोगी व तंदुरुस्त राहाल. जर आपल्या शरीरात कोलेस्ट्रोल ची मात्रा वाढली असेल तर वाढलेले कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी रोज टोमॅटो चे सेवन करा तसेच आपण टोमॅटो चा सलाड हि बनवू शकता.
पोटातील जंत कमी करण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय म्हणजे टोमॅटो
जर आपल्याला पोटासंबंधी समस्या असतील किंवा आपल्या पोटात जंत झाले असतील तर टोमॅटो कापून त्यात हिंग घालून त्याचे सेवन करा, आपल्याला फायदा होईल. किंवा कच्चा टोमॅटो कापून त्यात काळी मिरी पावडर टाकून 2 ते 3 दिवस याचे सेवन करत असाल तर हे आपल्यासाठी लाभदायी ठरेल आणि आपल्याला जंत ची समस्या होणार नाही. तसेच अस्वस्थ व अतिसार सारख्या समस्या देखील होणार नाहीत.
महत्व पूर्ण माहिती जाणून घ्या