लघवीला जळजळ होणे घरगुती उपाय आणि उपचार आणि कारणे
नमस्कार मित्रांनो,
आपल्याला अनेक वेळा असा अनुभव येतो की आपल्याला लघवी करताना जळजळ होते. अशावेळी जो होणारा त्रास आहे तो खूप त्रासदायक असल्याने आपल्यांना त्याचा त्रास होत असतो. पण लघवीला जळजळ होणे याची कारणे काय आहेत आणि लघवीला जळजळ होणे यावर उपाय काय आहेत आणि उपचार काय आहेत हे जर आपल्याला माहिती असले तर आपण ते होऊ देणार नाही आणि झाले असते त्यावर आपण घरगुती उपचार करू शकू. चला तर आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊ की लघवीला जळजळ होणे कारणे आणि लघवीला जळजळ होणे उपाय आणि घरगुती उपचार
लघवीत जळजळ होने कारणे व लघवीला जळजळ होणे घरगुती उपाय आणि उपचार
लघवीला जळजळ होणे कारणे
- 1) जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणाऱ्यांना सुद्धा वारंवार युरीन होण्याची आणि जळजळ होण्याची समस्या भोगावी लागते.
- 2) याशिवाय अनुज एक गंभीर कारण म्हणजे मूतखडा वाढू लागल्यास सुद्धा अशी जळजळ होते. त्यामुळे जर सतत त्रास होत असेल तर डॉक्टरांना अवश्य दाखवावे.
- 3) जास्त तिखट पदार्थ खाल्याने लघवीला जळजळ होणे हे होत असते.
- 4) जास्त तेलकट तिखट मसालेदार तसेच उघड्यावरील फास्ट फूड खाल्ल्याने लघवीच्या जागी जळजळ होत असते त्यामुळे पदार्थ खाणे टाळावे.
लघवीच्या जागी जळजळ होणे घरगुती उपाय
- ➡थंड पाण्यात जाड कापड भिजवुन पिळून घ्यावा हे कापड पोटावर बेंबीच्या खालच्या भागावर ठेऊन झोपून राहावे.या प्रयोगाने लगेच आराम पडतो.
- ➡ सकाळी दुध व पाणी समप्रमाणात घेऊन एका ग्लासात दोन चमचे साखर टाकून चांगले हलवावे व पिउन टाकावे. चहा घेऊ नये. दुपारी एक पेला थंड पाण्यात लिंबू पिळून दोन चमचे साखर मिसळून प्यावे.
- ➡ एक ग्लास पाण्यात गुलाबाच्या १ – २ फुलाच्या पाकळ्या टाकून रात्र भर झाकून ठेवावे सकाळी कुचकरून गाळून घ्यावे. त्यात एक चमचा दळलेली खडीसाखर टाकून प्यायल्याने जळजळ थांबते. एक आठवडा सेवन करावे.
- ➡ एक मध्यम आकाराचा कांदा कुचकारून २५ ग्राम पाण्यात उकलावा. पाणी अर्ध उरल्यावर पाजावे. दोन दिवस प्रयोग लघवीची जळजळ थांबते.
- ➡कष्टाने थोडी लघवी होणे, लघवीला आग होणे, जळजळणे यावर द्राक्षे किंवा मनुका पाण्यात भिजवून घ्याव्यात.
- ➡ लघवीला जळजळ होणे याच्यावर उपाय म्हणजे नारळ पाणी आपण जर आपल्या दैनंदिन जीवनात काही वेळेस नारळ पाणी पिण्याची सवय लावून घेतली तर हा त्रास आपल्याला होणार नाही हे नक्की.
- ➡ आपल्या आहारामध्ये फळभाज्या , पालेभाज्या आणि फळे यांचा समावेश करावा जे आपल्या शरीरासाठी योग्य आहार असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होत असतो.
FAQ'S
1) लघवी करण्याच्या जागी जळजळ का होत असते ?Ans . लघवी करताना जळजळ होणे याचे मागील महत्त्वाचे कारण म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI). ही समस्या साधारणतः 18-60 या वयोगटातील महिला आणि पुरूषांमध्ये आढळते. पण ही समस्या जास्तकरून महिलांमध्ये जास्त आढळते.
2) लघवीला जळजळ होणे घरगुती उपाय कोणते ?
Ans .
- १)थंड पाण्यात जाड कापड भिजवुन पिळून घ्यावा हे कापड पोटावर बेंबीच्या खालच्या भागावर ठेऊन झोपून राहावे.या प्रयोगाने लगेच आराम पडतो.
- २)सकाळी दुध व पाणी समप्रमाणात घेऊन एका ग्लासात दोन चमचे साखर टाकून चांगले हलवावे व पिउन टाकावे. चहा घेऊ नये. दुपारी एक पेला थंड पाण्यात लिंबू पिळून दोन चमचे साखर मिसळून प्यावे.
3) पिवळी लघवी का होते ?
Ans . पिवळी लघवी होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे पिवळी लघवी होत असते ही सामान्य गोष्ट आहे यासाठी शरीरातील पाणी वाढवण्यात जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करू नये.