महाराष्ट्राती महत्व पूर्ण आयुर्वेदीक औषधी वनस्पती माहिती व उपयोग
आपल्याला औषधी वनस्पती माहिती इतस नाव व त्यांचे औषधी उपयोग माहिती असणं एवढं महत्त्वाचं असतं तेवढंच औषधी वनस्पती उपचारासाठी आपल्याकडे असणे आवश्यक असतं. पण प्रत्येक औषधी वनस्पती आपल्याला वेळेवर उपलब्ध होईल असते सहजासहजी होत नाही. त्यासाठी आज आपण अशा औषधी वनस्पती व त्यांचे औषधी उपयोग थोडक्यात जाणून घेणार आहोत की त्यांची लागवड आपण परत बागेत करू शकतो.
4 आयुर्वेदिक औषधी वनस्पती उपयोग मराठी | हाडसंधी,लिंबू,वेखंड आणि मेहंदी
1) हाडसांधी (CISSUS QUADRANGULARIS)
आज-काल बर्याच ठिकाणी शोभेचे झाड म्हणून हाडसांधी ची लागवड करतात. पण औषधी वनस्पती हाडसांधी ची लागवड आपण आपल्या परसबागेत आवर्जून करायला हवे.
हाडसांधी वनस्पती चे औषधी उपयोग
या वनस्पतीचे कांड हाडाच्या पेरा सारखे दिसते. जर कोणाचे हाड मोडले असेल तर रोप बारीक वाटून त्याचा लेप मोडलेल्या हाडावर लावतात. म्हणूनच तिला हाडसांधी म्हणतात.
2) लिंबू ( CITRUS QURANTIFOLIA)
लिंबू आणि लिंबाचे झाड सर्वांना तर माहितच आहे पण लिंबाचे झाड फार मोठे नसल्याने आपण त्याची लागवड परसबागेत करू शकतो.
लिंबाचे औषधी उपयोग
ज्याला कुणाला आपले वजन कमी करायचे असेल त्यांनी सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यासोबत लिंबू व मध एकत्र घेतल्यास वजन कमी होते असे म्हणतात. लिंबू रस व खडीसाखर सरबत करून पिल्यास पित्त कमी होतो. भूक कमी लागत असल्यास लिंबू रस, अद्रक व काळे मीठ एकत्र करून घ्यावे. केसांच्या मुळाशी लिंबाचा रस लावल्यास केस गळती कमी होते.
3) वेखंड ( ACORUS CALAMUS )
वेखंड ह्या छोट्याश्या औषधी वनस्पतीची लागवड आपण आपल्या परसबागेमध्ये करू शकतो.
वेखंड वनस्पती चे औषधी उपयोग
दमा व खोकल्यात वेखंडाचे चूर्ण मधातून घेतात. संधिवातात वनस्पतीच्या खोडाचा लेप लावला जातो. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी श्रीखंडाचा चोरून दुधातून दिला जातो.
4) मेहंदी ( LAWSONIA INERMIS)
मेहंदी चे झाड आपण आपल्या परसबागेत आवर्जून लावावे.
मेहंदी झाडाचे औषधी उपयोग
तळपाय व तळ हाताची आग झाल्यास मेहंदी चा पानांचा लेप लावल्याने उष्णता कमी होते. तोंड आल्यास मेहंदीचे पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे नंतर ते पाणी गाळून गुळण्या कराव्या असा सल्ला दिला जातो. झोप येत नसल्यास मेहंदीचे फुले उशीखाली ठेवून झोपावे.
अशाच औषधी वनस्पती, रान भाज्या, आणि पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटका विषयी माहिती जाणून घेण्यासाठी विजिट करा इको महाईनोकरी ला.
👉 पोस्ट नक्की वाचा
धन्यवाद....शेअर करा आणि कॉमेंट करून नक्की कळवा.
..टिपः.
कोणत्याही औषधी वनस्पती च्या औषधी गुण धर्मांचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. वनस्पतीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण काही वनस्पतीच्या जास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नका.
FAQ's
1) हाड मोडल्यास घरगुती आयुर्वेदिक उपाय काय करावा ?
Ans.हाड सांधी वनस्पतीचा उपयोग करावा.दिलेल्या पोस्ट मध्ये जाणून घ्या.
2) पित्तावर घरगुती उपाय काय करावा ?
Ans. लिंबाचे सरबत करून पिल्यास पित्त कमी होतो.
3)स्मरण शक्ती वाढवण्यास उपयोगी औषधी वनस्पती नाव ?
Ans.वेखंड चूर्ण दुधातून दिले जाते.
4)झोप लागत नसल्यास घरगुती उपाय काय करावा ?
Ans. झोप येत नसल्यास मेहंदीचे फुले उशीखाली ठेवून झोपावे
5) तळहात व तळपाय आग होत असल्यास घरगुती उपाय काय करावा ?
Ans. तळपाय व तळ हाताची आग झाल्यास मेहंदी चा पानांचा लेप लावल्याने उष्णता कमी होते.
6) 5 औषधी वनस्पती नावे ?
Ans. हाडसांधी , वेखंड, लिंबू , तुळस आणि मेहंदी