शेवळा रानभाजी | shevalachi bhaji | रान भाजी शेवाळा माहिती..

शेवळा रानभाजी | shevalachi bhaji

रान भाजी शेवाळा माहिती..

       पावसाळ्याची चाहूल लागली की, सुरू होतो सिझन रानभाज्या चा .पावसाळ्याच्या सुरुवाती पासून ते शेवट पर्यंत आपल्याला अनेक रानभाज्या बघायला मिळत असतात. पहिला पाऊस रिमझिम झाला की भाज्या निघायला सुरवात होतो.आज आपण जाणून घेणार आहोत रान भाजी शेवाला विषयी. कंद वर्गातील ही रान भाजी आहे. उन्हाळा संपायला येतो आणि पाऊस पडायला सुरुवात होण्याचा मार्गावर रान भाजी शेवळा ची सुरवात होते.
Dragon Stalk Yam म्हणून इंग्रजी मध्ये ओळख आहे.

ranbhaji sevala रान भाजी शेवाळा माहिती..
रानभाजी शेवळा

रानभाजी शेवळा स्वरूप व वर्णन 

   रान भाजी शेवळा चे चपटे गोल आकाराचे कंद जमिनीत असतात. पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर शेवळा भाजी वाढते 9-10 इंच उच पापुद्रा  असलेला दांडा असतो. मध्ये नागली सारखे दाणे असलेला भाग . पिवळसर भाग तसे अजून मातेरी , तांबडा पापुद्रा आणि मातेरी , हिर्वस दांडा असे साधारण वर्णन. खालील फोटो मध्ये बघू शकता.

रान भाजी शेवळा वितरण व मूळ ठिकाण

      रान भाजी शेवळा रानात , वनात मोठ्या झाडाखाली , लहान मोठा झुडपा खाली कंद असतात. पावसाळा सुरवातीस कंद उगाऊन त्यातून  शेवळा भाजी निघते.कंद हे कडू कंद व शेवलाचे कंद आसे असतात. खेडोपाड्यात डोंगराळ भागात रानभाजी शेवळा मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र राज्यात रान भाजी शेवळा डोंगराळ भागात , रानात , वनात, जंगलात मोठया प्रमाणावर आढळते.

रान भाजी शेवळा शास्त्रीय नाव व वर्गीकरण..

........ update soon ......

रानभाजी शेवळा नावे व जाती प्रकार :-

      रान भाजी शेवळा चे प्रकार जाणून घ्यायचे म्हटले तर त्याचे काही प्रकार आपल्या समोर येतात .
रान भाजी शेवळा भाजी कंद ठिकाणी वेळा रान भाजी शेवळा सारखाच प्रकार दिसतो तो म्हणजे "काहकाऱ्या " . कहकाऱ्या दिसायला अगदी रान भाजी शेवळा दिसतो मात्र त्याच्या मध्ये रान भाजी शेवळा सारखं नसून हिरवी - पिवळी पाने असतात. काहकाऱ्या मात्र भाजी म्हणून खात नाहीत.
रानभाजी शेवळा योग्य वाढ असलेला मध्यम प्रकार आपण भाजी म्हणून खात असतोच.पण रानभाजी शेवळा मधील एक मोठा प्रकार त्याला मोठा दांडा सहित हा प्रकार मोठा असतो . याची भाजी करताना दांड्या ची भाजी तव्यावर खरपूस तळून खातात. बाकी भाग पिठल्यासाठी वाळण्यास ठेवतात. नंतर लागेल तेव्हा पिठलं करतात. याला ग्रामीण भागात डोसी- डवर रानभाजी शेवळा असे म्हणतात.

वर्षातून एकदाच खायला मिळणारे रानभाजी शेवला
रानभाजी शेवळा

रानभाजी शेवळा शेती व उत्पादन विक्री

         रानभाजी शेवळा शेती आणि उत्पादन विषयी बोलायचे झाले तर ग्रामीण डोंगराळ , रान , जगली भागात मोठ्या प्रमाणावर रानभाजी शेवळा आपल्याला भेटते. या भागातील लोक रानभाजी शेवळा सिझन सुरू झाल्यावर रानातून , जंगलातून आणि डोंगराळ अवघड भागामधील रानभाजी शेवळा शोधून बाजारात विक्री करतात.दिवस भर उन्हात फिरत रानभाजी शेवळा शोधत अनेक खेड्या मधील लोक आपल्याला बाजारात रानभाजी शेवळा विक्री करताना दिसतील. रानभाजी शेवळा चे कंद जमवून ठराविक ठिकाणी , शेतात , शेताच्या कडेला लावावे . हे मोठे फायद्याचे ठरेल.

रानभाजी शेवळा फायदे आणि उपयोग 

      शेवळा भाजी म्हणजे पावसाळा आल्याचा निसर्गाचा संदेश आहे. यामुळेच शेवळा भाजी अतिशय आरोग्यदायी असली तरी ती वर्षातून केवळ 7 ते 10 दिवसच मिळते. ही भाजी पिकवली जात नाही, पण पहिल्या पावसानंतर ती महाराष्ट्रातील जंगलात आणि डोंगरात स्वतःच उगवते. रानभाजी शेवळा पोटासाठी अत्यंत फायद्याचि असते. पोटाचे विकार बरे होण्यास मदत होते.
विशेष म्हणजे ही भाजी १-२ आठवड्यांत वाढणे थांबते. ही भाजी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक भाग आहे आणि गरीब-श्रीमंत हा भेदही दूर करते कारण आदिवासी आणि गरीब लोक ती जंगलातून आणून खातात, तर श्रीमंत लोक तिच्या फायद्यामुळे बाजारातून विकत घेऊन खातात.

aushadhi ran bhaji  रान भाजी शेवाळा माहिती..
रान भाजी शेवाला
या भाजीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते
 शेवळा भजी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. याचे कारण म्हणजे या जंगली भाजीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे असतात, ज्याचा शरीराला फायदा होतो. शेवळा भाजी हा व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानला जातो. असं असलं तरी व्हिटॅमिन डी फारच कमी पदार्थांतून मिळतं, त्यामुळे ज्यांना त्याची कमतरता आहे, त्यांनी शेवळा भाजी मिळेपर्यंत रोज सेवन करावं.
      👉 हे आवर्जून वाचा..👇

ही माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट मध्ये कळवा . आणि रानभाजी शेवळा विषयी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.

धन्यवाद.....

 
Previous Post Next Post