कोकणातील रानमेवा | करवंदे माहिती | डोंगरची काळी मैना

 कोकणातील रानमेवा | डोंगरची काळी मैना

कोकणातील रानमेवा करवंदे विषयी माहिती.


            उन्हाळा सुरू झाला की रानात, वनात सुगंध पसरतो ......कशाचा ?....रानमेव्यांचां . यामध्ये आवर्जून एक रानमेव्यांचा नाव घेतात. तो म्हणजे करवंदे....हो करवंदे आंबट , गोड , मधुर अशा अनेक चवीने आपल्याला हा रानमेवा उन्हाळ्यात चाखायला मिळत असतो."डोंगरची काळी मैना" म्हणून तिची ओळख आहे .आज आपण या रानमेवा करवंदे विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

डोंगराची काळी मैना करवंदे

१) रानमेवा करवंदे झाडाचे स्वरूप :


        करवंदे झाड नसून मोठे झुडूप असते. करवंदे झाडाला मोठाले काटे असतात. करवंदे झाड वाढण्यासाठी भरपूर वेळ लागतो. काटेरी झाड असल्याने कुंपणासाठी या झाडाचा उपयोग केला जातो. या झाडाची पाने तोडली चीक बाहेर येतो. करवंदाची फुले सफेद लहान असतात . करवंदाची फळे सुरुवातीस हिरवे व नंतर पिकल्यावर काळे असतात. कोणतेही प्राणी जसे बकरी, गाय, बैल करवंदाचे झाड पाने खात नसतात. 8- 9फुटाचे हे झाड झूडपा सारखे सारखे वाढत जातात.२) रानमेवा करवंदे वितरण व मूळ ठिकाण.


  रानमेवा करवंदे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघायला मिळतात. कोकणातील जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे अश्या परिसरात रानमेवा करवंदे आपल्याला मिळतात.कोकणात रानमेवा करवंदे प्रसिद्ध आहेत. कोकणात अनेक ठिकाणी, रस्त्या कडेला उन्हाल्यात करवंदे विकायला असतात.
करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.
भारतातील वनांत विशेषत: शु्ष्क व खडकाळ भागांत आढळते. 


३) करवांदाचे शास्त्रीय नाव व वर्गीकरण...


A) शास्त्रीय नाव -


     कॅरिसा करंडास ( Carissaa carandas)

B) करवंदे शास्त्रीय वर्गीकरण -

Taxonomy 
Kingdom - Plantae
Subkingdom - Viridiplantae
Infrakingdom - Streptophyta
Superdivision - Embryophyta
Division - Tracheophyta
Subdivision - Spermatophytina
Order - Gentianales
Family - Apocynaceae
Subfamily - Rauvolfioideae
Tribe- Carisseae
Genus - Carissa
Species - Carissa spinarum

४) करवंदे नावे व जाती
 

करवंदाची नावे - 

करवंदे ,करोंदा , करुंदा इत्यादीं
करवंद हिंदीमध्ये ‘खट्टा मीठा’ या नावाने प्रसिद्ध आहे, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी म्हणतात.
 
करवंदे

करवंदे जाती - 

विद्यापीठाने कोकण बोल्ड नावाची नवीन जात प्रसारित केली आहे. करवंदाच्या जाती फळाच्या आणि गराच्या रंगावरून ठरविल्या जातात. विद्यापीठाने कोकण बोल्ड नावाची नवीन जात प्रसारित केली आहे. या जातीची फळे मोठी (12-16 ग्रॅम) व घोसाने लागतात, तसेच फळाची प्रत उत्कृष्ट आहे. फळे गोलाकार असून, गराचे प्रमाण 92 टक्के आहे. फळांचा टिकाऊपणा (चार दिवस) चांगला आहे. फळे गडद काळ्या रंगाची असून, त्यात 361 मिली ग्रॅम क जीवनसत्त्व प्रति 100 ग्रॅम गरात आहे. फळातील बिया मृदू असून, चावून खाता येतात. कच्च्या व पक्व फळांपासून विविध प्रक्रिया केलेले टिकाऊ पदार्थ तयार करता येतात.

५)करवंदे शास्त्रीय गुणधर्म व औषधी गुणधर्म


A)करवंदे शास्त्रीय गुणधर्म - 

* करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो. तसेच ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
* करवंदामध्ये मोठय़ा प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात 

B) करवंदे औषधी गुणधर्म - 

करवंदाचे कच्चे फळ स्कर्व्हीनाशक तसेच स्तंभक आहे. पिकलेली फळे शीतकारक व भूक वाढविणारी असतात. मूळ कडू व कृमिनाशक आहे. पाळीच्या तापावर पानांचा काढा गुणकारी ठरतो, असे आयुर्वेदात वर्णन आहे. करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.
  • * अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.
  • * आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तसेच आंबट ढेकर येत असतील तर अशा अवस्थेत करवंदाचे सरबत थोडय़ा-थोडय़ा अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.
  • * करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते. यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण कमी होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.
  • * करवंदाच्या रसामध्ये मधुरता आणि आम्लता असल्यामुळे अपचन झाले असेल, तर अन्नाचे पचन होण्यासाठी करवंदाचे सरबत थोडय़ा थोडय़ा अंतराने पीत राहावे. लाकूड कठीण व गुळगुळीत असते. त्यापासून चमचे, फण्या व इतर कातीव वस्तू तयार करतात करवंदाची पाने हीदेखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत. ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.
  • * करवंदामध्ये नसíगकरीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या विकारांमध्ये करवंद सेवनाचा लाभ होतो. वर्षभर करवंद खाता यावे म्हणून करवंदाचे लोणचे, मुरंबा, सरबत बनवून ठेवावे.
  • * गर्भवतीने उलटी, मळमळ, अरुची ही भावना कमी होण्यासाठी व विपुल प्रमाणात कॅल्शिअम मिळण्यासाठी ऋतूमध्ये मूठभर करवंदे खावीत.
  • सावधानता 

पिकलेली करवंदे
 ही माहिती तुम्हाला वाचायला हवी.👇


६) करवंदे शेती व उत्पादन - 


करवंद्याचे झाड काटेरी झुडूप असल्याने व गुरे ढोरे याची पाने खात नसल्याने ,
कुंपणासाठी करवंदे झाडाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
कोकणात अनेक ठिकाणी , रस्त्यावर , कडेला उन्हाळ्यात कर्वेंदे विक्री करतात. करवंदे झाडाची रोप तयार करून विकली जातात.
करवंदे शेती करून अनेक शेतकरी उत्पादन घेत आहेत. करवंदे शेती कशी करावी हे जाणण्यासाठी कॉमेंट करा . आपण पुढील पोस्ट मध्ये जाणून घेऊ.

रानमेवा करवंदे विषयी माहिती कशी वाटली नक्की कळवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा...
धन्यवाद...

Karavande mahiti , karavande in Marathi
Karavande aushadhi gundharm.. ranmewa karavnde , dongarchi Kali Maina, 

Previous Post Next Post