दुधी भोपळा खाण्याचे फायदे | भोपळ्याचे औषधी गुणधर्म

गुणवान आणि औषधी दुधी भोपळा


दुधी भोपळा खाण्याचे फायदे | भोपळ्याचे औषधी गुणधर्म 


      दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की अनेकांची नापसंती भोपळ्याच्या भाजीला असते.भोपळा हा प्रकार अनेकांचा नावडता. एखाद्या लठ्ठ माणसाला आपण म्हणतो , काय झालंय भोपल्यासारखा . अस आपण त्याला चिडवत असतो. म्हणजे आपल्या दृष्टीने भोपळा फक्त चिडवन्या पुरता. भोपळ्याची वेल बघितली तरी काही नाक मुरडता.पण भोपळा आपल्या साठी किती फायद्याचा असतो, हे लक्षात घ्या. भोपळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. भोपळा भरपूर गुणवान आहे. मग आज आपण जाणून घेऊ भोपळा (भोपळा भाजी )खाण्याचे फायदे व भोपळ्याचे औषधी गुणधर्म

गुणधर्म औषधी दुधी भोपळा
दुधी भोपळा

दुधी भोपळ्याचे औषधी गुणधर्म....


दुधी भोपळा खाण्याचे फायदे..


१) जर कुणाचे शरीर कमजोर असेल, अशक्त, दुर्बल असेल तर त्याला भोपळा खाण्याचा सल्ला दिला जातो.भोपळा भाजी शरीराची दुर्बलता दूर करते 

२) ज्याचे डोळे कमजोर असतात , डोळे दुखतात , डोळ्याला पाणी येते त्यांनी भोपळा भाजी खावी .
भोपळा खाल्याने डोळ्याची क्षमता वाढते.

३) पिकलेला भोपळा आपली स्मरणशक्ती वाढीसाठी उपयुक्त असतो .म्हणून स्मरणशक्ती वाढीसाठी पिकलेला भोपळा खावा.

४) मानसिक रोग्यांना भोपळ्याचा हलवा करून खायला देतात.त्याने रोगी सुधारण्यास मदत होते.

५) फोड , पुळ्या झालेल्या असतील तर भोपळ्याची पाने घेऊन पानांचा रस लावावा .

६) डोक्याचे केस पांढरे होत असल्यास भोपळ्याच्या बियांचे तेल वापरावे. केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.

७) शरीराची जळ जळ होत असल्यास भोपळ्याच्या बिया वाटून मधाबरोबर खाव्या जळजळ कमी होते.

८) भोपळ्याची गरम भाजी खाल्यास गळ्याचे विकार बरे होतात.

       काही महत्व पूर्ण माहिती पोस्ट नक्की वाचा


अशी औषधी वनस्पती, झाडे , फळे यांची माहिती मिळावी यासाठी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.तुम्हाला माहिती कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा.
धन्यवाद...
टिपः कोणत्याही औषधी वनस्पती च्या औषधी गुणधर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. वनस्पतीच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण काही वनस्पतीच्याbजास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.

       

Previous Post Next Post