आंबा,Mango | आंबा झाडाची माहिती

आंबा,Mango


आंबा,Mango | आंबा झाडाची माहिती


      जसा जसा उन्हाळा जवळ येतो तसा रानावनात घमघमाट सुटतो,कशाचा घमघमाट?.....बरोबर वनराई तील आंब्याच्या फुलांचा , मोहरा चां .आंबा फळांचा राजा,आंबा आपला राष्ट्रीय फळ अशा अनेक प्रकारे ज्याची ओळख आपल्याला आहे .मराठीत आंबा ,हिंदीत आम,आणि इंग्रजीत मँगो अशी आंब्याला ओळख आहे. फार प्राचीन काळापासून आंब्याला धार्मिक,औषधी वनस्पती म्हणुन ओळखलं जातं. प्राचिन ग्रंथांमध्ये आंब्याला भरपूर महत्व दिले आहे. झाडाचे आयुष्य किमान शंभर वर्षे असते. चांगल्या प्रतीच्या आंब्याच्या झाडाला पाच ते सहा वर्षांनंतर फळे येतात.आंबा हा सर्वांना आवडतो ,मग तो लहान असो वा मोठा. आंब्याचा अनेक जाती आपल्याला बघायला मिळतात.कलम आंब्यापासून गावठी अंब्यापर्यंत अनेक आंबे आपल्याला बघायला मिळतात.आंब्याचा पिकण्याचा ,लागण्याचा काळ उन्हाळा असला तरी मात्र आपल्याला आंब्याचा आस्वाद मात्र तिन्ही ऋतूत घ्यायला मिळतो.अंबारस
,मँगो फ्रूटी अशा अनेक आंब्यापासून तयार झालेलं पदार्थ आपण आस्वाद घेत असतो.आंबा आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. सर्व फळांमध्ये आंबा हे फळ सर्वाधिक लोकप्रिय आहे. आंबा हे फळ चवीने अगदी गोड असल्यामुळे आंब्याचा रस आवडीने बनवला जातो. लहानांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत आंबा सर्वांना खायला आवडतो .गावाकडे गावठी आंबे ,कलम आंबे मोठया प्रमाणातअसतात.गावठी आंब्यामध्ये शेंदरी, अंबटी,नीली,अशी गावाकडे नावे असतात.आंबा हे फळ आपल्या संस्कृतीमध्ये लोकप्रिय असल्यामुळे आंबा या फळावर अनेक लोकगीते आढळतात. आंबा हे फळ सोनेरी रसदार फळ आहे त्यामुळे पाहता क्षणी आंबा हे फळ खाण्याचा मोह सर्वांना होतो, त्यामुळे या फळाला स्वर्गीय फळ असे देखील म्हटले जाते. आहारामध्ये शरीराच्या वजन वाढीसाठी आंब्याचा रस व दूध एकत्र करून ग्रहण केला जातो.
ग्रामीण भागामध्ये कच्च्या आंब्यापासून लोणचे बनवले जाते व ते वर्षभर खाण्यासाठी पुरावे म्हणून मातीच्या मटक्या मध्ये साठवून ठेवले जाते. शहरी भागांमध्ये हेच लोणचे आपल्याला वेगवेगळ्या पॅकेटमध्ये आढळते.अशा लोकप्रिय फळविषयी,झाडविषयी आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे.चला तर जाणून घेऊ अंब्याविषयी.


आंबा



१)आंबा झाडाचे स्वरूप (Nature of Mango)


आंब्याचे झाड हे भरपूर मोठे असतात,काही मध्यम असतात.गावठी आंब्याची झाडे खूप मोठी असतात व फळ मात्र लहान असते.आंब्याच्या झाडाची उंची तीस ते पन्नास फूट असते. या झाडाचे आयुष्य किमान शंभर वर्षे असते. चांगल्या प्रतीच्या आंब्याच्या झाडाला पाच ते सहा वर्षांनंतर फळे येतात.आंबट ,गोड,बाठुर ,अशा अनेक प्रकारची चव आपल्याला वेगवेगळ्या अंब्यातून मिळते. कच्च्या फळाचा रंग हिरवा असून, त्याला कैरी म्हणतात. कैरी पिकल्यानंतर केशरी, पिवळा, लालसर रंगाचा आंबा तयार होतो. आंब्याच्या फुलांना मोहर म्हणतात.
आंब्याचा हंगाम वैशाख महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंत असतो.कच्चे आंबे आंबट लागतात. पिकल्यावर गोड किंवा आंबट-मधुर लागतात. आंब्याचा आकार गोल व लांबट असतो. काही आंबे लहान, तर काही खूप मोठे असतात.
आंबा हे झाड उंच व भरपूर सावली देणारे झाड आहे. आंबा हे झाड सर्वसाधारणपणे 15 मीटर पर्यंत उंच आढळते, कधीकधी ते वीस ते तीस मीटरपर्यंत उंच आढळते. भारतामध्ये आंब्याच्या तोतापुरी, निलम, हापूस, पायरी, रत्ना, सिंधू ,वनराज, केशर अशा विविध जाती आढळतात. कलम ,गावठी,राजापुरी,केशर अशा भरपूर आंब्याचे प्रकार आहेत.आंब्याची हिरवी पाने ५-६ इंच लांब असतात.कोवळी पाने लाल ,तांबडी,फिकट हिरवी असतात,मात्र मोठी पाने हिरवी असतात.

आंब्याची कोवळी पाने/ पालवी

२)आंब्याचे वितरण व मुळ ठिकाण(origin and Distribution of Mango):


महाराष्ट्रात कोकणगुजरातमध्ये आंब्याचे फार मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्याचप्रमाणे तामिळनाडू, कर्नाटकांतही आंब्याचे उत्पादन होते. आंबा एक भारतीय वंशाचे झाड आहे.विदेशात आंब्याच्या फळाला मोठया प्रमाणात मागणी असते.महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते व मोठ्या प्रमाणात आंब्याची उत्पादन केले जाते. सध्या अनेक चवीच्या पदार्थांमध्ये आंब्याचा फ्लेवर आढळतो. महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक,कोल्हापूर,अशा जिल्हा मध्ये आंबा पिकवतात.

३) आंब्याचे शास्त्रीय नाव व शास्त्रीय वर्गीकरण (Binomial name and scientific classification):


A)Binomial/scientific name (शास्त्रीय नाव):

Mangifera Indica


B) Scientific classification (शास्त्रीय वर्गीकरण):

Scientific classificationedit
Kingdom: Plantae
Clade: Tracheophytes
Clade: Angiosperms
Clade: Eudicots
Clade: Rosids
Order: Sapindales
Family: Anacardiaceae
Genus: Mangifera
Species: M. indica

४) आंब्याची नावे व जाती (Name and Type/Breeds of Mango)

आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे. भारतामध्ये जवळपास आंब्याच्या तेराशे प्रजाती आढळतात. त्यापैकी काही महत्त्वाच्या पंचवीस ते तीस जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असल्यामुळे त्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते.

A)आंब्याची नावे (Names of Mango):


१] मराठी नाव – आंबा.
२] इंग्रजी नाव – Mango (मँगो)
३] शास्त्रीय नाव – Mangifera Indica
४] ग्रामीण/गावठी आंबे- शेंदरी, आंबटी,निली, गोट्या, इत्यादी.


B) आंब्याच्या जाती (Type/Breeds of Mango)

:-भारतात जवळजवळ तेराशे प्रकारचे आंबे आहेत.मात्र २५ते ३० प्रकारच्या आंब्यांना जास्त महत्त्व असल्याने त्यांची लागवड केली जाते. हापूस, पायरी, लालबाग, केसरी, तोतापुरी, रत्ना, बोरशा, लंगडा, कलमी,निलम, राजापुरी, देवगड अशा आंब्यांच्या विविध जाती आहेत.

५)आंब्याचे शास्त्रीय गुणधर्म व औषधी गुणधर्म (scientific and medicinal properties of Mango):


आंब्याचे अनेक शास्त्रीय गुणधर्म व औषधी गुणधर्म आहेत. चला तर मग जाणून घेऊ.

A) scientific properties (शास्त्रीय गुणधर्म):


आंब्यामध्ये ए व सी जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते.
म्हणून ए व सी जीवनसत्व साठी आंबा खावा.

B) Medicinal properties (औषधी गुणधर्म)


आंब्याचे फळ जसे महत्वाचे आहे तसेच आंब्याचे झाड पण औषधी गुणामुळे खूप महत्वाचे आहे. यात गावठी शेपू आंबा महत्वाचा....
a) उलटी होत असल्यास कोवळ्या पानांचा काढा, रस घेतला जातो .
b) जखम झाल्यास आंब्याच्या सालं काढून ती जाळून तिचे मस जखमेवर लावतात.
c) ताप आल्यास साली चा काढा पाजला जातो.
d) जुलाब सुरू झाल्यास कोयीचां गर खडीसाखर सोबत खायला देतात.
e) संधीवात झाल्यास आंब्याची पाने व निर्गुडीची पाने यांची वाफ देतात.
d) पोटदुखी झाल्यास सालीचा चूर्ण घेतात.
g)पिकलेले आंबे खाल्ल्याने शरीराची त्वचा सुंदर व तेजस्वी होते. तसेच पचनशक्ती सुधारते व उत्साह वाढतो.
h) आंबा पाचक, शक्तिवर्धक व पूरक आहार म्हणून उपयोगी आहे. 
I)नाकातून रक्त येणे, अंडवृद्धी,कफनाशक, न्यूमोनियामध्ये लेप देण्यासाठी, अतिसार, मोडशी,जंत, प्रदर यावर आंब्याची कोय उपयोगात आणतात.
j)आंबा भाजून, शिजवून त्याचा रस काढून, अंगाला लावल्यास घामोळ्या जातात. दाह व अतिसार, उपदंशावर आंब्याची साल गुणकारी औषध आहे.


बहरलेला आंबा

  ▶️  हे तुम्हाला माहित आहे का ?◀️

६)आंब्याचे धार्मिक महत्व (Religious importance of mango )


हिंदू धर्मा मध्ये आंब्याला मानाचे स्थान आहे.
हिंदू धर्मात कोणताही कार्यक्रम असो आंब्याच्या पानांची गरज राहतच. देवपुजेला लागणार कळस असो वा लग्नातील कळस आंब्याची पाने असतातच.
आदिवासी पूर्वी आपल्या डोक्याला,केसात आंब्याची पाने माळत असतं.अशा प्रकारे आंब्याला धार्मिक महत्व पण मोठ्या प्रमाणावर आहे.


७) आंब्यापासून मिळणारी उत्पादने (product of Mango):

आंब्यापासून अनेक उत्पादने तयार केली व ती बाजारात आपल्याला विकत भेटतात. आबा एका ऋतू मध्ये येत असला तरी त्याची उत्पादने आपल्याला सर्व ऋतु मध्ये मिळतात. सध्याच्या काळात आंब्याचा ज्यूस वर्षभर मार्केटमध्ये सुंदर पॅकेटमध्ये व बॉटलमध्ये पिण्यासाठी उपलब्ध असतो
आंब्याच्या रसाच्या वड्या, आंबापोळी, आम्रखंड अशी विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात.
जाम, जेली, आंब्याचा रस, स्वादिष्ट पेये तयार करण्यासाठी आंब्याचा उपयोग करतात. कैरीपासून लोणची, पन्हे, तयार करून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वापरली जातात

८) आंब्याची शेती (Mango Forming)


आंब्याचे महत्व जाणता आंबा हा भरपूर नफा मिळवून देणारे फळ आहे.आंब्याची ही भरपूर नफा मिळवून देणारी शेती आहे. आंब्याला भारतातच नाही तर विदेशात पण मोठ्या प्रमनावर मागणी आहे.दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. 
जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते.२५ ते ३० जाती या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे. गुजरात राज्यातील केशर हे वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्रप्रदेशामध्ये बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशामध्ये दशेरी, लंगडा, दक्षिणेत नीलम, पायरी, मलगोवा या जाती प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त संशोधन केंद्राने दशेरी व नीलम यांच्या संकरामधून आम्रपाली आणि नीलम व दशेरी यांच्या संकरामधून मल्लिका ही जात विकसित केली आहे. कोकण विद्यापीठाने बिनकोयीची सिंधू ही जात विकसित केली आहे.आंबा संशोधन केंद्र भारतामध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आणि महाराष्ट्रातील वेंगुर्ला येथे आहे. आंबा शेतीत आपण दुसरे पीक पण घेऊ शकतो .गावाकडे आंबा व इतर पिके पारंपरिक पद्धतीने घेतात. जोड व्यवसाय साठी आंबा लागवड खूप फायद्याची ठरते.

टिपः आंबा च्या औषधी गुणधर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. आंब्या चे मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण आंब्याचे जास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.
         अशा प्रकारे आंबा ही अनेक अनेक प्रकारच्या गुणधर्मामुळे महत्वाची ठरते. व आपल्याला शेतीत नफा मिळवून देणारे फळ झाड आहे. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवा.आपण अशाच प्रकारे अनेक वनौषधी, वनस्पती व पर्यावरणातील महत्व पूर्ण घटकविषयी लेख घेऊन येत असतो. तर यात सहभागी व्हा.
           धन्यवाद.....



     




Previous Post Next Post