आपट्याचे (शीद) झाडाविषयी माहिती.| दसऱ्याला आपट्या ची पाने का सोन म्हणून वाटतात ?

आपट्याचे झाडाविषियी माहिती

आपट्याचे झाडाविषिय माहिती. |दसऱ्याला आपट्या ची पाने का सोन म्हणून वाटतात ?

दरवर्षी दसरा आला की , सर्वांना आठवत सोन, कोणत ??? दसऱ्याच . दसरा सर्वत्र देशात आनंदाने साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी सर्वात जास्त महत्व कोणाला असते , तर ते आपट्याच्या पानाना इतर दिवशी ती साधी पानं असतात, पण दसरा असला की ही या दिवशी मानलेली सोन. ग्रामीण भागात लोक या झाडाला शीदाचे झाड म्हणून ओळखतात तर काही भागात आपट्याचे झाड .

आपट्याचे झाड

या झाडविषयी काही माहिती , बाबी आज आपण जाणून घेऊ. जसे आपट्याचे उगम, दसऱ्याच्या दिवशी त्याला सोन्याचं महत्त्व, वैज्ञानिक महत्व ,आपट्या झाडाचे मूळ स्थान , दसऱ्याला आपट्या ची पाने का सोन म्हणून वाटतात ? इत्यादी. चला तर जाणून घेऊ .

आपट्याचे झाडाची पाने

दसऱ्याला आपट्या ची पाने का सोन म्हणून वाटतात.

धार्मिक महत्व या मुद्यामध्ये वाचा👇👇

१) आपट्या /शिद झाडाचे स्वरूप ( origin of apta)

पानझडी वनात विभागलेले आपट्याचे झाड सरळ ना वाडाता वेडवाकड वाडणार झाड. आपट्याची पाने हिरवी आणि जुळी असतात.शेगा लांब लहान वाकड्या असतात.पांढरी पिवळसर फुले आपट्याला फेब्रुवारी ते मे महन्यापर्यंत येत असतात.हे झाड बौहीनिया या जातीतील आहे.

२) आपटा झाड वितरण आणि मूळ ठिकाण(origin and Distribution of apta)

आपटा हे झाड पानझडी वनात आढळते.

ज्या भागात पानझडी वने आहेत त्या भागात आपल्याला आपटा बघायला मिळतो

भारत ,चीन ,श्रीलंका इत्यादी देशातील वनांमध्ये आपटा झाड आढळते. आपल्या भारत देशाला मात्र सर्वत्र आढळते.

3) आपट्याचे शास्त्रीय नाव व वर्गीकरण ( scientific name and scientific classification of apta )

A) आपट्याचे शास्त्रीय नाव (scientific name of apta)

बौहिनिया रेसीमोसा Bouhinia racemosa

B) आपट्याचे शास्त्रीय वर्गीकरण ( scientific classification of apta )

  • Kingdom: Plantae
  • Clade: Tracheophytes
  • Clade: Angiosperms
  • Clade: Eudicots
  • Clade: Rosids
  • Order: Fabales
  • Family: Fabaceae
  • Genus: Bauhinia
  • Species: B. racemosa
  • Binomial name Bauhinia racemosa Lam.

4) आपटा झाडाची नावे व त्यांच्या जाती ( name
and type of apta)

आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा Bouhinia racemosa आहे

भारत देशात आपटा असे म्हणतात. ग्रामीण भागात शिदा चे झाड असे ही म्हटलं जाते.या कुलातील झाडांना दोन दले असलेली पाने असल्यामुळे बौहिनिया हे नाव सोळाव्या शतकातील वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन व कॅस्पर बौहिन या दोन भावांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे.

5) आपटा झाडाचे धार्मिक महत्त्व / दसऱ्याला
आपट्याची पाने सोने म्हणून का वाटतात.

आपटा वृक्ष शततारका नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आराध्यवृक्ष मानला जातो.आपट्याचे झाड शत्रू विनाशक आहे असे म्हणतात.आपट्याचा वृक्ष हा महावृक्ष असून तो महादोषांचे निवारण करतो.इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो.असे एका श्लोका मध्ये म्हटले आहे.

अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण ।
इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम् ।।

आता येऊ मुख्यविषयावर दसऱ्याला

आपट्याची पाने सोने म्हणून का वाटतात.

एका पौराणिक कथेनुसार आपट्याची पाने सोने म्हणून का देतात जानून घेऊ.

फार वर्षा पूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होते. त्यांच्याकडे अने शिष्य शिक्षण घेत असत.शिक्षण संपल्यावर गुरु वरतंतू यांना गुरुदक्षिणा देत. पण ते घेत नसत.

एकदा कस्त नावाच्या शिष्याने त्याचे शिक्षण झाल्यावर गुरूंना विचारले की मी दक्षिणा म्हणून काय देऊ. वरतंतू ऋषींनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते म्हणाले मी तुला 14 विद्या शिकवल्या मला तु त्याबद्दल 14 कोटी सुवर्ण मुद्रा दे.शिष्याला काही करेणा येवढ्या मुद्रा मिळवायला जमेना.

त्याने रघुनाथ नावाच्या दानुशुर राज्याकडे मदत मागितली.पण राज्याने आपली सर्व संपत्ती दान करून टाकली होती.त्याने 3 दिवस मुदत मागितली .

राज्याने कुबेरा कडे मदत मागितली त्याने मदत केली नाही.यामुळे राज्याने युद्ध करण्याचे ठरविले.हे जेव्हा इंद्र देवाला कळेले त्याने कुबरे देवाला सुवर्ण मुद्रा द्यायला सांगितले. कुबेराने सुवर्ण मुद्रा चां पाऊस पाडला..तो आपट्याच्या झाडावर पाडला. शिष्याने पाहिजे तेवढ्या मुद्रा बाकी राज्याने लोकांना घेण्यास सांगितलं/लुटण्यासाठी सांगितले. लोकांनी मनमुराद आनंद घेऊन मुद्रा लुटल्या . तो दसरा म्हणून साजरा करतात व एक मेकांना आपल्या गुरूना आपट्याची पाने सोने म्हणून देतात. अशा प्रकारे ही प्रथा चालत आली आहे असे म्हणतात.

 ◀️◀️    हे तुम्हाला माहीत आहे का ?◀️◀️

1️⃣ मनुष्य भक्षक झाडाचे बेट

2️⃣ दसऱ्याला आपट्याच्या झाडाची पाने का वाटतात ?

6)आपट्याचे फायदे आणि औषधी वनस्पती

आपटा (बाउहिनिया रेसिमोसा) हे झाड बहुगुणी वनौषधी/ औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो.

आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.

आपट्याचे झाडापासून टॅनिन मिळते. गुजरातमध्ये , महाराष्ट्र मध्ये पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो. जुन्या काळात तोटयाच्या बंदुका वापरत, त्यासाठी लागणाऱ्या वाती या झाडाच्या आंतरसालीपासुन तयार होत असत . दसऱ्याच्या दिवशी याची पाने मोठ्या संख्येने विकली जात आहेत.

पोस्ट आवडली तर शेअर करा , कॉमेंट करा

धन्यवाद.


Previous Post Next Post