3 झाडांविषयी लोकांच्या गैरसमज , अंधश्रद्धा.
ही तीन अशुभ झाडे घराशेजारी लावू नये, लोकांचे गैरसमज, अंधविश्वास
काहीही झालं तरी ही झाडे अंगणात , घरा शेजारी, अंगणामध्ये लावू नका. ही झाडे घरात बरबादी आणतात. माता लक्ष्मी आपल्या घरातून उलट्या पावलाने निघून जाते .अनेक गैरसमज लोकांमध्ये या झाडांविषयी आहेत. ही झाडे अशुभ असतात, लग्नामध्ये नकारात्मक गोष्टी तयार करत असतात. असे गैरसमज लोकांमध्ये दिसून येतात.
चला तर जाणून घेऊ अशा तीन झाडांविषयी ज्याविषयी लोकांमध्ये गैरसमज आहेत.
१) चिंचेचे झाड | चिंचेच्या झाडा विषयी गैरसमज , अंधश्रद्धा.
चिंचेच्या झाडाचं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. लोकांमध्ये गैरसमज आहे की चिंचेचे झाड घराशेजारी अशुभ असतं.काही लोक म्हणतात की चिंचेचे झाड चुकूनही घराशेजारी अंगणात लावू नका कारण चिंचेच्या झाडाने अनेक लोकांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. असे म्हणतात की चिंचेचे झाड हे नकारात्मक गोष्टींचे प्रतीक आहे. हे झाड च्या घरा शेजारी अंगणात असेल त्या घरात गरिबी निरंतर वास करते असा लोकांचा गैरसमज आहे. रात्रीच्या वेळी चिंचेच्या झाडावर भुताचा वास असतो असा अनेक कथांमध्ये आपल्याला वाचण्यात येते. चिंचेचे झाड घराशेजारी असल्यास आपण कितीही प्रयत्न केले, कितीही मेहनत केली तरी आपली प्रगती होत नाही असा मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे.
प्रत्यक्ष तोंडाला लाळ आणणारे हे झाड अशुभ असेल का? खेडेगावात तर अनेक चिंचेची झाडे गावात आपल्याला बघायला मिळतात. पण त्याचा काही परिणाम आपल्याला दिसून येत नाही. तुमच्याकडे किती चे झाड आहे का आणि तुम्हाला काही परिणाम दिसून आले का ?
तुम्हाला काय वाटते कॉमेंट करून नक्की कळवा.
२) नागफनी | नागफनी झाडा विषयी गैरसमज , अंधश्रद्धा.
वाळवंटी प्रदेशात आढळणारे हे झाड नागफणी.
पण मात्र नागफणी हे झाड शोभेचे झाड म्हणून घराशेजारी आपल्याला दिसून येते. अनेक लोक शोभेचे झाड म्हणून घरात, कुंडीमध्ये, बाल्कनीत हे झाड लावतात. पण हे झाडाविषयी काही लोकांमध्ये गैरसमज आहेत. हे झाड घराशेजारी , अंगणामध्ये असल्यास घरात शांती राहत नाही. अशांतीचे वातावरण घरात असते, घरातील माणसे विनाकारण भांडत असतात. असे काही गैरसमज लोकांमध्ये आहेत. हे झाड लावल्याने घरात सतत दुर्घटना होत असतात, लोक आजारी पडत असतात असे लोक म्हणतात. या झाडा विषयी तुमचा काय समज आहे कमेंट मध्ये नक्की कळवा.
हे माहिती आहे का ?
चालणारे झाडं , सर्वात मोठा साप , उकलनारी नदी , सर्वात मोठा स्पायडर असे ... 1️⃣ अमेझॉन जंगला तील आठ रहस्य
2️⃣ रान भाजी करटोली
३) बोरीचे झाड | बोरी च्या झाडा विषयी गैरसमज, अंधश्रद्धा.
चिंचेच्या झाडा नंतर आपल्या तोंडाला पाणी आणणारे बोरीचं झाड. उन्हाळ्यात आपण कित्येक जण बोरांचा स्वाद घेत असतो. आंबट , गोड, मधुर, अशा अनेक चवीत आपल्याला बोर चाखायला मिळतात. या बोरीच्या झाडाविषयी काही समाज आपल्याला बघायला मिळतात. अनेक भुतांच्या कथांमध्ये आपल्याला वाचायला मिळतं की भूत बोरीच्या झाडावर राहतात . म्हणून बोरीचे झाड घराच्या आसपास परिसरात लावू नये असा गैरसमज लोकांमध्ये आहे. गैरसमज असल्याने काही लोक म्हणतात या झाडातला खरात मग गोष्टींचा वास असून आपल्या घरात लक्ष्मी ,पैसा येत नाही.
आपल्या घरामध्ये अशांतीचे वातावरण राहते व पैशांची बचत होत नाही.
खरंच असं होत असेल का ? याविषयी तुमचे मत कॉमेंट मध्ये कळवा ?
निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. प्रत्येक झाडापासून आपल्याला काही ना काही फायदा होत असतो. प्रत्येक झाडामधील काही ना काही औषधी गुणधर्म असतो. आपण मान्य करतो की काही झाडे शास्त्रीय गुणधर्माने अपायकारक असतात , विषारी असतात त्यामुळे आपल्याला अपाय होऊ शकतो.
पण वरील लोकांच्या गैरसमज नुसार आपल्याला तोटा होत असेल का ? मला तर वाटतं नाही
तुम्हाला काय वाटतं नक्की प्रतिसाद द्या.
पोस्ट आवडल्यास शेअर करा आणि गैरसमज दूर करा.
धन्यवाद......