दम्यापासून सुटका दमा , श्वास घेण्यासाठी त्रास होने घरगुती उपाय.

दमा बरा करण्यासाठी घरगुती उपाय 

 नमस्कार मित्रांनो ,
                कसे आहात तुम्ही ? मला वाटतं तुम्ही नक्की बरे असा आणि नसाल तर नक्की बरे व्हाल. आपल्यापैकी बर्‍याच जणांना दम्याचा त्रास असतो किंवा दम्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. दम्याचा त्रास आपल्याला अनुवंशिकतेमुळे किंवा अनेक कारणांमुळे होत असतो. जास्त धूम्रपान धूम्रपान करणे आणि प्रदूषण वातावरणात जास्त का राहिल्याने दम्याचा त्रास होऊ शकतो. दमा हा खूप साहसी निगडित रोग असल्याने आपल्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. यावर उपचार करायला आपल्यांना घरच्या घरी मदत घेतली तर योग्यच . 
दमा बरा करण्यासाठी घरगुती उपाय
दमा बरा करण्यासाठी घरगुती उपाय 

यासाठी आपल्या मनासारखं दवाखान्यात जाणे ही परवडत नाही मात्र याच्यावर जर आयुर्वेदिक उपचार घरच्या घरी करता आलं तर किती चांगलं होईल. चला तर जाणून घेऊ दमा बरा करण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपचार. ज्यामुळे तुम्हाला चांगला फरक पडून तुम्हालाच दम्याचा त्रास कमी होईल.

 दम्यापासून सुटका  दमा , श्वास घेण्यासाठी त्रास होने घरगुती उपाय. 

दम्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपचार

  1. दालचिनी दुधात उकळून घ्यावी. त्यात थोडा मध टाकून घेतल्यास छातीतील व गळ्यातील कफ सहज सुटतो.
  2. दम्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपचार
                                            दम्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपचार

    1.  खडीसाखर, खिसमिस आणि दालचिनी चावून खाल्ल्याने दम्याचा अॅटॅक कमी होतो.
    2. मोहरीच्या तेलात मीठ टाकून छाती चोळून, गरम पाण्याने शेकल्यास कफ पातळ होऊन सुटतो.
    3. रात्रीच्या वेळी 3 चमचे एरंडीचे तेल पिल्यास कफ बाहेर पडतो. त्यानंतर रुग्णास आराम मिळतो.
    4. हृदयरोग नसणा-या रुग्णांनी एक ग्लास गरम पाण्यात 5 ग्रॅम मीठ टाकून ते पाणी 1-1 चमचा या प्रमाणात दिवसभर पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो.
    5. आद्रक आणि मध घ्यावा तसेच पपई खावी. याशिवाय इतर आयुर्वेद चिकित्सा उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.

    दम्याचा त्रास असल्यास काय करू नये 

    • 1. धूम्रपान, कफ वाढवणारा आहार जसे- दूध, दही, साबुदाणा, केळी, थंड पेय सेवन करू नये. हे पदार्थ खाणे शक्यतो पाणी पिणे टाळावे.
    • 2) दम्याच्या पेशंटने कधीही धूम्रपान करू नये. धूम्रपान हे प्रत्येक व्यक्तीसाठी घातक आणि वाईट आहेच तर तर दम्याच्या पेशंटसाठी तर हे अत्यंत घातक आहे म्हणून हे टाळावे.
    • 3) एसी किंवा कूलरमध्ये झोपू नये. रात्री जागरण, थंड हवेत फिरणे टाळले पाहिजे. ह्या गोष्टी खरंच टाळा.
    • 4)दम्याच्या रुग्णांचे पोट नेहमी साफ राहिले पाहिजे. बद्धकोष्ठता होणा-या वस्तूंचे सेवन टाळावे.
    • 5) मैदा किंवा त्यापासून बनलेले पदार्थ, बटाटे, शिळे अन्न, हॉटेलचे जेवण टाळले पाहिजे
    • 6) तळलेले, तेलकट आणि मसालेदार तसेच फास्टफूड पदार्थ खाणे टाळा म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.
    दम्याचा त्रास असल्यास काय करू नये

    FAQ'S

    1) अस्थमा , दमा का होतो ?
    Ans . ब्रॉन्कायटिस, दीर्घकाळ असलेला कफ यामुळे दम लागू शकतो. हिवाळ्यात आती थंडीत प्रदूषण वातावरणात जास्त काळ राहिल्याने दम्याचा त्रास होऊ शकतो. सतत धूम्रपान करणे म्हणजे दम्याला आमंत्रण देणे होय.

    2) अस्थमा म्हणजे काय ?
    Ans . अस्थमा, दमा हा एक सामान्य रोग आहे जो एखाद्या व्यक्तीस झाल्यास त्याला खूप त्रास होतोच. अशी स्थिती ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे वायुमार्ग सूजतात, अरुंद होतात आणि फुगतात आणि अतिरिक्त श्लेष्मा तयार करतात, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. दमा किरकोळ असू शकतो किंवा तो दैनंदिन कामात व्यत्यय आणू शकतो. काही प्रकरणांमध्ये, यामुळे जीवघेणा हल्ला होऊ शकतो

    3) अस्थमा साठी घरगुती उपाय ?
    Ans . खडीसाखर, खिसमिस आणि दालचिनी चावून खाल्ल्याने दम्याचा अॅटॅक कमी होतो.
    मोहरीच्या तेलात मीठ टाकून छाती चोळून, गरम पाण्याने शेकल्यास कफ पातळ होऊन सुटतो.
    रात्रीच्या वेळी 3 चमचे एरंडीचे तेल पिल्यास कफ बाहेर पडतो. त्यानंतर रुग्णास आराम मिळतो.
    हृदयरोग नसणा-या रुग्णांनी एक ग्लास गरम पाण्यात 5 ग्रॅम मीठ टाकून ते पाणी 1-1 चमचा या प्रमाणात दिवसभर पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो.

    4) दम्याची लक्षणे काय आहेत ?
    Ans . दम्याचा प्रमुख लक्षण म्हणजे लवकर थकवा येऊन श्वास घेण्यास त्रास होणे. छातीला दडपण , शासन घेताना आवाज होणे , जास्त दिवस खोकला , मोकळा श्वास न घेता येणे, धावताना दम लागणे , आणि बेचैन वाटणे ही काही दम्याची लक्षणे आहेत याची लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर डॉक्टरला भेटून सल्ला घेणे.

    5) दम्याचे प्रकार कोणते व किती आहेत ? 
    Ans .१) पेरिनियल अस्थमा (Perennial Asthma)
    २) सिजनल अस्थमा (Seasonal Asthma)
    ३) एलर्जिक अस्थमा (Allergic Asthma)
    ४) नॉन एलर्जिक अस्थमा (Non Allergic Asthma)
    ५) अकुपेशनल अस्थमा (Occupational Asthma)

    टीप: औषधी गुणधर्माचा उपयोग करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. अडुळसाचे मोठ्या प्रमाणावर उपयोग असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तिचा उपयोग करू नये.कारण  जास्त सेवन करणे योग्य नाही.त्यांचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात.म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय जास्त प्रमाणात वापर करू नये.
    Previous Post Next Post